Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी शहरातील नागेश्वर कॉलनी परिसरात अंगणात खेळत असलेल्या अरविंद सचिन गायकवाड (४ वर्षे) या बालकावर मोकाट कुत्र्याने हल्ला करीत, त्याच्या चेहरा, मान, गळ्याचे अक्षरशः लचके तोडले. यात या बालकाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी नागेश्वर कॉलनीत घडली, याशिवाय अन्य चार ते पाच जणांनाही कुत्र्याने चावा घेतला. दरम्यान, या घटनेनंतर नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात महापालिकेच्या कारभारावर रोष व्यक्त केला. मजुरी काम करणारे सचिन गायकवाड यांचा मुलगा अरविंद हा रविवारी संध्याकाळी अंगणात खेळत होता. त्यावेळी अचानक कुत्र्याने या बालकावर हल्ला केला. मानेवर व गळ्यावर जोरदार चावा घेतल्याने खोलवर जखमा झाल्या आहेत. या बालकाला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी…

Read More

मेष श्रीगणेश म्‍हणतात की, आज तुम्हाला तुमच्या आत एक अद्भुत ऊर्जा आणि उत्साह अनुभवायला मिळेल. तुमच्याकडे एक महत्त्वाची संधी असू शकते ज्याचा तुम्ही आज पुरेपूर फायदा घेऊ शकाल. तुम्हाला आज बराच काळ अडकलेला पैसा देखील मिळू शकेल. तुम्हाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागेल. जर तुम्ही त्याचा सामना केला तर तुम्ही जिंकू शकता. पण लहानशी प्रतिक्रिया देखील मोठे नुकसान करू शकते. मन कधीकधी निराश होऊ शकते. ग्लॅमर आणि सौंदर्य उत्पादनांशी संबंधित व्यवसायाला प्रोत्साहन द्या. जोडीदारासोबत फिरणे वेळखाऊ असू शकते. वृषभ आजचा दिवस आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी असेल. कुटुंबात मजा आणि आनंदाचे वातावरण असेल. नाते चांगले ठेवण्यात तुमचे विशेष योगदान असेल. तरुण लोक…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील महामार्गार नेहमीच अपघाताच्या घटना घडत असतांना आज महिन्याच्या सुरुवातीलाच जळगाव – धुळे महामार्गावरील शिवकॉलनी चौकात १ जून रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास एका भरधाव चारचाकी वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातात धरणगाव तहसील कार्यालयात शिपायाचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. हि घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये एकच संताप व्यक्त होत आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील शिव कॉलनीजवळून जाणाऱ्या महामार्गार आज दि.१ जून रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास विशाल रमेश सोनार (वय-४४) हे रस्ता ओलांडत असताना खोटेनगरकडून येणाऱ्या भरधाव चारचाकी वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की, त्यात त्यांच्या चेंदामेंदा…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या अनेक दिवसांपूर्वीच बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले जामीनावर बाहेर आल्यानंतर त्याला पुन्हा एकदा अटक करण्यात आली आहे. बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले याला पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे. त्याच्या विरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाणे आणि सायबर विभागात दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्या गुन्हाच्या अनुषंगाने कासलेला अटक करण्यात आली आहे, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. दोन समाजात तेढ निर्मा करणे आणि राजकीय नेत्यांवर केलेल्या आरोप प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मुबंईत देखील त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पूर्वी बीड, परळी, आंबेजोगाई येथे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. समाजिक शांतता भंग केल्याप्रकरणी बीड येथील…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील अनेक परिसरात गांजाची विक्री होत असल्याच्या घटना सातत्याने घडत असतांना आता रामानंद नगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शहरातील राजीव गांधी नगरात १३ हजारांचा गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. सविस्तर वृत्त असे कि, रामानंद नगर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी पोनि.राजेंद्र गुंजाळ यांना दि.३० रोजी मिळालेल्या माहितीनुसार एक इसम पोलीस स्टेशन हददीत गांजा हा अमली पदार्थ चोरुन विकत आहे. सदरची बातमी मिळाताच पोनि.राजेंद्र गुंजाळ यांनी पोलीस अधीक्षक महेश्वर रेडडी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांना सदरची गोपनीय बातमीची माहीती दिली. त्यावर मा. वरीष्ठांनी तात्काळ बातमीची…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील जनतेसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती कमी केल्या आहेत. १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत २४ रुपयांची कपात करण्यात आली आहे. आज १ जूनपासून नवीन दर लागू होणार आहेत. दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किरकोळ विक्री किंमत १ जूनपासून १७२३.५० रुपये आहे. घरगुती एलपीजी घरगुती सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. एप्रिलमध्ये, व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत १,७६२ रूपयांपर्यंत कमी करण्यात आली. फेब्रुवारीमध्येही किंमती ७ रूपयांनी कमी करण्यात आल्या होत्या, परंतु मार्चमध्ये पुन्हा ६ रूपये वाढवण्यात आले. नवीन किंमत रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि इतरांसह लहान…

Read More

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील जळके येथील माहेर असलेल्या आरती अनिल इंगळे (वय ३२, रा. भांडूप वेस्ट मुंबई) यांच्या चारित्र्यावर सासरच्यांकडून संशय घेत त्यांना छळ केला जात होता. तसेच विवाहितेला स्वयंपाक निटनिटका करता येत नाही व विवाहितेने माहेरुन पाच लाख रुपये आणावे या करीता त्यांचा मानसिक व शारिरीक छळ होवू लागल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा छळ असह्य झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. त्यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ स्वप्निल पाटील हे करीत आहे.

Read More

जळगाव : प्रतिनिधी अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्यामुळे विकास अमृतकर हे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. हा अपघात शनिवारी (३१ मे) रात्री प्रभात चौक उड्डाणपुलावर झाला. जखमीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सविस्तर वृत्त असे कि, शिवकॉलनीकडून आकाशवाणी चौकाकडे दुचाकीवरून (क्र. एमएच ४१, झेड ९९११) विकास अमृतकर जात होते. यावेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला फेकले गेल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या विषयी जिल्हापेठ पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी जखमीस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.

Read More

जळगाव : प्रतिनिधी कामानिमित्त कुटुंबीय बाहेरगावी गेलेले असताना चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून रोख १० हजार रुपये सोन्याचे दागिने तसेच चांदीचे देवीदेवतांचे शिक्के लांबविले. ही घटना २० ते २४ मे दरम्यान देवीदास कॉलनीत घडली. सविस्तर वृत्त असे कि, देवीदास कॉलनीतील रोहिणी श्याम जगताप (५६) यांच्या घरातून चोरट्यांनी रोख १० हजार रुपये, १५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र, देवीदेवतांच्या चांदीच्या शिक्क्यांची माळ, चांदीची कयरी घड्याल असा मद्देमाल चोरून नेला. घरमालक घरी आले त्यावेळी ही चोरी लक्षात आली. ३० मे रोजी रोहिणी जगताप यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण पाटील करीत…

Read More

जळगाव : प्रतिनिधी घरामध्ये वाद झाल्यानंतर पती बाहेर गेला आणि पत्नी सारिका डिगंबर वाघुळदे (वय ३०, रा. नशिराबाद) यांनी विष प्राशन केले. उपचार सुरू असताना या विवाहितेचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. ३१) दुपारी नशिराबाद येथे घडली. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील नशिराबाद येथे सारिका वाघुळदे या पती व दोन मुलांसह राहत होत्या. शनिवारी दुपारी पती-पत्नीमध्ये काही कारणावरून वाद झाला. सारिका व डिगंबर यांचा १२ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना दोन लहान मुले असून, या घटनेने त्यांचे मातृछत्र हिरावले गेले आहे. दोघांच्या प्रेमविवाहाचा वादाने शेवट झाला. मालवाहू रिक्षाचालक असलेला पती बाहेर गेला. घरी सारिका यांनी विष प्राशन केले. ही…

Read More