Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी राज्य शासनाच्या ‘शाळा प्रवेशोत्सव २०२५-२६’ उपक्रमांतर्गत जळगाव जिल्ह्यातील १८६० जिल्हा परिषद, महानगरपालिका व नगर परिषद शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ आज उत्साहात झाला. सर्व शाळांमध्ये नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे औक्षण, पुष्पगुच्छ देऊन, टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. खा. स्मिता वाघ, आ. प्रा.चंद्रकांत सोनवणे, आ. अमोल चिमणराव पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, शिक्षक, पालक व शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनीही या उपक्रमात सहभाग नोंदवत वातावरण आनंदमय केले. अमळनेर तालुक्यातील जवखेडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत झाले. गणवेश, शालेय साहित्य वाटप आणि वृक्षारोपण यासह पर्यावरण…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचे उपमुख्यमंत्री अजित पवार आता वादग्रस्त विधानाने चर्चेत आले आहे. रिलायन्स उद्योग समुहाच्या माध्यमातून जगभरात भारताचा मान उंचावणारे दिवंगत उद्योगपती धीरूभाई अंबानी यांच्याविषयी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वादग्रस्त विधान केले आहे. धीरूभाई अंबानी पेट्रोल पंपावरील पेट्रोल चोरी करून कोट्यधीश झाले, असे ते म्हणालेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांच्या विधानाचा व्हिडिओ पोस्ट करत त्यांना खोचक टोला हाणला आहे. धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरून कोट्यधीश झाले आणि तुम्ही? असा सवाल त्यांनी यासंबंधी केला आहे. बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारन्याची येत्या 22 जून रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या प्रचारात…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली आहे. त्यामुळे या सरकारला केंद्रात आणि महाराष्ट्रात पनवती सरकार म्हणायला हरकत नाही. सातत्याने अपघात, घातपात सुरू असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या माध्यमातून त्यांनी मावळ मधील पुल दुर्घटना आणि मालवण मधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याभोवती खचलेल्या जमिनीबाबत सरकारवर निशाणा साधला आहे. या संदर्भात संजय राऊत म्हणाले की, पुंछ भागात सतरा लोक मारले गेले, त्याच्या आधी पहलगाम येथे 26 महिलांचा सिंदूर उजाडले गेले. अहमदाबादला भयानक असा विमान अपघात झाला. वास्तविक तो अपघात की, आणखी काही? याचा तपास सुरू आहे. यातही महाराष्ट्राचे 15 ते 16 लोक…

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील पुणे येथील मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील जुन्या लोखंडी पुलाच्या कोसळण्याच्या दुर्घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. रविवारी (15 जून 2025) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला, तर 51 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. तर अद्यापही काही जण बेपत्ता आहेत. या संपूर्ण घटनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीट करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. सरकार जर निष्काळजीपणा दाखवणार असेल तर आपणच सतर्क रहायला हवं, असे राज ठाकरेंनी म्हटले आहे. राज ठाकरेंचे ट्वीट – “काल मावळ तालुक्यातील कुंडमाळा गावाजवळ इंद्रायणी नदीवरचा जुना झालेला लोखंडी पूल कोसळला. त्यात अनेक जणं वाहून गेलेत आणि काही…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी झन्ना मन्ना जुगार खेळणाऱ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून धरणगाव, एरंडोल व अमळनेर येथील १२ जणांना अटक करून त्यांच्याजवळून २ लाख ४२० रुपये जप्त करण्यात आले आहेत. पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार टाकरखेडा शिवारातील कंडारी रस्त्यावरील गट नंबर १८० मधील समाधान धर्मा पाटील यांच्या शेतात पत्त्यांचा जुगाराचा अड्डा सुरू आहे. त्यांनी सहायक पोलिस निरीक्षक नामदेव बोरकर, संदीप धनगर, विनोद संदानशिव, अमोल पाटील, जितेंद्र निकुंभे, गणेश पाटील, उज्ज्वलकुमार म्हस्के, प्रशांत पाटील, चरणदास पाटील, उदय बोरसे, राहुल पाटील, नरेश बडगुजर यांच्यासह छापा टाकला. त्यांच्याजवळून २ लाख ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या दोघांनाही…

Read More

जळगाव : प्रतिनिधी नागपूरहून धुळ्याकडे जाणाऱ्या टँकरवरील चालकाला डुलकी लागल्याने ते विरुद्ध दिशेला उभ्या असलेल्या ट्रॉलावर धडकले. सुदैवाने यात कोणाला दुखापत झाली नाही. मात्र वाहनांचे नुकसान झाले. हा अपघात रविवारी (१५ जून) सकाळी ११.३० वाजता आकाशवाणी चौकात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, वापी येथून बॉयलर टैंक घेऊन बिहारकडे जाणारा ट्रॉला (सीजे ०७, सीए ४६८२) आकाशवाणी चौकात सिग्नलजवळ उभा होता. त्यावेळी नागपूरकडून धुळ्याकडे जाणाऱ्या टँकरवरील (जीजे १६ एडब्ल्यू ९६१५) चालक निशांत सिंग (२३, रा. पिलीभीत, उत्तर प्रदेश) याला डुलकी लागली व ते थेट दुभाजक ओलांडून ट्रॉलाच्या चालक कॅबिनजवळ धडकले. सुदैवाने तेथे असलेला ट्रॉलाचालक विरेंद्र जाधव (३५ रा. नालंदा, बिहार) याला दुखापत झाली नाही.…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी वरणगाव येथून जवळ असलेल्या फुलगावजवळ राष्ट्रीय महामार्गावर शनिवार पहाटे ३ वाजेच्या सुमारास झालेल्या विचित्र अपघातात एक जण जागीच ठार तर रिक्षातील तिघे जण जखमी झाले. याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, ट्रक क्रमांक (एम. एच. ३७ टी ६७७१) वरील चालक अजहर खान सखाउल्ला खान (रा. समतानगर, कारंजा लाड, जि. वाशिम) हा भुसावळकडून वरणगावकडे भरधाव वेगाने जात असताना वेस्टन हॉटेल समोरून निघणाऱ्या पिकअप वाहन क्रमांक (एम. एच. १९ सी. वाय. ४५७६) ला जोरदार धडक दिली. या धडकेत पिकअप चालक राजू गुलाब ओंतारे (रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) जागीच ठार झाले. याच…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी शेतातील झाडावर वीज कोसळून त्याखाली आश्रयाला थांबलेले एकाच कुटुंबातील तीनजण ठार, तर दोनजण जखमी झाले. ही हृदयद्रावक घटना कोंगानगर (ता. चाळीसगाव) येथे रविवारी दुपारी २ वाजता घडली. मिळालेल्या माहितीनुसार, दशरथ उदल पवार (वय २४), त्याचा पुतण्या दिलीप पवार (१४, दोघे रा कोंगानगर) आणि शालक समाधान प्रकाश राठोड (९, रा. जेहूर ता. कन्नड जि. छत्रपती संभाजीनगर) यांचा मृतांमध्ये समावेश आहे. यापैकी दशरथ याचा १५ दिवसांपूर्वीच विवाह झाला होता. उदल गणपत पवार व दिलीप उदल पवार हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. पवार कुटुंबीय गावानजीकच्या शेतात रविवारी कपाशी लागवड करण्यासाठी गेले होते. दुपारी दोन वाजता वादळी वाऱ्यासह पावसासह विजांचा…

Read More

मेष : तुम्ही लवकर उठले पाहिजे जेणेकरून तुम्ही तुमचे सर्व काम वेळेवर पूर्ण करू शकाल. दररोज तुमच्या जीवनात हा मंत्र स्वीकारा. जर नोकरी करणारे लोक जोखीम घेऊन कोणतेही काम करत असतील तर त्यांना थोडे सतर्क राहावे लागेल. ब्रह्मा, सर्वार्थ सिद्धी योगाच्या निर्मितीमुळे, कामाच्या ठिकाणी तुमच्या सादरीकरणाची आणि प्रगतीची प्रशंसा होऊ शकते. विद्यार्थ्यांच्या मनात कलात्मक कल्पना येतील. वृषभ : १०-१५ मिनिटांच्या ध्यानाने दिवसाची सुरुवात करा. व्यावसायिकांना सतर्क राहावे लागेल, कारण विरोधक तुमच्या कमकुवतपणाचा फायदा घेऊ शकतात. खेळाडू त्यांचे लक्ष्य साध्य करण्यात यशस्वी होतील. कामाच्या ठिकाणी तुमचे काम लवकर पूर्ण करा. कुटुंबात शक्य तितके शांत रहा, कारण वडीलधाऱ्यांशी वादाची परिस्थिती उद्भवू शकते. मिथुन: दिवसाच्या…

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील पुणे जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जुना पूल कोसळून दुर्घटना घडली आहे. रविवार असल्याने कुंडमळा येथे पर्यटकांची गर्दी होती. यादरम्यान पूल कोसळल्याने 25 ते 30 पर्यटक इंद्रायणीत बुडाल्याची भीती आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस, ग्रामस्थ, रेस्क्यू व्हॅन, फायर टेंडर बोट, एनडीआरएफ पथक आणि आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. दोन दिवसांपासून मावळ परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून इंद्रायणीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. यामुळे नदीत पडलेल्या पर्यटकांना वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न यंत्रणांकडून सुरू आहे. मदत व पुनवर्सन…

Read More