Author: editor desk

पुणे : वृत्तसंस्था  कॉकरोच जनता पार्टी आता पुण्यात आंदोलन करणार आहे. कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजीत दीपके यानं ही घोषणा केली आहे. ११ जून रोजी पुण्यात हे आंदोलन होईल. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहेत. दिल्लीतील जंतर – मंतरवर आंदोलन केल्यानंतर कॉकरोच जनता पार्टी हे दुसरं आंदोलन करणार आहे. दिल्लीत जंतर-मंतरवर ६ जून रोजी कॉकरोच जनता पार्टीनं आंदोलन केलं होतं. पार्टीचा संस्थापक अभिजीत दीपके हा या आंदोलनात सहभागी झाला होता. तिथेही त्यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती. आता दिल्लीनंतर थेट महाराष्ट्रातील पुण्यात आंदोलन करण्यात येणार आहे. दीपके आणि पक्षाच्या वतीने या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जिल्हा कारागृहात बॅरेकमध्ये जाण्यास सांगितल्याच्या कारणावरून एका कैद्याने ऑन-ड्यूटी पोलीस रक्षकावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. ८ जून) दुपारच्या सुमारास घडली. या हल्ल्यात पोलीस रक्षकाला मारहाण करण्यात आली असून त्यांच्या गणवेशाची दोन बटणे तुटली आहेत. या प्रकरणी संशयित कैदी सुनील यशवंत नन्नवरे याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काशिनाथ कारभारी मोटे (वय २६) हे जळगाव जिल्हा कारागृहात रक्षक म्हणून कार्यरत आहेत. दि. ८ जून रोजी सकाळी ६ ते दुपारी १२ या वेळेत त्यांची कारागृहातील सर्कल क्रमांक ३ मध्ये ड्युटी होती. सकाळी ११ ते सव्वा अकरा वाजेच्या…

Read More

जळगाव  : प्रतिनिधी  अल्पवयीन मुलीला अमली पदार्थांचे व्यसन लावल्याप्रकरणी उघडकीस आलेल्या ड्रग रॅकेटमधील संशयित आरोपी रईस हारून देशमुख याच्या सुप्रीम कॉलनीतील घराच्या अतिक्रमणावर जळगाव महापालिकेने बुलडोझर चालवत कारवाई केली. घरासमोरील दोन दुकानांचे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. कारवाईदरम्यान मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार,  जळगावात अल्पवयीन मुलीला ड्रग्ज पुरवून त्यांना व्यसनाधीन बनविणाऱ्या रॅकेटचा अलीकडेच पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणात रईस हारून देशमुख, तौसिफ सय्यद आरिफ आणि कृणाल उर्फ लकी रमेश पाटील यांना अटक करण्यात आली असून, मुख्य आरोपी अमदज उर्फ बिल्डर शेख व इम्रान उर्फ हुसेन भिस्ती हे अद्याप फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली…

Read More

भडगाव : प्रतिनिधी  तालुक्यातील कोठली येथे बकरींसाठी चारा तोडण्यासाठी झाडावर चढलेल्या ९ वर्षीय चिमुकल्याचा विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. आजीच्या डोळ्यादेखत नातवाचा जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कुणाल विलास भिल (९, कोठली) असे मृत मुलाचे नाव आहे. शनिवारी (दि. ७) दुपारी सुमारे ४.४० वाजता कुणाल हा आपल्या आजी हिराबाई भिल यांच्यासोबत शिवारात बकरींसाठी चारा आणण्यासाठी गेला होता. सुबाभूळच्या झाडावर चढून चारा तोडत असताना झाडालगत गेलेल्या वीजवाहिन्यांचा त्याला स्पर्श झाला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटना घडताच हिराबाई यांनी आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकून शेतकरी व ग्रामस्थ घटनास्थळी धावले. मात्र, तोपर्यंत चिमुकल्याचा मृत्यू झाला…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी अमळनेर-धुळे महामार्गावर मंगरूळ गावाजवळ मंगळवारी सकाळी झालेल्या भीषण तिहेरी अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. एसटी बस, कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या या भीषण धडकेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज (दि. ९ जून) सकाळी अमळनेर ते धुळे मार्गावरील मंगरूळ गावाजवळ हा अपघात घडला. अमळनेरहून धुळेमार्गे चाळीसगावकडे जाणारी एमएच १३ सीयू ७५४० क्रमांकाची एसटी बस, एमएच १८ सी ८७१९ क्रमांकाची दुचाकी आणि जीजे १९ एएफ ३१४७ क्रमांकाची कार यांच्यात जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की…

Read More

पाचोरा : प्रतिनिधी  घरगुती आणि मालमत्तेच्या वादाचे पर्यवसान थेट खुनात झाल्याची धक्कादायक घटना पाचोरा शहरात सोमवारी रात्री घडली. दीपक प्रकाश कानडे (वय ४४, रा. पाचोरा) यांची धारदार शस्त्राने मानेवर वार करून हत्या करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संतोष कानडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून कौटुंबिक वादातूनच ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत दीपक कानडे यांच्या बहिणीचा विवाह आरोपी संतोष कानडे यांच्या भावासोबत झाला होता. काही वर्षांपूर्वी संतोषचा भाऊ मृत झाल्यानंतर संतोष आणि त्याची भावजई यांच्यात विविध कारणांवरून वाद सुरू झाले. घरगुती आणि मालमत्तेशी संबंधित मतभेद वाढत गेल्याने दोन्ही कुटुंबांमध्ये तणाव निर्माण झाला…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  किरकोळ वादातून हाणामारी करीत रस्त्यावर पडलेला दगड डोक्यात घालून जीवन शालीक पाथरकर (वय ३८, रा. रोटवद, ता. जामनेर, ह.मु. हरिविठ्ठल नगर) यांची हत्या करण्यात आली. ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास शामनगर परिसरात उघडकीस आली. सुरुवातीला मयताला अनोळखी म्हणून रुग्णालयात दाखल केले. मात्र नातेवाईकांनी ओळख पटविल्यानंतर घातपाचा संशय व्यक्त केला. पोलिसांनी एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. याप्रकरणी याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. शहरातील शामनगर परिसरातील रेल्वे पुलाजवळ अनोळखी इसमाचा मृतदेह मिळून आल्याने नागरिकांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती रामानंद नगर पोलिस ठाण्यातील कर्मचारी…

Read More

आजचे राशिभविष्य दि.९ जून २०२६ मेष राशी आजचा दिवस संतुलित आणि सुखद जाईल. तुम्हाला धार्मिक वातावरणात वेळ घालवण्याची संधी मिळेल. तुमच्या कामातील मेहनतीचे फळ तुम्हाला बढती किंवा कौतुकाच्या रूपात मिळू शकते. तुमची दीर्घकाळापासूनची इच्छा पूर्ण झाल्याने प्रचंड आनंद होईल. तुमच्या आई-वडिलांचा पाठिंबा आणि आशीर्वाद तुम्हाला पुढे जाण्याची शक्ती देतील. प्रेमसंबंधात, तुमच्या जोडीदाराच्या भावना समजून घेतल्याने नाते अधिक घट्ट होईल. वृषभ राशी आजचा दिवस फायदेशीर ठरेल. कुटुंबात शांतता राखणे ही तुमची जबाबदारी असेल. महत्त्वाच्या गोष्टी सर्वांना सांगू नका. गाडी काळजीपूर्वक चालवा, कारण दुखापत होण्याचा धोका आहे. तुम्हाला तुमच्या मुलाच्या वागणुकीबद्दल थोडी चिंता वाटू शकते. सर्जनशील कामांमधील आवड वाढेल आणि तुम्हाला काहीतरी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत केलेल्या विधानानंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्रीपदाबाबतची बच्चू कडू यांची मागणी ही त्यांची वैयक्तिक भूमिका असल्याचे स्पष्ट केले. उदय सामंत म्हणाले की, मुख्यमंत्रीपदाबाबत बच्चू कडू यांची काही मागणी असेल, तर ती त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. या संदर्भात माझी त्यांच्याशी चर्चा झाली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी एखाद्या नेत्याची मागणी करणे ही स्वाभाविक बाब आहे. जशी भाजपकडून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी केली जाते, त्याचप्रमाणे शिवसेनेचीही भूमिका स्पष्ट असून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी आमची इच्छा आणि…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  घरासमोर लघुशंका केल्याच्या कारणावरुन झालेल्या भांडणातून राहुल संतोष वाघोदे (वय २०, रा. रामेश्वर कॉलनी) या तरुणाच्या छातीत चॉपर भोसकून खून केल्याची घटना घडली होती. घटनेच्या दिवसापासून खून करणारे तरुण-तरुणी हे दोघ पसार झाले होते. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर तपासचक्रे फिरवित तालुका पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने संशयित सुमित जितेंद्र लोखडे (वय, रा. वाघनगर) याच्यासह सोळा वर्षीय विधीसंघर्षीत मुलीला मध्यप्रदेशातून अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार,  शहरातील कोल्हे हिल्स परिसरात मद्यपान केल्यानंतर राहुल वाघोदे हा त्याचा मित्र नितीन सैनी व संशयित मारेकऱ्यांनी सोबत लोखंडी घरी जेवण केले. मद्याच्या नशेत तर्रर्रर्र असलेल्या राहुलने वाघोदे याच्या घरासमोर लघुशंका करीत होता. यावेळी सुमितच्या घरात राहत…

Read More