Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » खळबळजनक : शिंदेसेनेच्या जिल्हाप्रमुखाच्या वाहनावार गोळीबार !
    क्राईम

    खळबळजनक : शिंदेसेनेच्या जिल्हाप्रमुखाच्या वाहनावार गोळीबार !

    editor deskBy editor deskMay 20, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे : वृत्तसंस्था

    राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना सातत्याने समोर येत असताना आता एक खळबळजनक घटन पुण्यातील वारजे माळवाडी भागातून समोर आली आहे. शिवसेनेच्या युवासेना (शिंदे) जिल्हाप्रमुखाच्या वाहनावार गोळीबार करण्यात आला आहे. निलेश राजेंद्र घारे असे जिल्हाप्रमुखाचे नाव असून, सोमवारी मध्यरात्री त्यांच्या वाहनावर गोळीबार करण्यात आला. यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने या गोळीबाराच्या हल्ल्यात निलेश घारे यांना कुठल्याही स्वरुपाची हानी झालेली नाही, ते सुखरुप असल्याची माहिती मिळत आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, निलेश राजेंद्र घारे हे आपल्या घरी निघाले होते. दरम्यान, ते वारजे माळवाडी इथल्या गणपती माथा येथील आपल्या जनसंपर्क कार्यालयात आले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी देखील होते. कार पार्क केल्यानंतर त्यांच्या कारच्या मागच्या दरवाजाच्या काचेवर दुचाकीवरुन आलेल्या दोघा अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या कारवर गोळीबार केला. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. या प्रकरणाचा तपास वारजे पोलीस करत आहेत. निलेश घारे हे शिंदेंच्या शिवसेनेच्या युवासेना जिल्हाप्रमुख आहेत.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मंत्री गडकरी यांचा थेट इशारा : मी देशभर हात धुवून मागे लागलो आहे !

    December 15, 2025

    महापालिका निवडणुकांचा बिगुल ; ‘या’ दिवशी होणार मतदान !

    December 15, 2025

    निवडणूक घोषणांपूर्वीच तणाव; मनसे कार्यकर्ते आक्रमक

    December 15, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.