जळगाव : प्रतिनिधी शहरात बॅटरी चोरीचे प्रकार वाढले असताना, एमआयडीसी पोलिसांनी २४ तासांच्या आत एका चोरीचा छडा लावला आहे. अजिंठा चौफुली येथील चौधरी बॅटरी ट्रेडिंग या दुकानातून ४१ जुन्या बॅटऱ्या चोरून नेणाऱ्या दोन संशयित आरोपींना पोलिसांनी तेल्हारा, जि. अकोला येथून अटक केली असून, त्यांच्याकडून सहा लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, १७ मे रोजी, अब्दुल्ला किताबुल्ला चौधरी यांच्या दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी ४१ हजार रुपये किमतीच्या ४१ जुन्या बॅटऱ्या चोरल्या होत्या. १९ मे रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे प्रभारी…
Author: editor desk
भुसावळ : प्रतिनिधी पतीने घरगुती कारणावरून झोपलेल्या पत्नीवर लोखंडी हातोड्याने हल्ला करत जबर जखमी केल्याची घटना २० मे रोजी पहाटेच्या सुमारास किन्ही एमआयडीसी परिसरातील एका बांधकामस्थळी पत्र्याच्या शेडमध्ये घडली. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीच्या माहितीनुसार, संशयित आरोपी संतोष लालिया खर्ते (रा. रूकगड, म.प्र, ह.मु, किन्ही एमआयडीसी) हा दि. २० मेच्या रात्री १ ते ३ वाजण्याच्या सुमारास पत्री शेडमध्ये झोपलेल्या पत्नी आशाबाईकडे आला. घरगुती कारवावरुन त्यांच्यात वाद झाला आणि रागाच्या भरात संतोषने लोखंडी हातोड्याने आशाबाईच्या डाव्या कानाजवळ जोरदार मारहाण केली. त्यामुळे तिला गंभीर दुखापत झाली. हल्ल्यानंतर आरोपीने वापरलेला हातोडा घटनास्थळी टाकून पळ काढला. दरम्यान, जखमी…
भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील साकरी फाट्याजवळ दीपनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर बुधवारी दुपारी एक कार पलटली. या अपघातात आरोषी विजय बशीरे (वय ४, रा. निंभोरा, ता. भुसावळ) हिचा जागीच मृत्यू झाला जुना फेकरी टोल नाका परिसरात महामार्गावर कार (क्रमांक एमएच ०४ जीएम ०६८०) उलटली. या अपघाताची माहिती डॉ. लोकेश नेहेते यांनी पोलिसांना दिली. त्यांच्या खबरीवरून भुसावळ तालुका पोलिस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस कर्मचारी संदीप बडगे करीत आहेत.
अमळनेर : प्रतिनिधी येथील रहिवासी व नुकताच साखरपुडा झालेल्या इन्साफ खान या तरुणाने त्याचा मित्र मयूर गांगुर्डे बुडताना वाचविताना यास स्वतःचा जीव गमावल्याची घटना धुळे तालुक्यातील अवधान शिवारात घडली. इन्साफ आजाद खान (वय २२, अमळनेर) असे मित्राला वाचवताना मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे कि, इन्साफ व मयूर मोहन गांगुर्डे (वय २५, दोन्ही रा. अमळनेर) हे दोघे धुळे येथील एसव्हीकेएम महाविद्यालयात बी. फार्मसीच्या अंतिम वर्षाचे शिक्षण घेत होते. दोघेही मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता अवधान शिवारातील धरणावर गेले होते. यावेळी मयूरचा तोल गेल्याने तो धरणाच्या पाण्यात बुडू लागला. हे पाहून इन्साफने त्याला हात देत बाहेर काढले; मात्र हे करीत…
भुसावळ : प्रतिनिधी शहरात बुधवारी सकाळी तापी नदीत अंघोळीसाठी गेलेल्या जालना येथील मामा-भाच्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. रामराजे नंदलाल नाटेकर (वय ५५) आणि आर्यन नितीन काळे (वय २१) अशी मृतांची नावे आहेत. सविस्तर वृत्त असे कि, दोघेही मूळचे जालना जिल्ह्यातील रहिवासी असून पेंढारवाडा भुसावळ येथे संदीप हरिश्चंद्र रणधीर यांच्याकडे कार्यक्रमासाठी आले होते. सकाळी १० वाजेच्या सुमारास रामराजे नाटेकर हे आर्यन याच्यासोबत तापी नदीपात्रात अंघोळीसाठी गेले होते. अंघोळ करताना अचानक पाय घसरल्याने दोघेही नदीत बुडाले. परिसरातील नागरिकांनी दोघांनाही ट्रामा केअर सेंटरमध्ये नेण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. सुमन चौधरी यांनी त्यांना मृत घोषित केले.
मेष राशी आज वेळेअभावी योजना राबविण्यात अडचणी येतील. व्यवसायातील स्थिरतेमुळे हे शक्य आहे. शेजाऱ्यांशी संबंध चांगले राहतील. धर्म किंवा अध्यात्म यासारख्या विशिष्ट विषयात अचानक श्रद्धा जागृत होईल. सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. वृषभ राशी आज काही महत्त्वाचे काम विनाकारण थांबू शकते किंवा काम बिघडू शकते. कोणत्याही कामात नवीन सहकारी फायदेशीर ठरतील. तुमच्या नोकरीत तुम्हाला कामाचा आनंद मिळेल. कोर्ट केसेसमध्ये तुम्हाला यश मिळेल. राजकारणात सावधगिरी बाळगा. मिथुन राशी आज तुम्ही काही जुने प्रकरण जिंकाल. तुम्हाला कोणत्याही प्रकारे यश मिळेल. व्यवसायात नवीन करार होतील. तुम्ही व्यवसायाच्या सहलीवर जाऊ शकता. नोकरीत पदोन्नतीची शक्यता राहील. राजकारणात तुम्हाला फायदे आणि उच्च पद मिळू शकते.…
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून भारताने पाकिस्तानमधील दहशतवादीना ठार केले होते त्यानंतर भारताने पाकच्या कुरापती जगापुढे मांडण्यासाठी विविध देशांत एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. पण खासदार संजय राऊत यांनी बुधवारी पुन्हा एकदा या प्रकरणी सरकारवर निशाणा साधत या शिष्टमंडळाला टूर्स अँड ट्रॅव्हल्सची उपमा दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 200 देशांचा दौरा केला, पण काहीही फायदा झाला नाही, असेही ते म्हणालेत. संजय राऊत म्हणाले की, मला कुणावरही टीका करायची नाही. पण ज्या प्रकारे हे शिष्टमंडळ पाठवण्याचा प्रयत्न झाला तो काही बरोबर नाही. सरकारने ज्या देशांत शिष्टमंडळ पाठवण्याचा…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात आज सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले. या चकमकीदरम्यान, सुरक्षा दलांनी २७ नक्षलवाद्यांना ठार केले आहे. ज्यामध्ये वसवराजूचा समावेश होता, ज्याच्यावर १ कोटी रुपयांचे बक्षीस होते. या चकमकीत एक जवान देखील शहीद झाला तर एक जखमी झाला असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अबुझमद परिसरात सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली.” नारायणपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक प्रभात कुमार म्हणाले की, जिल्ह्यातील अबुझमद भागातील माड विभागात नक्षलवाद्यांच्या उपस्थितीच्या माहितीच्या आधारे, जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) नारायणपूर, डीआरजी दंतेवाडा, डीआरजी बिजापूर आणि डीआरजी कोंडागाव यांचे संयुक्त पथक…
पुणे : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने शेतकऱ्यांचे हितासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जमिनीची हिस्सेवाटप मोजणी आता केवळ 200 रुपयात होणार आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. या निर्णयामुळे शेतीची तसेच जमिनीची मोजणी आणि हिस्सेवाटप आता कमी खर्चात होणार आहे. अवघ्या 200 जमिनीची हिस्सेवाटप मोजणी होणार आहे. महाराष्ट्र सरकारने मोजणी शुल्कात मोठी कपात केली आहे. 200 रुपये शुल्क भरून एकत्र कुटुंबाच्या जमिनीचे नोंदणीकृत वाटणीपत्र आणि नकाशे देण्याचा महत्त्वाचा निर्णय महसूल मंत्र्यांनी घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांवर आर्थिक भार पडू नये हाच या निर्णयामागचा उद्देश असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे. यापूर्वी हिस्सेमोजणी शुल्क जवळपास एक…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती व महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता सर्वोच्च न्यायालयाने आगामी चार महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि पक्ष संघटनात्मक बदल करण्यासाठी अॅड. आंबेडकर हे लातूरमध्ये दाखल झाले होते. त्यांनी लातूरच्या दयानंद सभागृहात पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे लवकरच भाजपमय होतील, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात वेगळ्याच हालचाली सुरु झाल्या आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात शरद पवार गट सामील होईल असेच काहीसे चित्र आहे. त्यामुळे लवकरच शरद पवार देखील भाजपमय होतील, असं प्रकाश…

