जळगाव : प्रतिनिधी
पाळधीसह परिसरातील ३० हजार विद्यार्थ्यांना शुक्रवारी वह्या पुस्तकांचे वाटप तर दिव्यांगाना तीनचाकी सायकलींचे वितरण करण्यात आले. वाढते तापमान लक्षात घेता पाळधी परिसरात ऑक्सिजन पार्कची निमिर्ती करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. पालकमंत्री गुलाबराव पाटील याच्या वाढदिवसानिमित्ताने हे विविध उपक्रम राबवण्यात आले.
जीपीएस कॅम्पस हायस्कूलच्या मैदानावर हे उपक्रम घेण्यात आले. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या समाज सेवेच्या विचारांनुसार शुभेच्छुकांनी ३० हजारांहून अधिक वह्या, शैक्षणिक साहित्य आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त वस्तू भेट देऊन वाढदिवसाला सामाजिक बांधिलकीची जोड दिली. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून प्रत्येक शुभेच्छुकाला एक झाड देण्यात आले. ‘एक झाड… भावी पिढ्यांसाठी जीवनाचा श्वास’ हा संदेश देत पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला. पाळधी परिसरात ऑक्सिजन पार्क उभारणार असून त्याची पूर्ण तयारी करण्यात आली आहे. बारा ते पंधरा फूट उंचीची मोठी झाडे लावून भविष्यात हा परिसर हिरवागार करण्याचा संकल्प करण्यात आला.



