Author: editor desk

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जगभरात सण २०१९ मध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा हाहाकार सुरु झाला होता आता पुन्हा एकदा देशात कोरोना विषाणू पुन्हा एकदा आपले पाय पसरवत आहे. कोविड १९ च्या ताज्या आकडेवारीनुसार, सक्रिय रुग्णांची संख्या ४३०२ वर पोहोचली आहे. त्याचबरोबर ४४ जणांना यामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि पश्चिम बंगालसह अनेक राज्यांमधून कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे दररोज कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्य सरकारने याबाबत मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, देशात सर्वाधिक कोविड रुग्णांची संख्या केरळमध्ये नोंदवली गेली आहे. याठिकाणी १३७३ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात ९ जणांचा…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था पुणे येथील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावर भाजप आमदार सुरेश धस यांनी गंभीर आरोप केले आहेत. सुपेकर यांनी तुरुंगातील एका आरोपीकडून ३०० कोटी रुपयांची मागणी केली होती, असा आरोप सुरेश धस यांनी केला आहे. या प्रकरणामुळे पोलिस प्रशासन आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आमदार सुरेश धस यांनी म्हटले आहे की, “जालिंदर सुपेकर हे हगवणे कुटुंबाचे नातेवाईक असून, त्यांनी आयजी पदावर असताना एक लाख रुपये रोख आणि ५० हजार रुपयांचा मोबाईल घेतल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. तसेच, तुरुंगातील आरोपीकडून ३०० कोटी रुपये मागितल्याची तक्रारही माझ्याकडे आली आहे,” असं सुरेश धस यांनी म्हटले…

Read More

जळगाव : प्रतिनिधी निमखेडी शिवारात आज दि.४ रोजी पहाटेच्या सुमारास एका भीषण अपघातात दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला. मृतांची नावे ज्ञानेश्वर झगडू शिवदे आणि प्रमोद दगडू शिवदे अशी आहेत. सविस्तर वृत्त असे कि, दुध फेडरेशन ते निमखेडी रस्त्यावरील जुना हायवे येथे कांताई नेत्रालयाजवळ एका अज्ञात वाहनाने त्यांच्या रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. मयत ज्ञानेश्वर शिवदे हे शिवसेना (शिंदे गट) महिला शहरप्रमुख ज्योती शिवदे यांचे पती होते, तर प्रमोद हे त्यांच्या पतीचे बंधू होते. एकाच अपघातात दोन्ही भावांचा मृत्यू झाल्याने शिवदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ज्ञानेश्वर आणि प्रमोद हे…

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील महायुतीचे मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस अनेक महत्वाचे निर्णय घेत असतांना आता केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागासाठी 30 लाख घरकुलांचे उद्दिष्ट मंजूर केले असून राज्यातील प्रत्येकाला हक्काचे घर देण्यात येईल, या माध्यमातून ग्रामीण भागात 80 हजार कोटींची गुंतवणूक होणार असून प्रत्येकाला घर देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ग्रामविकास व पंचायत राज व राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण- गृहनिर्माण विभागाच्यावतीने श्री छत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) लाभार्थी मेळावा व महाआवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी…

Read More

इंदौर : वृत्तसंस्था देशभरातील अनेक महामार्गावर नियमित अपघाताच्या घटना सुरु असतांना एक भीषण अपघाताची घटना मध्यप्रदेश राज्यातून समोर आली आहे. मध्य प्रदेशातील झाबुआ येथील मेघनगर भागात रात्री उशिरा एक भीषण रस्ता अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. ज्यामध्ये ९ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. सविस्तर वृत्त असे कि, राजस्थानहून सिमेंट घेऊन जाणारा ट्रक मारुती इको व्हॅनवर उलटला.अपघात एवढा भीषण होता कि इकोमध्ये असलेल्या ११ पैकी ९ जणांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. बुधवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली असल्याचे म्हटले जात आहे. मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यात बुधवारी पहाटे सिमेंटने भरलेला ट्रेलर ट्रक व्हॅनवर उलटल्याने नऊ जणांचा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी मित्राला समजविण्यास सांगितल्याचा राग आल्याने देविदास एकनाथ अस्वार (वय ५०, रा. शिरसोली प्र.बो. ता. जळगाव) यांना दोघांनी लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. ही घटना दि. २ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास शिरसोली प्र.बो. येथील हॉटेल धनश्रीजवळ घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.बो येथे देविदास अस्वार हे वास्तव्यास असून ते वाहनावर चालक म्हणून नोकरी करतात. दि. २ रोजी दुपारच्या सुमारास ते गावातील हॉटेल धनश्रीच्या बाजूला बसलेले होते. यावेळी कौतीक पांडू खलसे हा त्याच्या मित्रांसह त्याठिकाणी आला. यावेळी देवीदास अस्वार यांनी कौतीक खलसे याला त्याच्या मित्राला…

Read More

जळगाव : प्रतिनिधी मनाची इच्छा पूर्ण होण्यासाठी बोटातील अंगठी शंभराच्या नोटेमध्ये गुंडाळून ठेवण्याचे सांगून दोन जणांनी सुरेश पंढरीनाथ भोळे (वय ७२, रा. माऊली नगर) यांची अंगठी लांबविली. ही घटना १ जून रोजी घाणेकर चौकात घडली. या प्रकरणी दोन अनोळखींविरुद्ध शनी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश भोळे हे वृद्ध घाणेकर चौकामध्ये एका केळी विक्रीच्या हातगाडीजवळ उभे होते. त्यावेळी एकजण त्यांच्याजवळ आला व आश्रमाचा पत्ता विचारला. काही वेळाने दुसरा एक इसम आला व तोही वृद्धाशी बोलू लागला. पहिल्या व्यक्तीने मी देवमाणूस आहे असे सांगत वृद्धाला हातात दगड ठेवण्यास सांगितले व तो तेथून मंदिराजवळ निघून गेला. दुसरी व्यक्ती वृद्धास…

Read More

रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील विवरे येथील ब-हाणपूर अंकलेश्वर महामार्गावरील दोन ट्रक्सची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन्ही चालकांना किरकोळ दुखापत झाली. हा अपघात २ रोजी मध्यरात्रीनंतर घडला. सविस्तर वृत्त असे कि, मुंबईकडून बऱ्हाणपूरकडे जात असलेला ट्रक (एमएच ०४ / जेके ९६१२) आणि रावेरकडून सावद्याकडे जात असलेल्या ट्रकची (आरजे १७/ जीबी २०८३) समोरासमोर धडक झाली. यामुळे एक ट्रक उलटला. परिणामी, बराच वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अपघातातील चालकांना किरकोळ दुखापत झाली असून, त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले आहेत, तसेच रस्त्यात उलटलेला ट्रक क्रेनच्या साहाय्याने दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान उचलून बाजूला करण्यात आला आहे. रस्त्याला साइडपट्टया…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना सुरु असतांना आता जळगाव-अकोला राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी रात्रीच्या सुमारास एका ट्रॅव्हल्स बस आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर 15 जण गंभीर जखमी झाले. रात्रीच्या वेळी घडलेल्या या अपघातामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण झाले, तरीही स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, जळगावहून अकोल्याकडे निघालेली ट्रॅव्हल्स बस ट्रकला जोरदार धडकली. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरू आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून, काहींची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा…

Read More

मेष राशी श्रीगणेश म्‍हणतात की, आज तुम्ही अनेक कामांमध्ये व्यस्त असाल. यासोबतच सामाजिक मर्यादाही वाढतील. कुठूनतरी तुमच्या इच्छेनुसार पैसे मिळाल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळू शकते. धार्मिक संस्थांमध्ये सेवा संबंधित कामांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान मिळेल. आज एखाद्या कामाबद्दल निर्णय घेण्यात काही अडचणी येऊ शकतात. घरातील एखाद्या मोठ्या व्यक्तीचा सल्ला घ्या. तसेच, एखाद्या अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवणे तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते. वृषभ राशी एखादे महत्त्वाचे काम पूर्ण झाल्यामुळे आरामाची स्थिती निर्माण होईल. लोकांची काळजी न करता स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित केल्याने नवीन यश मिळेल. लोक तुमच्या क्षमतेने आकर्षित होतील. थोडासा निष्काळजीपणा तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर नेऊ शकतो हे लक्षात ठेवा. म्हणून तुमचे मन…

Read More