Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आज (मंगळवार) मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. धनंजय मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी अन्न व नागरी पुरवठा खात्याचा राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. या खात्याची जबाबदारी आता छगन भुजबळ यांच्याकडे सोपवली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यापासून त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार यावर चर्चेचं वर्तुळ होतं. अखेर अजित पवार गटाने अनुभवसंपन्न आणि ओबीसी समाजातील प्रभावशाली नेते असलेल्या भुजबळ यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने बहुमत मिळवत 288 पैकी 230 जागांवर विजय मिळवला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि…

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना सातत्याने समोर येत असताना आता एक खळबळजनक घटन पुण्यातील वारजे माळवाडी भागातून समोर आली आहे. शिवसेनेच्या युवासेना (शिंदे) जिल्हाप्रमुखाच्या वाहनावार गोळीबार करण्यात आला आहे. निलेश राजेंद्र घारे असे जिल्हाप्रमुखाचे नाव असून, सोमवारी मध्यरात्री त्यांच्या वाहनावर गोळीबार करण्यात आला. यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने या गोळीबाराच्या हल्ल्यात निलेश घारे यांना कुठल्याही स्वरुपाची हानी झालेली नाही, ते सुखरुप असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निलेश राजेंद्र घारे हे आपल्या घरी निघाले होते. दरम्यान, ते वारजे माळवाडी इथल्या गणपती माथा येथील आपल्या जनसंपर्क कार्यालयात आले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी देखील होते. कार पार्क केल्यानंतर…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात गेल्या काही महिन्यापासून लाचखोरीचे प्रमाण वाढले असतांना आता धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यशस्वी सापळा लावून कारवाई करत एका ग्रामपंचायत अधिकाऱ्याला लाच घेताना अटक केली आहे. दिनेश वासुदेव साळुंखे (वय ५३), असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून ते जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील तामसवाडी ग्रामपंचायतीत ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार एक शासकीय बांधकाम ठेकेदार असून त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत तामसवाडी ग्रामपंचायतीमध्ये पाच लाख रुपये किमतीचे रस्ता कॉंक्रिटीकरणाचे काम पूर्ण केले होते. या कामाच्या चार लाख रुपयांच्या बिलाचा चेक मिळाल्यानंतर, तक्रारदार दुसऱ्या कामाच्या चौकशीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात गेले होते. त्यावेळी ग्रामपंचायत अधिकारी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी तेलंगणा राज्यातील सायबराबाद पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत तीन महिन्यांपूर्वी झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी अखेर जळगाव पोलिसांच्या मदतीने जेरबंद झाला आहे. अझहर निजाम खाटीक (रा. मेहरुण) असे या संशयित आरोपीचे नाव असून, तो गुन्हा घडल्यापासून फरार होता.  आरोपीच्या शोधासाठी सायबराबाद पोलिसांचे पथक जळगावात दाखल झाले होते. त्यांनी जळगावचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भेट घेऊन आरोपीबाबत माहिती दिली आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीची विनंती केली. पोलिस अधीक्षकांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखा जळगावचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना सूचना देऊन मदत करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सायबराबाद पोलिसांचे पथक व स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस फौजदार विजयसिंग पाटील व पोलिस…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील रवींद्रनगर भागातील रहिवासी वल्लभ सुभाषचंद्र अग्रवाल (५१) आणि म्हसावद येथील ओम जिनिंग अॅण्ड प्रेसिंगचे मालक अशोक रामकरण पोरवाल या दोन कापूस व्यापाऱ्यांची तब्बल १ कोटी ३५ लाख ७६ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी उत्तराखंडमधील एका वस्त्रोद्योग कंपनीच्या संचालकांसह तिघांवर एमआयडीसी पोलिस ठाण्यात रविवारी (दि. १८) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, वल्लभ अग्रवाल यांनी एमआयडीसी पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीनुसार अग्रवाल यांची उमाळे येथे चिरायू कॉटन इंडस्ट्रीज नावाची जिनिंग फॅक्टरी आहे. ते दलालांमार्फत कापूस खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. तीन वर्षापूर्वी ‘इंडियन कमोडिटीज डॉट कॉम’चे संचालक दिनेश हेगडे यांच्यामार्फत त्यांची ओळख…

Read More

रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील खिर्डी येथील शेती शिवारात निंभोरा पोलिसांनी दोन गावठी पिस्तुलासह एकास अटक केली आहे. ही कारवाई रविवारी रात्री केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. संशयित आरोपीचे नाव अनिल रामलाल बारेला असे आहे. सविस्तर वृत्त असे कि, खिर्डी खुर्द शिवारात शेतकरी निळकंठ पुंडलिक बढे यांच्या मालकीच्या शेतातील घराजवळ एक व्यक्ती दहशत माजविण्याच्या उद्देश्याने दोन गावठी पिस्तूल बाळगून असल्याची माहिती निंभोरा पोलिसांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत झडती घेतली असता दोन गावठी पिस्तूल मॅक्झिनसह मिळून आले.  ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक हरिदास बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अभय ढाकणे, हवालदार योगेश चौधरी, पो. ना. सुरेश पवार, अमोल…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील कुन्हे पानाचे गावात एकाने आत्महत्या केल्याची घटना घडली. बंद घरातून दुर्गंधी सुटल्याने नागरिकांनी दरवाजा उघडताच संदीप वसंत पाटील (४०) या ट्रक चालकाचा मृतदेह घरात आढळला. ही घटना शुक्रवारी दुपारी चार वाजता उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, संदीपची पत्नी माहेरी निघून गेल्याने सध्या तो एकटाच राहत होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे घर बंद होते. याबाबत संदीप पाटील याचे काका एकनाथ पाटील यांनी भुसावळ तालुका पोलिसात माहिती दिली. शुक्रवारी बंद घरातून दुर्गंधी येत असल्याने एकनाथ पाटील व त्यांचा मुलगा गजानन पाटील यांनी जावून पाहिल्यावर संदीपने साडीने गळफास घेतल्याचे दिसले. संदीपच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. मृतदेह…

Read More

मेष राशी नोकरीत स्थान बदलण्याचे संकेत आहेत. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. कला आणि अभिनय क्षेत्राशी संबंधित लोकांना कठोर संघर्ष करावा लागेल. राजकारणात गुंतलेल्या लोकांना एखाद्या उच्चपदस्थ व्यक्तीकडून मार्गदर्शन आणि संगत मिळेल. वृषभ राशी आज प्रेमसंबंधांमधील अडथळे कमी होतील. इतरांच्या फसवणुकीत अडकू नका. काळजीपूर्वक विचार करून आणि तुमच्या बुद्धीचा वापर करून निर्णय घ्या. प्रेमविवाहाची योजना आखणाऱ्यांनी घाई करू नये. विवाहाशी संबंधित कामात येणारे अडथळे दूर होतील. मिथुन राशी आज वडिलांसोबत वाद होऊ शकतो. नको असलेल्या प्रवासाला जावे लागू शकते. आज कोणताही निर्णय घेताना घाई करू नका, नाहीतर पस्तावाल. कर्क राशी जवळपास पूर्ण होत आलेल्या कामात अडथळे येतील. लपलेले शत्रू गुप्त…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जे धाडस दाखवत ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवलं, त्यातून आपली सेना केवळ शौर्यवानच नव्हे तर अतुलनीय आहे, हे पुन्हा सिद्ध झालं. या यशाच्या पार्श्वभूमीवर, आपल्या भारतीय सेनेच्या सन्मानार्थ चाळीसगाव शहरात भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. या यात्रेत खासदार स्मिताताई वाघ, आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह हजारो चाळीसगावकर उत्स्फूर्तपणे सहभागी होत आम्ही सर्व एक असल्याचा संदेश दिला. यावेळी चाळीसगाव तालुक्यातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा व माजी सैनिकांचा चाळीसगावकरांच्या वतीने सत्कार करण्यात आला. सदर तिरंगा यात्रेत चाळीसगाव शहर व ग्रामीण भागातील असंख्य देशप्रेमी नागरिक, युवक-युवती, माता-भगिनी आणि लहानग्यांनी प्रचंड उत्साहाने भाग घेतला.…

Read More

पुणे : वृत्तसंस्था देशात यंदाचा मान्सून वेळीआधीच दाखल होणार आहे. बंगालच्या उपसागरात आणि अंदमान समुद्राच्या दक्षिण भागात मान्सून सक्रिय झाला असून २७ मे पर्यंत मान्सून केरळच्या किनारपट्टीवर दाखल होईल. १ जून ते ५ जूनपर्यंत मान्सून कोकणात दाखल होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राज्यातील काही भागात मागील काही दिवसांपासून पाऊस बरसत आहे. यातच आता राज्यात आजपासून मुसळधार पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. महाराष्ट्रात यंदा मे महिन्याच्या मध्यात हवामानात मोठा बदल दिसून आला. भारतीय हवामान खात्याने पुढील पाच दिवसांसाठी राज्यातील ३३ जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांचा इशारा दिला आहे. पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या चार…

Read More