Author: editor desk

मेष राशी श्रीगणेश म्‍हणतात की, वेळ सामान्यपणे जाईल. पण विचित्र परिस्थितीतही तुम्ही तुमचा संयम राखाल. यावेळी आरोग्याशी संबंधित कामांवर खर्च जास्त असेल. कोणाबद्दलही नकारात्मक विचार मनात येऊ देऊ नका. कोणत्याही अनुचित किंवा बेकायदेशीर कामात रस घेतल्याने अपमानास्पद परिस्थिती निर्माण होऊ शकते. व्यवसायात अधिक गंभीर विचार आणि मूल्यांकन करण्याची आवश्यकता आहे. पती-पत्नींचे एकमेकांशी चांगले संबंध असतील. वृषभ राशी भावनांऐवजी शहाणपणा आणि हुशारीने वागण्याची ही वेळ आहे. तुमच्या सभोवतालच्या परिस्थितीत काही बदल जाणवतील. या बदलाचा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. चुकीच्या वादविवादात किंवा गप्पांमध्ये तुमची ऊर्जा वाया घालवू नका. वडीलधारी आणि आदरणीय व्यक्तीच्या सहवासात थोडा वेळ घालवल्याने तुम्हाला सकारात्मक…

Read More

जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील महसूल मंडळ वाकडी अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाकडी येथे दिनांक ०२ जून २०२५ रोजी “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर” उत्साहात व यशस्वीरित्या पार पडले. या शिबिरास नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. शिबिराचे उद्घाटन तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या प्रास्ताविकाने झाले. त्यांनी आपल्या भाषणात शिबिराच्या उद्देशाविषयी माहिती देताना सांगितले की, “नागरिकांच्या समस्या त्वरित सोडवणे व शासनाच्या विविध योजनांचा थेट लाभ गावातच उपलब्ध करून देणे हा या शिबिराचा मुख्य हेतू आहे.” या शिबिरात विविध विभागांनी आपापल्या सेवा आणि योजनांचा लाभ नागरिकांना थेट दिला. संजय गांधी निराधार योजना (DBT प्रक्रिया) – ७८ लाभार्थी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय –…

Read More

जळगाव : प्रतिनिधी राज्य शासनाकडून राबविण्यात आलेल्या “१०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम” अंतर्गत, सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव या कार्यालयाची राज्यस्तरावर प्रथम क्रमांकावर निवड झाली आहे. या यशस्वी कामगिरीबद्दल सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री श्री. संजय शिरसाठ यांच्या हस्ते पुणे यशदा येथे झालेल्या अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत दिनांक ३१ मे 2025 रोजी जळगावचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांचा प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला. या गौरव समारंभास मा. प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे (भा.प्र.से.), मा. आयुक्त श्री. ओमप्रकाश बकोरिया (भा.प्र.से.), तसेच मा. महासंचालक, बार्टी श्री. सुनील वारे उपस्थित होते. “१०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम” ही राज्य शासनाने शासकीय कार्यालयांमध्ये…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला प्रभाग रचनेसंबंधी सूचना दिल्या आहेत. या सूचनांनुसार, आगामी निवडणुकींच्या तयारीला वेग आला असून, लवकरच निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपंचायतींच्या निवडणुका गेल्या अनेक वर्षांपासून रखडल्या आहेत. या निवडणुकांसाठी चार आठवड्यांमध्ये प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. कोर्टाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने त्या दिशेने पावले टाकण्यास सुरूवात देखील केली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून प्रभाग रचनेसाठी राज्य सरकारला सूचना करण्यात आली आहे. त्यानंतर आरक्षण आणि मतदार याद्या अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू होईल. सुप्रीम कोर्टाने…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून सोन्यासह चांदीच्या दर कमी अधिक होत असतांना दोन दिवसापासून सोन्याचे दरात मोठी घसरण झाली होती मात्र महिन्याच्या सुरुवातील पुन्हा एकदा सोमवारी दि.२ जून रोजी वाढ झाली. २४ कॅरेट सोन्याचा दर आज ८३७ रुपयांनी वाढून प्रति १० ग्रॅम ९६,१९२ रुपयांवर खुला झाला. याआधी सोन्याचा दर ९५,३५५ रुपयांवर होता. दरम्यान, चांदीच्या दरात किरकोळ घट दिसून आली आहे. इंडिया बुलियन आणि ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, २४ कॅरेट दर प्रति १० ग्रॅम ९६,१९२ रुपये, २२ कॅरेट ८८,११२ रुपये, १८ कॅरेट ७२,१४४ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा दर ५६,२७२ रुपयांवर खुला झाला आहे. तर चांदीचा दर प्रति किलो ९७,३९२ रुपयांवर…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यातील महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असतांना आता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सरकारी कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे. आता त्यांनी काही कंत्राटदार आणि टोलवाल्यांना तुरुंगात टाकणार असल्याचा इशारा दिला आहे.  विशेषतः जे कंत्राटदार योग्य आणि गुणवत्तापूर्ण काम करत नाही, त्यांना गडकरींनी सुनावले आहे. कंत्राटदार आणि टोलवाल्यांना तुरुंगात टाकून त्यांचे फोटो काढणार आहे. तांत्रिक आणि आर्थिक पात्रता यापूर्वी कंत्राटदार ठरवायचे. काळा कोट घालून जो यायचा त्यालाच कंत्राट मिळेल, एवढेच ठरवायचे बाकी राहिले होते, असेही त्यांनी म्हटले आहे. पारदर्शकता, भ्रष्ट्राचारमुक्त व्यवस्था, जलदगती निर्णय घेण्याची क्षमता आणि गुणवत्तापूर्ण काम आवश्यक असल्याचे…

Read More

बीड : वृत्तसंस्था मेहकर-पंढरपूर या पालखी महामार्गावरील तेलगाव-माजलगाव रस्त्यावर रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. त्यात तीनजण जागीच ठार तर दोनजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. अपघातातील जखमींना माजलगाव येथील संजीवणी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ पाठविण्यात आले. मृतांमध्ये पतीपत्नीचा समावेश आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, आयशरने ॲटोला जवळपास ५० ते ६० फुट अंतरापर्यंत फरफटत नेले. घटनास्थळी दिंद्रुड पोलीस तात्काळ दाखल झाले. सविस्तर वृत्त असे कि, माजलगाव तालुक्यातील भाटवडगाव येथील कांही लोक ॲटो क्र.एम एच.२३ एन ०२७३ ने रविवारी अकरा ते साडेअकरा वाजेदरम्यान तेलगावकडुन माजलगावकडे जात होता. सदरील ॲटो नित्रुड जवळील एका पेट्रोल पंपासमोर आला असता समोरून येणाऱ्या आयशर क्र.एम.एच.२३…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात मिस्त्री काम करणाऱ्या तरुणाने अल्पवयीन तरुणीला पळून जाण्याचे सांगत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र हा प्रकार मुलीने आई-वडिलांना सांगितल्याने तरुणाला ग्रामस्थांनी चोप दिला असून तरुणाविरुद्ध मारवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, १ जून रोजी दुपारी १:३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून एका गावात घराच्या बांधकामांच्या ठिकाणी मिस्त्री काम करणारा समीर अक्रम अली खान (२२, अमळनेर) याने एका मुलीकडून पिण्यास पाणी मागितले. त्यानंतर त्याने घरात घुसून मुलीचा हात पकडला. आपण उद्या पळून जाऊ, असे तिला सांगत त्याचा मोबाइल नंबर दिला. फोन करेल तेव्हा आपण पळून जाऊ, असे…

Read More

मुक्ताईनगर : प्रतिनिधी तालुक्यातील हरताळा येथील फाटा रस्त्यावरील सुकलेल्या लिंबाच्या झाडाची फांदी गळून माळेगाव येथील दोन व्यक्तींच्या डोक्यावर पडल्याने ते जखमी झाले. हरताळा फाटा ते गावादरम्यान गेल्या दोन वर्षांपासून सुकलेले झाड आहे. त्याच्या फांद्या अधूनमधून गळत असतात. अशीच फांदी रविवारी दुपारच्या सुमारास पडली. यावेळी येथून जाणारे संगीताबाई कैलास भिल्ल (४०, रा. माळेगाव) व विशाल कैलास भिल्ल (२१, रा. माळेगाव) हे जखमी झाले. त्यांच्या डोक्यास जबर दुखापत झाली आहे. दोघा जखमींना तत्काळ हरताळा येथील अनिल बाळू कोळी यांनी मुक्ताईनगर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

Read More

जामनेर : प्रतिनिधी भुसावळहून पुण्याकडे जाणारी खासगी बस उलटून ८ ते १० प्रवासी जखमी झाले. ही घटना गंगापुरी ते गारखेडे (ता. जामनेर) या गावादरम्यान रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. जखमींमध्ये तीन-चार बालकांचाही समावेश आहे.  रस्त्याचे काम सुरू असल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत असले तरी, दुसरीकडे बसचालक व वाहकात वाद झाला, त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला असावा, असेही काही प्रवाशांचे म्हणणे आहे. सविस्तर वृत्त असे कि, अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका अपघातस्थळी पोहचल्या. बेबाबाई घाडे (७५), साहील घाडे (८, दोन्ही रा. खिरोदा), ललिता इंगळे (४०), दिशा इंगळे (८, दोन्ही रा. बऱ्हाणपूर), योगेश चौधरी (३४) आणि रणजित राजपूत (३०,…

Read More