Author: editor desk

मेष राशी तुमच्या कामाच्या पद्धतीत सकारात्मक बदल करण्याचा प्रयत्न करा. निरुपयोगी वादात अडकू नका. तुम्हाला परीक्षा किंवा स्पर्धेशी संबंधित काम, अभ्यास करण्याची इच्छा होणार नाही. मन इकडे-तिकडे भटकत राहील. वृषभ राशी आज तुम्हाला जवळचा मित्र भेटू शकतो. कोणतेही प्रलंबित काम पूर्ण होऊ शकते. न्यायालयीन प्रकरणांमध्ये वेळेवर काम करा. तुरुंगात असलेल्या लोकांना तुरुंगातून सुटका मिळू शकते. तुम्हाला काही अनावश्यक कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. मिथुन राशी आज तब्येत थोडी नरम असेल. आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. शारीरिक आरोग्याकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असेल. कर्क राशी आज तुम्हाला छान बातमी मिळू शकेल. नातेवाईक आणि जवळच्या मित्रांच्या मदतीने कामाच्या क्षेत्रातील अडचणी कमी होतील.…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील महाविकास आघाडी व महायुतीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजपने ‘सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता’ हे समीकरण चांगलं खेळलं आहे. नागपूर महापालिकेत अनेक समस्या प्रलंबित असताना भाजपने केवळ पैशाच्या बळावर सत्तेवर ताबा मिळवण्यावर भर दिला आहे. शहराच्या विकासाऐवजी सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचाराचा मार्ग स्वीकारला आहे. आम्ही हे सर्व प्रश्न जनतेसमोर मांडणार आहोत. महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांनी नागपूरच्या विकासाऐवजी फक्त व्यक्तिगत फायद्यासाठी निर्णय घेतले आहेत. केंद्रीय मंत्री गडकरी आणि मुख्यमंत्री फडणवीस हे नागपूरचेच असूनही शहराच्या विकासाकडे त्यांचं दुर्लक्ष झालं आहे, असा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने मोठा आणि धाडसी निर्णय घेतला आहे. राज्यातील तब्बल 903 विकास योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या आणि प्रत्यक्षात कोणतीही प्रगती न झालेल्या योजनांना यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. मृद व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये लघुपाटबंधारे योजना, कोअर पाझर बंधारे, पाझर तलाव, साठवण तलाव दुरुस्ती योजना अशा अनेक योजनांचा समावेश आहे. या योजनांची अंमलबजावणी गेल्या तीन वर्षांपासून रखडली होती. भूसंपादनासंदर्भातील अडचणी, स्थानिक नागरिकांचा विरोध आणि काही ठेकेदारांकडून मिळणारे असहकार्य यामुळे या योजना पूर्ण होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे शासनाने…

Read More

सोलापूर : प्रतिनिधी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्याप्रमाणे कृषी मॉल उभारण्यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी या धोरणावर आधारित धोरण तयार करावे. जेणेकरून कृषीच्या सर्व वस्तू शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी उपलब्ध होतील आणि कृषी माल देखील याच ठिकाणी विक्री देखील होईल, असे निर्देश कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिले. मंत्रालयात दक्षिण सोलापूर तालुक्यातील कृषी क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न, उपाययोजना व सांगली जिल्ह्यातील कृषी महाविद्यालयासंदर्भात आयोजित बैठकीत कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे बोलत होते. यावेळी दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख, आमदार सदाभाऊ खोत, कृषी आयुक्त सूरज मांढरे यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे म्हणाले की, सोलापूर येथे कृषी भवन व बाजारपेठ मॉल…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मूळ वेतनावर जून 2025 पासून 46 टक्के ऐवजी 53 टक्के महागाई भत्ता देण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. महामंडळातील कर्मचाऱ्यांना महात्मा फुले जनआरोग्य योजना किंवा धर्मवीर आनंद दिघे वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना यापैकी एक निवडण्याचा पर्याय, एक कोटी रुपयांचे अपघाती विमा कवच लागू करण्याचा तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास पास नऊ ऐवजी 12 महिन्यासाठी देण्याचा निर्णयही उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. सह्याद्री अतिथीगृह येथे एसटी महामंडळाच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली, यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सामान्यांसाठी जीवनवाहिनी असलेल्या एसटीच्या बससेवेच्या माध्यमातून लोकांना अपेक्षित…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील रहिवासी तसेच आश्रम शाळेतील सातव्या वर्गातील एका अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची घटना ४ रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील एका गावातील १४ वर्ष पाच महिने वयाची मुलगी आश्रम शाळेत सातव्या वर्गात शिकत होती. शाळेला सुट्या लागल्यानंतर ती आपल्या मोठ्या बहिणीच्या गावाकडे ये-जा करत होती. दरम्यान. ३ रोजी ही मलगी तिच्या आई वडीलांसह तिच्या घरीच झोपली होती. तर ४ रोजी पहाटे नळाला पाणी येणार म्हणून तिचे आई, वडील पहाटे ३ वाजता उठले असता त्यांना मुलगी दिसली नाही. त्यांनी सर्वत्र शोध घेतला. तर तिच्या बहिणीकडे ही विचारले, मात्र मुलगी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी खरेदीसाठी आलेल्या तरुणीचा पाठलाग करुन तिला आत्महत्येची धमकी देत जबरदस्तीने बुरखा घालण्यास सांगितले. त्यानंतर तरुणीने बुरखा काढण्यास सांगितले असता, तीला जीवेठार मारण्याची धमकी दिली. यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमल्याने पोलीस वेळीच दाखल होत त्यांनी दोघांना पोलीस ठाण्यात आणले. याठिकाणी तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन संशयित फरहान हकीम खाटीक (वय २३) व त्याचा मित्र जमील कुरेशी (दोघ रा. किनगाव, ता. यावल) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, यावल तालुक्यातील एका गावात राहणारी तरुणी फार्मसीचे शिक्षण घेत असून त्याच महाविद्यालयात फरहान हकीम खाटीक हा तिसऱ्या वर्षाला शिकत होता. ते दोघ कॉलेजला एकाच बसने ये-जा करीत असल्याने त्यांची…

Read More

यावल : प्रतिनिधी शहरातील बोरावल गेट भागातील एका कुटुंबाने साखरपुड्याचे निमंत्रण न दिल्याच्या कारणावरून सात जणांनी त्यांच्याशी वाद घातला व महिलेचा विनयभंग करीत पाच जणांना मारहाण केली. यातील एक जण हा गंभीर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री आरोपी मुसा मजीद पटेल, आरिफ ऊर्फ पप्पू मुसा पटेल, हुसेन मुसा पटेल, मीना मुसा पटेल, जावेद मुनाफ पटेल, अनिसा जावेद पटेल व यास्मिन जावेद पटेल यांनी हातात लाकडी लाठ्या-काठ्यांनी सदर कुटुंबीयांच्या घरात बळजबरीने घुसून डोक्यावर वार करीत जबर मारहाण केली. या हाणामारीत महिला व पुरुष असे पाच जण जखमी झाले. तर एक ४३ वर्षीय इसम हा गंभीर जखमी झाला. त्यास प्रारंभी यावल ग्रामीण…

Read More

रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील पाल येथील गारबर्डी जवळ बोरघाटात मजुरांनी भरलेली मिनी ट्रक उलटल्याची दुर्घटना बुधवार, ४ जून रोजी सायंकाळी ५ वाजता घडली. या अपघातात अनिल बारेला (२०) याचा मृत्यू झाला तर २१ मजूर जखमी झाले आहेत. सविस्तर वृत्त असे कि, मध्यप्रदेशातील मलगात कोठा (खरगोन) येथील रहिवासी  मजूर असून मजुरीचे काम आपटून घरी परत जात असताना गारबर्डी जवळ चालकाचे नियंत्रण सुटून वाहन उलटले. घटनास्थळावरून मिनी ट्रकमधून जखमींना पाल ग्रामीण रुग्णालयात आणले. या ठिकाणी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.  पाल परिसरात १०८ रुग्णवाहिका नसल्याने या २२ जखमींना उपचारासाठी खूप हाल झाले. ३ तासांपर्यंत रुग्णवाहिका उपलब्ध…

Read More

मेष राशी आज आर्थिक क्षेत्रात चढ-उतार येतील. आर्थिक बाबी स्पष्ट करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे लागेल. नवीन मालमत्ता खरेदी करण्यासाठी तुम्हाला धावपळ करावी लागेल. व्यवसायात नवीन भागीदार फायदेशीर ठरतील. जमा बांडवलात वाढ होईल. वृषभ राशी आज कामाच्या ठिकाणी चढ-उतार येतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी अनावश्यक वाद होऊ शकतात. व्यवसायात अनावश्यक अडथळ्यांमुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. आज बराच संघर्ष करावा लागेल. मिथुन राशी आज घराबाबत काही समस्या जाणवू शकते. जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल तर घरमालक तुम्हाला ते रिकामे करण्यास सांगू शकतो. तुमच्या स्वतःच्या घरात राहत असाल तर तुम्ही जुने घर रिकामे करून नवीन घरात जाऊ शकता. कर्क राशी आज आर्थिक…

Read More