Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » परदेशी मुलीकडे गेले अन चोरट्यांनी बंद घर फोडले !
    क्राईम

    परदेशी मुलीकडे गेले अन चोरट्यांनी बंद घर फोडले !

    editor deskBy editor deskJune 3, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    ऑस्ट्रेलियामध्ये राहणाऱ्या मुलीकडे दाम्पत्य गेलेले असताना त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी चार तोळ्यांचे दागिने चोरून नेल्याची घटना १५ मे ते १ जूनदरम्यान पिंप्राळा परिसरातील मारुती पार्क परिसरात घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, सेवानिवृत्त असलेले नरेंद्र दौलतराव वाघ व त्यांच्या पत्नी १५ मे रोजी ऑस्ट्रेलियामध्ये राहणाऱ्या मुलीकडे गेले. त्यावेळी चोरट्यांनी कपाटातून ३० ग्रॅमची सोन्याची चेन व १० ग्रॅमच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, असा एकूण एक लाख २५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला चोरट्यांनी घरातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर काढून नेला आहे. त्यामुळे फुटेज मिळण्यास अडचणी येत आहेत. घटनास्थळी रामानंदनगर पोलिसांसह फॉरेन्सिक टीम, श्वान पथक व ठसे तज्ज्ञांनीही पाहणी केली. श्वानाने काही अंतरापर्यंत माग काढला. तर चोरट्यांनी हँड ग्लोज वापरल्याची शक्यता असून, त्यामुळे ठसेही मिळत नसल्याचे सांगण्यात आले.

    वाघ यांच्या घरातील सीसीटीव्ही बंद पडल्याचे त्यांना मोबाइलवरील अॅक्सेसमुळे समजले. त्यांनी त्यांचे साडू लीलाधर शांताराम खंबायत यांना घरी जाऊन पाहण्यास सांगितले. १ जून रोजी खंबायत हे तेथे गेले असता त्यांना दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला दिसला. याप्रकरणी लीलाधर खंबायत यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि संदीप वाघ करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बीडमध्ये धक्कादायक प्रकार; सावत्र मुलासोबत महिला फरार

    April 20, 2026

    नशिराबादमध्ये पोलिसांची धडक कारवाई; बसस्थानक परिसरातून कट्ट्यासह सराईत आरोपी अटकेत

    April 20, 2026

    गावठी पिस्तूलसह दोन संशयित पकडले; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई !

    April 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.