Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तेलंगणातील खून प्रकरणी संशयिताला जळगावातून अटक !
    क्राईम

    तेलंगणातील खून प्रकरणी संशयिताला जळगावातून अटक !

    editor deskBy editor deskMay 20, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    तेलंगणा राज्यातील सायबराबाद पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत तीन महिन्यांपूर्वी झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी अखेर जळगाव पोलिसांच्या मदतीने जेरबंद झाला आहे. अझहर निजाम खाटीक (रा. मेहरुण) असे या संशयित आरोपीचे नाव असून, तो गुन्हा घडल्यापासून फरार होता.  आरोपीच्या शोधासाठी सायबराबाद पोलिसांचे पथक जळगावात दाखल झाले होते. त्यांनी जळगावचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भेट घेऊन आरोपीबाबत माहिती दिली आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीची विनंती केली.

    पोलिस अधीक्षकांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखा जळगावचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना सूचना देऊन मदत करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सायबराबाद पोलिसांचे पथक व स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस फौजदार विजयसिंग पाटील व पोलिस हवालदार अक्रम शेख यांनी गुप्त माहितीच्या आधारे पथकाने मेहरुण परिसरात सापळा रचला. १६ मे रोजी रात्री सुमारे ११.३० वाजता पाठलाग करून पोलिसांनी संशयित आरोपी अझहर निजाम खाटीकला ताब्यात घेतले. पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला सायबराबाद पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मनोज जरांगे पुन्हा आक्रमक; ‘माझा घातपात करण्याचा कट सरकारकडून दडपला जातोय’

    December 8, 2025

    मध्यरात्री महिलेच्या घरात शिरून केला विनयभंग !

    December 8, 2025

    बायपासवर भीषण अपघात; कार दोनदा उलटून थेट ट्रेलरच्या डिझेल टॅंकवर धडक

    December 8, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.