भुसावळ : प्रतिनिधी शहरातील सामाजिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी भुसावळचे उपविभागीय दंडाधिकारी जितेंद्र पाटील यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या दोघांवर हद्दपारीची कारवाई केली आहे. संबंधितांवर पोलिस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यांना अनुक्रमे एक वर्ष आणि सहा महिन्यांची हद्दपारीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पहिल्या प्रकरणात शाकिर ऊर्फ गोलू शेख रशीद (वय २९, रा. विवेकानंद शाळेमागे, भुसावळ) याला जळगाव जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. परत येण्याकरिता शासनाची किंवा उपविभागीय दंडाधिकाऱ्यांची लेखी परवानगी आवश्यक आहे. दुसऱ्या कारवाईत, शेख सलीम शेख हमीद (वय ५८, रा. पापानगर, भुसावळ) याच्यावरही गंभीर गुन्हे नोंद असल्याने त्याला सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. त्यालाही…
Author: editor desk
मेष राशी आज तुम्हाला कामावर काम करण्याची इच्छा होणार नाही. तुम्हाला पुन्हा पुन्हा काही अनुचित घटना घडण्याची भीती वाटेल. कोर्ट केसेसमध्ये चांगले वकिली करा. अन्यथा तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते. वृषभ राशी आज, जवळच्या व्यक्तीकडून तुमच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. तुमच्या घरी एक दूरचा नातेवाईक येईल. त्याला भेटून तुम्हाला खूप आनंद होईल. मिथुन राशी आज खूप उंच ठिकाणी चढणे टाळा. अन्यथा, तुमचा अपघात होऊ शकतो. दारू पिऊन कामावर जाऊ नका. तुम्हाला अपमान सहन करावा लागू शकतो. कर्क राशी आज आर्थिक स्थिती सुधारेल. संपत्ती आणि मालमत्ता वाढेल. जमीनीचा जुना वाद मिटेल. पशुपालनात गुंतलेल्या लोकांना चांगले उत्पन्न मिळेल. सिंह राशी आज…
धाराशिव : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना घडत असतांना आता धाराशिव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आर्थिक अडचणीत आल्याने तालुक्यातील बावी येथे एका व्यक्तीने पत्नी, मुलाला संपवून स्वतः गळफास घेत जीवन संपवले. सोमवारी (दि. १६) सकाळी हा प्रकार उजेडात आला. मिळालेल्या माहितीनुसार, बावी येथील लक्ष्मण मारुती जाधव (३०) हा तरुण आर्थिक अडचणीत होता. ऑनलाईन जुगार व रम्मीच्या माध्यमातून अधिक पैसे मिळविण्याच्या हव्यासाने त्याच्यावर कर्जाचा डोंगर झाला होता, अशी माहिती आहे. या नादातच त्याने त्याची काही जमीनही विकल्याचे सांगितले जात आहे. हे कर्ज डोईजड झाल्याने लक्ष्मणने हे कृत्य केल्याचा अंदाज आहे. सोमवारी सकाळी अकरा वाजून गेले तरी घराचा…
एरंडोल : प्रतिनिधी तालुक्यातील रिंगणगाव येथे १३ वर्षीय मुलाची गळा चिरून क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली. तेजस गजानन महाजन (वय १३) असे मृत बालकाचे नाव आहे. या घटनेने गावात शोककळा पसरली असून, हत्येमागे नरबळीचा संशय व्यक्त होत आहे. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेत तपास तीव्र केला आहे. तेजस आपल्या कुटुंबासह रिंगणगावात राहत होता. त्याचे वडील गजानन महाजन शेतीसह कृषी केंद्र चालवतात. सोमवारी (१६ जून) गजानन यांनी तेजसला दुकानावर ठेवून जळगावला कामासाठी गेले होते. संध्याकाळी दुकान बंद करून तेजस घरी येईल, अशी अपेक्षा होती; परंतु तो रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही. कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी रात्रभर शोध घेतला.…
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून शरद पवार व अजित पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चा जोर धरीत असतांना आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुन्हा एकदा महायुतीत सहभागी होण्याचे खुले आवाहन केले आहे. शरद पवार यांना अजूनही वेळ गेली नाही. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत यावे. जर ते आधीच महायुतीत सामील झाले असते, तर आज ते देशाचे राष्ट्रपती झाले असते, असा दावा रामदास आठवलेंनी केला आहे. दरम्यान रामदास आठवले पुढे बोलताना म्हणाले की, राज ठाकरे यांना महायुतीत घेण्यास आमचा विरोध आधीही होता आणि आजही आहे. लोकसभेला भाजपने त्यांना सोबत घेतले होते, पण त्याचा एनडीएला काहीही…
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील जळगाव रोडवरील अंगारा ढाब्यावर जेवण केल्यानंतर बिल मागितल्याच्या कारणावरून ढाबा मालकास चाकू दाखवत लुटमार, शिवीगाळ व मारहाणीचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. सविस्तर वृत्त असे कि, रोशन होलाराम सचदेव (वय ४०, रा. सिंधी कॉलनी, भुसावळ) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १४ जून रोजी संध्याकाळी ४ वाजेच्या सुमारास तस्लीम उर्फ काल्या सलीम शेख व शेख नईम शेख सलीम हे दोघे ढाब्यावर आले होते. दारूच्या नशेत त्यांनी जेवण करून बिल मागितल्यावर सचदेव यांना शिवीगाळ केली व चाकू दाखवून धमकावले. यानंतर त्यांच्या इतर साथीदारांना बोलावून मिळून मारहाण करण्यात आली.…
जळगाव : प्रतिनिधी पोलिसांना पाहून पळ काढणाऱ्या टोळीच्या वाहनाचा पाठलाग करताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या अंगावर गुरे चोरी करणाऱ्यांनी वाहन घातले. ही धक्कादायक घटना अकोला जिल्ह्यात सोमवारी (१६ जून) पहाटे ३:४० वाजता घडली. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आले, अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्री यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील, पोउनि अनिल जाधव, पोहेकॉ दर्शन ढाकणे हे १५ जून रोजी रात्री जिल्ह्यात गस्त घालत होते. मुक्ताईनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कुंड गावात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने एका घराकडे जाणाऱ्या चार…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील कानळदा येथे वडिलांना दोन जण शिवीगाळ व मारहाण करीत असल्याने सोडविण्यासाठी गेलेल्या अभिजित भगवान सपकाळे (१९, रा. कानळदा, ता. जळगाव) या मुलालाही मारहाण करण्यात आली. ही घटना १४ जून रोजी रात्री कानळदा येथे घडली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कानळदा येथील भगवान सुनील सपकाळे यांना त्यांच्या राहत्या घराजवळ दोन जण शिवीगाळ व मारहाण करीत होते. त्यावेळी सपकाळे यांचा मुलगा अभिजित हा सोडविण्यासाठी गेला असता त्यालादेखील मारहाण करण्यात आली. बाप-बेट्यांना लोखंडी कडे मारून दुखापत केली. या प्रकरणी अभिजित सपकाळे याने तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मारहाण करणाऱ्या…
भुसावळ : प्रतिनिधी पालिका अंतर्गत कार्यरत असलेल्या सफाई कामगाराला सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करत असताना शिवीगाळ व नोकरी घालविण्याची धमकी देण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सफाई कामगार उमेश रामलाल जेधे (वय ४१, रा. भारत नगर, भुसावळ) यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी ६:३० वाजता उमेश जेधे नेहमीप्रमाणे आपल्या कर्तव्यासाठी पापा नगर येथे गेले होते. सकाळी आठच्या सुमारास पापा नगर येथील ईकबाल कालू शेख (४५) यांच्या घरासमोरील मुख्य रस्त्यावर साफसफाई करत असताना वाऱ्यामुळे रस्त्यावरील कचरा त्यांच्या घराजवळ गेल्यामुळे ते संतप्त झाले. त्यांनी शिवीगाळ करीत धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान घटनेच्या निषेधार्थ नगरपालिकेच्या…
मेष राशी आज मुलांमुळे आनंद वाढेल. तुम्हाला जवळचा मित्र भेटेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन मित्र मिळतील. नोकरीतहि समाधान वाढेल. व्यवसायात अनोळखी व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवू नका. अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते. वृषभ राशी आज तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तुम्ही उधार दिलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. व्यवसायात परिश्रमपूर्वक काम करा. तुम्हाला चांगला नफा आणि भरपूर यशही मिळेल. पशुपालनात गुंतलेल्या लोकांना यश मिळेल. मिथुन राशी आज, ज्या लोकांना कोणत्याही गंभीर आजाराची भीती वाटते त्यांना त्यांच्या आजाराच्या भीती आणि गोंधळातून आराम मिळेल. तुमचे आरोग्य सुधारेल. तुम्हाला कोणत्याही हंगामी आजाराचा त्रास होऊ शकतो. उगाच धावपळ करू नका. कर्क राशी आज तुम्ही कायदेशीर अडचणीत येऊ…

