Author: editor desk

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जगभरात भारताच्या ऑपरेशन सिंदूरच्या यशाचे खूप कौतुक झाले. या काळात भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. आता ऑपरेशन सिंदूरबाबत पाकिस्तानच्या कागदपत्रात एक मोठा खुलासा झाला आहे. भारतीय सैन्याने दिलेल्या वृत्तापेक्षा पाकिस्तानचे जास्त नुकसान झाल्याचा दावा केला जात आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान, भारताने फक्त दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला होता, परंतु त्यानंतर पाकिस्तानी सैन्याने मोर्चा उघडला. त्याने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून भारतातील अनेक शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतीय सैन्याने तो हाणून पाडला. प्रत्युत्तर म्हणून त्याने पाकिस्तानचे अनेक हवाई तळ उद्ध्वस्त केले. पाकिस्तानच्या लष्करी तळांचे मोठे नुकसान झाले. ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानने…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी “संत कधीच स्वार्थ बघत नाहीत, तेच खरे संत थोर. देवापेक्षा संत मोठे आहेत, कारण संतांमुळेच देवाची अनुभूती घडते,” असे भावपूर्ण प्रतिपादन सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. बाळू महाराज गिरगावकर यांनी पाळधी येथे केले. ते पुढे म्हणाले की, “पतिव्रतेच्या भक्तीला देवही नमतो, पती परमेश्वर हेच देवाचे रूप आहे. तुकोबाराय म्हणतात – तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता’ म्हणजेच भक्तीची ती पराकाष्ठा आहे,” असे सांगत त्यांनी उपस्थित भाविकांना अंतर्मुख केलं. संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचा आधार घेत त्यांनी संतांचे महात्म्य, भक्तीचा प्रभाव, आणि समाजातील नातेसंबंधांतील आध्यात्मिक दृष्टीकोन प्रभावीपणे मांडला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात बाळू महाराज गिरगावकर यांचे…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था जून महिन्याची सुरुवात झाली असतांना गेल्या मे महिन्यात राज्यभर आढळलेल्या रुग्णांची संख्या 477 वर पोहोचली असून, आतापर्यंत दहा जणांचा बळी गेला आहे. सोमवारी ठाणे महापालिकेत 4, पुणे 1, पुणे मनपा 17 , सातारा 2, कोल्हापूर 2, सांगली 1, छत्रपती संभाजीनगर 1,छत्रपती संभाजीनगर 7, चिंचवड महापालिकेत 2 असे नवीन रुग्ण आढळले. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, जानेवारीपासून आतापर्यंत 12011 कोविड चाचण्या घेण्यात आल्या. यापैकी 873 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. आतापर्यंत एकूण 359 रुग्ण बरे झाले असून, सक्रिय रुग्णांची संख्या 494 वर पोहोचली आहे. सध्या राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना महामारीच्या काळात शासकीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले होते.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी लग्न जुळवणाऱ्या साईटवर ओळख होऊन धुळे येथील घटस्फोटीत महिलेला लग्नाचे आमिष दाखवत भेटायला बोलावून तिच्यावर बुलढाणा जिल्ह्यातील तरुणाने अत्याचार केल्याची घटना १८ मे रोजी जळगाव रेल्वे स्थानकाजवळील एका हॉटेलमध्ये घडली. या प्रकरणी विनोद शिवराम कुसळकर (रा. वडपुरा रामनगर, जि. बुलढाणा) याच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सविस्तर वृत्त असे कि, धुळे येथील ३५ वर्षीय नोकरदार महिलेचा घटस्फोट झालेला आहे. तिची व विनोद कुसळकर याची लग्न जुळवणाऱ्या साईटवर ओळख झाली. तरुणाने या महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तिला १८ मे रोजी जळगावात भेटायला बोलावले. दोघेही येथे आल्यानंतर रेल्वे स्थानकाजवळील एका हॉटेलमध्ये गेले. तेथे या तरुणाने महिलेवर अत्याचार…

Read More

जळगाव : प्रतिनिधी कर्ज वाढल्याने तणावात असलेल्या गणेश अशोक पाटील (४३, रा. वडली, ता. जळगाव) या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (२ जून) दुपारी वडली येथे घडली. घराबाहेर बसलेली पत्नी बोलविण्यासाठी गेली त्यावेळी तिला पती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. सविस्तर वृत्त असे कि, गणेश पाटील यांनी शेतीसाठी कर्ज घेतलेले होते. ते फेडण्याची विवंचना होती. त्यांनी शेती विकण्याचेही बोलून दाखविले होते. सोमवारी दुपारी, गणेश यांनी गळफास घेतला. पत्नी चहाला म्हणून बोलविण्यासाठी गेली असता पतीने गळफास घेतलेला होता. गणेशला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. मयताच्या पश्चात वडील, पत्नी, एक मुलगी व एक…

Read More

जळगाव : प्रतिनिधी ऑस्ट्रेलियामध्ये राहणाऱ्या मुलीकडे दाम्पत्य गेलेले असताना त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी चार तोळ्यांचे दागिने चोरून नेल्याची घटना १५ मे ते १ जूनदरम्यान पिंप्राळा परिसरातील मारुती पार्क परिसरात घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, सेवानिवृत्त असलेले नरेंद्र दौलतराव वाघ व त्यांच्या पत्नी १५ मे रोजी ऑस्ट्रेलियामध्ये राहणाऱ्या मुलीकडे गेले. त्यावेळी चोरट्यांनी कपाटातून ३० ग्रॅमची सोन्याची चेन व १० ग्रॅमच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, असा एकूण एक लाख २५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला चोरट्यांनी घरातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर काढून नेला आहे. त्यामुळे फुटेज मिळण्यास अडचणी येत आहेत. घटनास्थळी रामानंदनगर…

Read More

चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील गलंगी गावाजवळ गोरक्षकांच्या मदतीने ग्रामीण पोलिसांनी मालेगाव येथे जाणाऱ्या १८ उंटांना पकडत जीवनदान दिल्याची घटना घडली होती. यातील चौघं आरोपींना चोपडा न्यायालयात हजर केले असता त्यांना ५ जूनपर्यंत तीन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील गोरक्षक जिग्नेश कंखरे संग्राम परदेशी, पंकज नरवाडे आदींनी पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना गलंगी गावाजवळ दोन ट्रकमधून काही उंटांची वाहतूक केली जात असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करीत हरी नायक, मोतीलाल नायक दोन्ही रा. इंदूर (म.प्र.) खलीद खान रा. देवास (म.प्र.). सहाम फकरू बागवान रा. धार (म.प्र.) यांना उंट कत्तलीसाठी तस्करी करत असल्याचा गुन्हा दाखल…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील १४ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून तसे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी (२ जून) काढले. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक एमआयडीसीत तर एमआयडीसीचे संदीप पाटील एलसीबीचे प्रभारी अधिकारी झाले आहेत. जळगाव जिल्ह्यातील सार्वत्रिक बदल्यांमध्ये प्रशासकीय कारणास्तव पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक या अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले. यामध्ये वर्षभरापूर्वीच स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळणारे बबन आव्हाड यांची पुन्हा एमआयडीसीमध्ये बदली करण्यात आली आहे. एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्याकडे स्थानिक गुन्हे शाखेची धुरा देण्यात आली आहे. त्यांनी सोमवारी रात्रीच पदभार स्वीकारला. चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्याच्या…

Read More

अमळनेर  : प्रतिनिधी तापी नदीत पोहण्यासाठी गेलेली दोन मुले बुडाली. ही घटना निम ता. अमळनेर येथे सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. यापैकी एकाचा मृतदेह आढळला आहे. सविस्तर वृत्त असे कि, अमळनेर तालुक्यातील निम येथील  मयूर ऊर्फ हरीश बाळू पाटील (१२) आणि चेतन धनराज पवार (९) हे दोघे सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास तापी नदीवर पोहण्यासाठी गेले होते. सायंकाळी ४ वाजेपर्यंत परत ते परतले नाहीत, म्हणून शोधाशोध सुरू झाली त्यात चेतनला पोहता येत नव्हते. घटना समजताच मारवाड पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक जिभाऊ पाटील, हेकॉ. संजय पाटील, आगवणे, फिरोज बागवान हे घटनास्थळी पोहचले. रात्री ८ वाजेच्या सुमारास चेतन याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. तर…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा दोरीच्या साहाय्याने गळा आवळून खून करत पतीनेही आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील हातगाव येथे २ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी मृत पतीच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील हातगाव येथील विजय सुकदेव चव्हाणके (४५) हा पत्नी वर्षा (४०), मुले तसेच आईसह हातगाव शिवारात शेतात राहत होता. त्याचे गेल्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या अपघातामुळे मानसिक संतुलन बिघडले होते. त्यामुळे त्याचे आणि त्याच्या पत्नीचे कौटुंबिक कारणातून वाद होत असत. यातून तो पत्नी वर्षा यांच्या चारित्र्यावर संशय घेत असे. २ रोजी सकाळी ११:२५…

Read More