धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील चमगाव येथील धनराज योगराज सावंत (वय ४९) यांनी चमगाव शिवारातील स्वतःच्या शेतात कांदा चाळीजवळ विषारी कीटकनाशक औषध सेवन केल्याने १९ मे रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास त्यांना जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल केले होते. उपचार सुरू असताना रात्री त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई असा परिवार आहे. त्यांच्या शेतात पीक न आल्याने त्यांनी विष प्राशन केल्याचे समजते. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी शहरातील नेहमीच गजबजलेल्या टॉवर चौकात पुन्हा एकदा चोरट्यांनी आपला हात साफ केला आहे. शनिवारी सायंकाळी ५.१५ वाजता बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत एका ५२ वर्षीय महिलेच्या हातातील पर्स अज्ञात चोरट्याने लंपास केली. पर्समध्ये असलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा १४ हजारांचा ऐवज चोरट्यांनी पळवला आहे. विशेष म्हणजे घटना घडलेल्या ठिकाणापासून पोलीस स्थानक हाकेच्या अंतरावर आहे. म्हणजे पोलीस स्थानकाच्या समोरचा चोरट्यांची दादागिरी वाढली की काय अशी चर्चा सुरु झाली आहे. सविस्तर वृत्त असे कि, जानकाबाई भगवान पाटील (वय ५२, रा. गुर्जर अळी, चोपडा) या रविवारी सायंकाळी चोपडा येथे जाण्यासाठी टॉवर चौकात बसची वाट पाहत उभ्या होत्या. चोपडा बस आल्यानंतर जानकाबाई…
जळगाव : प्रतिनिधी यावल येथील एका माध्यमिक शिक्षकाला ट्रेडींगमध्ये भरघोस नफ्याचे आमिष दाखवून तब्बल ७ लाख ६२ हजार रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी फसवणूक झालेल्या शिक्षकाने जळगाव सायबर पोलिस ठाण्यात एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नंदकिशोर दत्तू भारुडे (वय ५२, रा. यावल) असे फसवणूक झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. शिक्षकाला ३० मार्च रोजी एका व्हॉटसअॅप ग्रुपमधून ट्रेडींगमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एक अॅप डाउनलोड करण्यास सांगितले गेले. सौजन्या गिल नावाच्या महिलेने भारुडे यांना ‘व्हिआयपी ६५’ या व्हॉटसअॅप ग्रुपवर सहभागी करून घेतले. वेगवेगळ्या ट्रेडींग ग्रुपमध्ये सामील करून, ‘मोठा नफा मिळेल’ असे आमिष दाखवण्यात आले. चोरट्यांनी भारुडे यांना सुरुवातीला…
चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगाव पोलिस खात्याचे ब्रीद असणाऱ्या सद्रक्षणाय खलनिग्रहणायचा अर्थ आहे सज्जनांचे रक्षण करणे आणि दुर्जनांचा नाश करणे. चाळीसगावला याउलट घडले. पोलिसांनीच खंडणी घेतल्यामुळे वर्दी डागाळली आहे. पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनाही हे प्रकरण भोवले आहे. अवघ्या सात महिन्यांत त्यांची उचलबांगडी झाली आहे. त्यांना कंट्रोल रूमला पाठवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहरातील गुन्ह्याचा आलेख गेल्या काही वर्षात वाढला आहे. थेट गोळीबाराच्या घटना घडल्या. टोळीयुद्धाचा भडकादेखील शहरवासीयांनी अनुभवला. पोलिस दलातील सुंदोपसुंदीचे प्रकारही समोर आले आहेत. दरम्यान, खंडणी प्ररकणातील आरोपी पोलिस हवालदार अजय पाटील याला निलंबित करण्यात आले आहे. जळगावला पोलिस निरीक्षक नियंत्रण कक्षात त्यांची बदली करण्यात आल्याची माहिती अपर…
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील महेलखेडी येथील महिलेने पतीसोबत जात असताना गाडी थांबविण्यास सांगितले व थेट विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सविस्तर वृत्त असे कि, मुस्कान अल्ताफ तडवी (२०) ही दुचाकीने पती अल्ताफ रहेमान तडवी (रा. महेलखेडी) यांच्यासोबत दुचाकीवर जात होती. दरम्यान, विरावली गावाच्याजवळ शेत गट क्रमांक ५७ येथे पतीला दुचाकी थांबविण्यास सांगितले, दुचाकीवरून उतरून तिने विहिरीकडे धाव घेतली. विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. पती अल्ताफ तडवी यांनी आरडाओरड केली. नागरिकांनी धाव घेत विवाहितेला विहिरीतून बाहेर काढले. यावल ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात…
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील कोरपावली येथून पुतण्या काकूला घेऊन यावल बसस्थानकावर येत असताना शहराच्या बाहेर तालुका कृषी कार्यालयाच्यासमोर स्कूलबसने धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी सकाळी ६:४५ वाजता झाला. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील कोरपावली येथील रहिवासी विशाल कुशल येवले हा युवक मंगळवारी पहाटे काकू निशा जितेंद्र येवले (वय २०) यांना दुचाकीने (एमपी ०७ एनपी ३०७२) यावल बसस्थानकावर सोडण्यासाठी येत असताना त्यांना बसची (एमएच १९ वाय ७१९८) धडक बसली. या अपघातामध्ये विशाल येवले व निशा येवले दोघे जागीच ठार झाले. रवी भालेराव, उमेश जावळे यांच्या मदतीने मृतदेह तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. या अपघातप्रकरणी कुशल पांडुरंग येवले यांच्या फिर्यादीवरून…
मेष राशी श्रीगणेश म्हणतात की, आज कुटुंब आणि नातेवाईकांसोबत चांगला वेळ घालवला जाईल. तुमच्या संपर्कातील आणि मित्रांसोबत भेटीगाठी फायदेशीर ठरतील. काही काळापासून तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्त्वात अधिक सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहात, त्यामुळे तुम्हाला सामाजिक आणि कौटुंबिक प्रोत्साहन देखील मिळू शकते. कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत कोणतेही महत्त्वाचे संभाषण किंवा काम करण्यापूर्वी, त्यावर चांगली चर्चा करा आणि त्याची चौकशी करा. लहानशा निष्काळजीपणामुळे तुमची फसवणूक होऊ शकते. व्यावसायिक कामांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करायचा नाही. वृषभ राशी श्रीगणेश म्हणतात की, तुम्ही तुमच्या प्रभावी आणि गोड बोलण्याने इतरांवर तुमचा प्रभाव टिकवून ठेवाल. लोक तुमच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होऊ शकतात. घरात एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीचे आगमन देखील…
चोपडा : प्रतिनिधी शहरातील स्वस्तिक टॉकीज परिसरात भरधाव बसचे ब्रेक फेल झाल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकी दुचाकींना चिरडले असून या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर इतर २ जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवार २० मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली आहे. जखमीवर उपजिल्हारूग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी रूग्णालयात धाव घेतली आणि मयतांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. दरम्यान ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सविस्तर वृत्त असे कि, चोपडा शहरातील गजबजलेल्या भागात आज भरधाव वेगाने येणाऱ्या बसने दोन दुचाकींना चिरडल्याची धक्कादायक घटना मंगळवारी २० मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यात सरकारने राज्याच्या नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर केले. या निर्णयांतर्गत सरकार सुमारे 70 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. मंत्रिमंडळाने धुळे जिल्ह्यातील सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेच्या 5329.46 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चासही मान्यता दिली आहे. या प्रकल्पामुळे 52,720 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज राजभवनात आयोजित एका छोटेखानी सोहळ्यात कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह…
नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात पावसाचा कहर सुरु असतांना अवकाळीचा फेरा सुरूच असून सोमवारी जिल्ह्याच्या बहुतांशी भागात वादळीवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. निफाड तालुक्यात मौजे सुकेणे येथे वीज अंगावर पडून शेतकरी दिपक रंगनाथ रहाणे (40) ठार झाले तर नाशिक तालुक्यात जातेगाव येथे बारावर्षीय आदित्य राजाराम वळवे या मुलाच्या अंगावर वीज कोसळल्याने तो गंभीर जखमी झाला. येवल्यात विवाहितेच्या अंगावर होडिंग पडल्याने गंभीर जखमी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिंडोरी तालुक्यातही अवकाळीने थैमान घातले. वादळवार्यांसह जोरदार पावसामुळे सप्तश्रृंगी गडाकडे जाणार्या रस्त्यावर दगड कोसळल्याने चारचाकी वाहनाचे नुकसान झाले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. चांदवडला पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. वडगाव पंगू येथे पोल्ट्री फार्मवर सोमवारी…

