जामनेर : प्रतिनिधी स्विफ्ट डिझायर व क्रुझर यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात नाशिक येथील दोन महिलाचा जागीच मृत्यू झाल्या असून १३ जण जखमी झाले. ही घटना जामनेर – बोदवड रोडवरील मालदाभाडी गावातील नायरा पेट्रोल पंपाजवळ काल दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. या अपघातात मनीषा पवार (वय ३५), चैतन्य पवार (वय १४ दोघे राहणार नेरी), निता चिंचोले (वय ४०), सरला तायडे वय ४०), प्रिती बिऱ्हाडे (वय ३८), काव्या बिऱ्हाडे (वय ५१), पदमा पाटील (वय ७०), स्वाती चिंचोले (वय ३०), निता चिंचोले (वय ३८), उज्वला निकम (वय ३८), वैशाली पवार (वय ३९, सर्व राहणार खादगाव ता. जामनेर), नंदा माळी (वय ४० रा.…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी दारु पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यामुळे ज्योती प्रताप चौधरी (वय ५२, रा. शंकरराव नगर) यांच्यासह दोघांना लाकडी मोगरीने मारहाण केली. ही घटना दि. ६ जून रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास शंकरराव नगरात घडली. यापक्ररणी संशयित निशांत प्रताप चौधरी (वय २२, रा. शंकरराव नगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शंकरराव नगरात राहणाऱ्या ज्योती चौधरी यांना दि. ५ जून रोजी रात्री निशांत प्रताप चौधरी हा दारु पिण्यासाठी पैसे मागत होता. त्याला पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने शिवीगावळ करीत जीवेठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याच्या हातात असलेली लाकडी मोगरीने ज्योती चौधरी यांच्या डोक्यावर मारुन गंभीर जखमी…
भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील सुनसगाव येथे एक अत्यंत दुर्दैवी अपघात घडला. वाळूचे डंपर मागे घेत असताना रस्त्याच्या बाजूला झोपलेल्या मजुराला या डंपरने चिरडल्याची घटना सुनसगावनजीकच्या पेपर मिलसमोर ४ रोजी घडली. यात या मजुराचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, राजाभैय्या नत्थू (३८, रा. बांदा, उत्तर प्रदेश) असे या मृत मजुराचे नाव आहे. सध्या तो सुदर्शन पेपर मिल परिसरात वास्तव्यास होता. ही घटना घडल्यानंतर चालकाने जखमीला मदत न करता घटनास्थळावरून पलायन केले असून, यामुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ४ जून २०२६ रोजी पहाटे सुमारे २:५० वाजता घडली. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिस ठाण्याचे हेकॉ. धीरज जनार्दन मंडलिक…
यावल : प्रतिनिधी यावल तालुक्यातील आमोदा येथे रविवारी पहाटे घडलेल्या दुर्दैवी अपघातात १३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घरातील धान्याच्या कोठीवर ठेवलेला टीव्ही संच झोपेत असताना डोक्यावर पडल्याने नाजमीन मोहम्मद इसहाक पिंजारी हिचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, नाजमीन पिंजारी ही शनिवारी सकाळी आपल्या आजीच्या घरी गेली होती. दिवसभर आजीकडे राहिल्यानंतर ती रात्री तेथेच झोपली होती. रविवारी पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास घरात ठेवलेल्या रिकाम्या धान्याच्या कोठीला तिचा धक्का लागला. या कोठीवर टीव्ही संच ठेवण्यात आला होता. धक्का लागताच टीव्ही संच थेट नाजमीनच्या डोक्यावर कोसळला. या अपघातात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव सुरू…
आजचे राशिभविष्य दि.८ जून २०२६ मेष राशी आजचा दिवस प्रेमी युगुलांसाठी खास असेल. तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त करण्याची उत्तम संधी मिळू शकते आणि एक सुंदर भेटवस्तू तुमचे नाते अधिक दृढ करेल. तथापि, कामामुळे तुमचे लक्ष विचलित होऊ शकते, म्हणून घाईघाईत चुका करणे टाळा. कुटुंबातील सदस्याच्या आरोग्याबद्दलची चिंता कायम राहू शकते, म्हणून आपल्या प्रियजनांसाठी थोडा वेळ काढा. वृषभ राशी आज तुमचा आत्मविश्वास स्पष्टपणे वाढेल. तुम्ही हाती घेतलेले कोणतेही काम उत्साहाने आणि धैर्याने पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. राजकारण आणि समाजात सक्रिय असलेल्या व्यक्तींच्या लोकप्रियतेत वाढ होऊ शकते. तुम्हाला स्वतःवर पैसे खर्च करावेसे वाटू शकते आणि तुम्ही नवीन कपडे किंवा अत्तर खरेदी करू…
मुंबई : प्रतिनिधी राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी निवडणुकीची घोषणा होताच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील राज्यसभा जागेसाठी माजी खासदार नवनीत राणा यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या सलग राजकीय भेटींमुळे उमेदवारीच्या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवनीत राणा यांनी सर्वप्रथम सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री भेटीनंतर पुन्हा एकदा नवनीत राणा आणि सुनेत्रा पवार यांच्यात चर्चा झाल्याची माहिती राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे. या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून नवनीत राणा यांना राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, अशी…
मुंबई : वृत्तसंस्था वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांना आणखी एक आर्थिक झटका बसला आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली असून नवीन दर रविवार मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत. या वाढीनंतर दिल्लीत 14.2 किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ₹913 वरून ₹942 वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, गेल्या तीन महिन्यांत दुसऱ्यांदा घरगुती एलपीजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी 7 मार्च रोजी सिलिंडरच्या दरात ₹60 ची वाढ करण्यात आली होती. त्यामुळे अवघ्या तीन महिन्यांत घरगुती सिलिंडर एकूण ₹89 रुपयांनी महागला आहे. न्यूज एजन्सी पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात ऊर्जा उत्पादनांच्या किमती वाढल्याने आणि घरगुती गॅस…
भुसावळ : प्रतिनिधी वरणगावजवळील हिरा मारोती मंदिर परिसरात झालेल्या भीषण रस्ते अपघातात एका कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याप्रकरणी स्कॉर्पिओ चालकाला वरणगाव पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्कॉर्पिओ (एमएच १९ ईव्ही ५३५३) चालक सुधीर सुभाष पाटील (रा. उदळी, ता. रावेर) यांच्याविरुद्ध वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात असून त्याला अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी झालेल्या या अपघातात दुचाकी (एमएच २२ बीडी ३६८१) वरील विजय शंकर काळे, त्यांच्यासोबत असलेल्या ऐश्वर्या बहादूर भोसले, विघ्नेश शंकर चव्हाण आणि मोनालिसा बहादूर भोसले यांचा मृत्यू झाला. आजारी असलेल्या मोनालिसाला उपचारासाठी वरणगाव येथे घेऊन जात…
जळगाव : प्रतिनिधी रस्त्याने जात असलेल्या तरुणीला आवाज देवून थांबवून तिचा हात पकडून विनयभंग केला. ही घटना दि. ५ जून रोजी जळगाव तालुक्यातील एका गावात घडली. याप्रकरणी संशयित गोपाळ रविंद्र कोळी (रा. कानसवाडा, ता. जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील एका गावात १८ वर्षीय तरुणी वास्तव्यास आहे. दि. ५ जून रोजी दुपारच्या सुमारास ही तरुणी रस्त्याने जात होती. यावेळी संशयित गोपाळ कोळी याने तरुणीला आवाज देवून थांबवले. त्यानंतर तिचा हात पकडून विनयभंग केला. घाबरलेल्या तरुणीने हा प्रकार कुटुंबियांना सांगितला. त्यांनी लागलीच नशिराबाद पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार संशयित गोपाळ रविंद्र कोळी (रा. कानसवाडा, ता.…
जळगाव : प्रतिनिधी गावठी कट्टुयाासह जीवंत काडतूस घेवून दहशत माजविणाऱ्या आकाश कैलास दामोधर (वय २४, रा. न्यू फेडरेशन बिल्डींग, पिंप्राळा हुडको) याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या. त्याच्याविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पिंप्राळा हुडको परिसरातील प्रल्हाद नगरच्या कंपाऊंटमध्ये संशयित आकाश दामोधर हा गावठी कट्टा घेवून दहशत माजवित असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार दि. ५ जून रोजी सायंकाळी पथकाने सापळा रचून संशयित आकाश दामोधर याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने गावठी कट्टयासह दोन जीवंत काडतूस काढून दिले पोलिसांनी ते जप्त केले आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार राहुल रगडे यांनी…

