Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था भारतील जनता पक्षाला मुंबईत आणखी मदतीची गरज आहे, असे दिसून येत आहे. म्हणून ते इतर पक्षांसोबत संपर्क साधत असून हॉटेलमध्ये भेटी घेत आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. जयंत पाटील म्हणाले की, रश्मी ठाकरेंच्या हस्तक्षेपामुळे शिवसेना फुटली असे म्हणता येणार नाही. आम्ही संपूर्ण इाकरे कुटुंबियांना जवळून पाहिजे आहे, आम्हाला असे काही वाटत नाही. आगामी निवडणूक आम्ही आमच्या विचाराच्या मविआतील पक्षासोबत लढवू असेही त्यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे. जयंत पाटील म्हणाले की, मुंबई पालिकेच्या 92 हजार कोटी रुपयांच्या ठेवी होत्या .या ठेवी आता रिकाम्या होऊ लागल्या आहेत .2 लाख 36 कोटी…

Read More

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मोहोळ तालुक्यातील लांबोटी गावात शनिवारी रात्री उशिरा पुणे जिल्ह्यातील एका सराईत गुन्हेगारास अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिस आणि आरोपी यांच्यात चकमक उडाली. या चकमकीत शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख (वय अंदाजे 30, रा. गल्ली क्र. 23/ए, सय्यदनगर, हडपसर, पुणे) हा ठार झाला. मिळालेल्या माहितीनुसार शेख याच्यावर हडपसर, वानवडी, कोंढवा, काळेपडळ आदी पुणे शहरातील पोलिस ठाण्यांत खून, खंडणी, घरफोडी, दरोडा अशा स्वरूपाचे 15 पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल होते. त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MOCA) अंतर्गत कारवाई झाली होती, मात्र तो गेली काही दिवस फरार होता. पुणे क्राईम ब्रँचच्या पथकाला…

Read More

डेहराडून : वृत्तसंस्था गुजरात राज्यात विमान अपघाताची घटना ताजी असतांना आज रविवारी पहाटे ५:२० वाजता केदारनाथजवळील गौरीकुंड येथे एक हेलिकॉप्टर कोसळले. यामध्ये पायलटसह सर्व ७ प्रवाशांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका २ वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. हे हेलिकॉप्टर केदारनाथ मंदिरातून गौरीकुंडला भाविकांना घेऊन गेले होते. प्राथमिक माहितीनुसार, खराब हवामानामुळे हा अपघात झाला. हे हेलिकॉप्टर आर्यन एव्हिएशन कंपनीचे आहे. उत्तराखंड नागरी विमान वाहतूक विकास प्राधिकरण (UCADA) नुसार, हेलिकॉप्टरमध्ये उत्तर प्रदेश-महाराष्ट्रातील प्रत्येकी २ आणि उत्तराखंड, राजस्थान, गुजरातमधील प्रत्येकी १ प्रवासी होता. गौरीकुंड येथून NDRF आणि SDRF बचाव पथके रवाना करण्यात आली आहेत. चारधाम यात्रा हेलिकॉप्टर सेवेवर बंदी घालण्यात आली आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह…

Read More

जळगाव : प्रतिनिधी घराशेजारी राहणाऱ्याच्य दुचाकीजवळ तीन वर्षीय बालक खेळत असल्याच्या तरुणाने बालकाला शिवीगाळ केली. त्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन चौघांनी बालकाच्या वडीलांसह काका व आजोबांना बेदम मारहाण केली. तेथे पडलेला विटेचा तुकडा त्यांच्या डोक्यात मारुन जखमी केले. ही घटना दि. १३ रोजी सायंकाळी उस्मानिया पार्क परिसरात घडली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील उस्मानिया पार्क परिसरात मोहम्मद सलीम मोहम्द नजीर शेख (वय ५८) हे वास्तव्यास आहे. दि. १३ रोजी ते घरी असतांना त्यांचा नातू हा घरासमोर खेळत होता यावेळी तो गल्लीत राहणाऱ्या जाकीर कुरेशी यांच्या गाडीजवळ खेळत असल्याचा राग आल्याने तो जोरजोरात शिवीगाळ करु लागला.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी ट्रान्सपोर्ट कार्यालयात पार्सल देण्यासाठी गेलेल्या मुस्तकीम शेख अलीम शेख (वय २०, रा. सुप्रिम कॉलनी) व प्रफुल्ल कोळी (रा. मोहाडी, ता. जळगाव) यांना दोन जणांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच मुस्तकीम यांना लोखंडी पाईपाने मारहाणही करण्यात आली. ही घटना शुक्रवारी दाणाबाजारात घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील सुप्रिम कॉलनीत राहणारे मुस्तकीम शेख अलीम शेख हा तरुण भाटीया मार्केटमधील हार्डवेअरच्या दुकानात कामा आहे. दुकान मालक पवन दांडगे यांनी त्याला दाणा बाजार येथे जावून हिरा धनगर यांच्या ट्रान्सपोर्ट ऑफिसला पार्सल देण्यासाठी सांगितले. त्यामुळे मुस्तकीम हा त्याच्यासोबत काम करणारा प्रफुल्ल कोळी…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी पिंगळवाडे येथील २८ वर्षीय तरुणाचा पाण्याची मोटर सुरू करताना विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना १३ रोजी घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिंगळवाडे येथील सचिन मनोहर पाटील (२८) हा १३ रोजी ४:३० वाजेच्या सुमारास नळाला पाणी आल्याने नवीन घरच्या बांधकामावर पाणी मारण्यासाठी इलेक्ट्रिक मोटर सुरू करण्यास गेला. मात्र मोटार सुरू करताच विजेचा झटका लागून तो फेकला गेला. त्याचा आवाज आल्याने आजूबाजूच्या लोकांनी पाहिले असता तो जमिनीवर पडलेला होता व डाव्या हातात मोटरची वायर होती. लोकांनी विजेचा प्रवाह बंद करत त्याला उचलून खासगी वाहनाने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्याला मृत घोषित करण्यात आले.

Read More

जळगाव : प्रतिनिधी गेल्या तीन दिवसापासून खान्देशातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचे वातावरण असून जळगाव जिल्ह्यात वीज पडून तरुणासह दोन ठार झाले. पाचोरा आणि मुक्ताईनगर तालुक्यात शनिवारी या घटना घडल्या. मोहित जगतसिंग पाटील (२५, रा. खेडगाव नंदीचे, ता. पाचोरा) व शांतीलाल शंकर कठोरे (४४, रा. पूरणाड, ता. मुक्ताईनगर) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. धुळ्यातील शिरपूर तालुक्यातील ताजापुरी गावातील नथ्थू हरचंद सनेर (वय ६३) शेतकऱ्याचाही वीज पडून मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील घटनेत, मोहित हा शनिवारी दुपारी खेडगाव शिवारातील शेतात आई-वडिलांसोबत मका लागवड करीत होता. दुपारी ३ वाजता पाऊस सुरू झाला आणि त्याचवेळी मोहित याच्या अंगावर वीज कोसळली. या…

Read More

मेष राशी आजचा दिवस आनंदाचा आणि प्रगतीचा असेल. महत्त्वाच्या कामात कोणताही मोठा निर्णय तुमच्या वैयक्तिक परिस्थिती लक्षात घेऊनच घ्या. वृषभ राशी आज कामाच्या ठिकाणी निरर्थक वाद टाळा. अन्यथा, सहकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. कधीकधी वातावरण आनंदी तर कधीकधी तणावपूर्ण असू शकते. कामाच्या ठिकाणी महत्त्वाच्या योजना एखाद्या अज्ञात कारणामुळे पुढे ढकलल्या जाऊ शकतात. महिलांचा वेळ हास्य आणि विनोदात जाईल. मिथुन राशी तरुण मित्रांसोबत बाहेर जाण्याची योजना आखतील. भौतिक सुख, समृद्धी आणि व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. सामाजिक, राजकीय चर्चा किंवा वादविवाद टाळा. कर्क राशी आज तुम्ही कायदेशीर अडचणीत येऊ शकता. ज्यामुळे तुम्हाला प्रचंड शारीरिक आणि मानसिक त्रासाला तोंड द्यावे लागेल. दुविधा निर्माण…

Read More

नवी दिल्ली: वृत्तसंस्था देशातील प्रत्येक व्यक्तीची ओळख आधारकार्ड झाली आहे. याच आधारकार्ड बाबत एक मोठी घोषणा आता केंद्र सरकारने केली आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची अंतिम मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे. यापूर्वी ही मुदत १४ जून २०२५ रोजी संपणार होती, ती आता १४ जून २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. UIDAI ने आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ द्वारे ही माहिती दिली. या निर्णयामुळे ज्या नागरिकांनी अद्याप आपले आधार कार्ड अपडेट केलेले नाही, त्यांना आणखी एक वर्षाचा कालावधी मिळाला आहे. विशेषतः ज्या व्यक्तींचे आधार कार्ड १० वर्षे किंवा त्याहून अधिक जुने आहे, त्यांनी एकदाही ते अपडेट…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्याच्या संतापाने आता भाजपचे आमदार संजय कुटे यांचे निवासस्थान पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास जळगाव जामोद येथे हा प्रकार घडला. संग्रामपूर तालुक्यातील एका अतिवृष्टी पीडित शेतकऱ्याने नुकसान भरपाई न मिळाल्याने संतापाच्या भरात हे कृत्य केले. याप्रकरणी, संबंधित शेतकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये यंदा मे महिन्याच्या शेवटीच जोरदार पावसाने हजेरी लावली. परिणामी, शेतपिकांसह फळबागांचेही मोठे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले असतानाही, शासनाच्या मदतीची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत अजूनही कोणतीही ठोस मदत पोहोचलेली नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. अतिवृष्टीमुळे…

Read More