Author: editor desk

चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील घाट रोडवरील साबीर स्क्रब या भंगार दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील ४० हजार रुपये रोख रकमेसह ३० हजार रुपये किमतीचे ३० किलो केस लांबविले. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. तर अन्य तीन फरार आहेत. संशयितांकडून मालवाहू वाहन जप्त करण्यात आले आहे. सविस्तर वृत्त असे कि, चोरीची ही घटना दि. ९ जुलै रोजी सायंकाळी ७:३० ते दि. १० रोजी घडली होती. पोलिसांनी आलमगीर शेख रफिक (३८, रा. मदनीनगर, जामनेर) व हकीम खान रफिक खान (२९, रा. पहूर पेठ, पहूर, . जामनेर) यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता.…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी युनियन बँकेच्या एटीएम मधून ५ ग्राहकांचा एटीएम कोड वापरून किंवा अन्य मार्गाने त्यांच्या खात्यातून सुमारे २ लाख ७ हजार १० रूपयांची रक्कम काढून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संभाजी पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.नि. अमितकुमार मनेल हे करीत आहेत. संभाजी भाऊराव पाटील (रा. तरवाडेपेठ, ता. चाळीसगाव) यांनी दि. १३ रोजी दुपारी ३ वाजता भडगाव रोडवरील युनियन बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्याचा प्रयत्न केला. त्यांचे अन्य बँकेचे एटीएम कार्ड हे मशीनमध्ये अडकले. कार्ड निघत नव्हते. त्यावेळी एटीएमच्या बाजूला अनोळखी इसम उभा होता. त्याने मशीनवर…

Read More

फैजपूर : प्रतिनिधी यावल तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. ही घटना जानेवारी ते जून २०२५ दरम्यान घडली. याप्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात दुसखेडा येथील तरुणाविरुद्ध पॉक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, या अल्पवयीन मुलीला चेतन अमोल सोनवणे (रा. दुसखेडा, ता. यावल) याने लग्नाचे आमिष दाखविले व तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिला पळवून मुक्ताईनगरच्या जंगलात नेले. तेथेही तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. घडलेला प्रकार या मुलीने आपल्या कुटुंबात सांगितल्यानंतर फैजपूर पोलिस ठाण्यात पीडित अल्पवयीन मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून तरुणाविरुद्ध फैजपूर पोलिसात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात…

Read More

मेष : आई-वडिलांच्या आशीर्वादाने कामात चांगले परिणाम मिळतील. तुमच्या वागण्याचा आणि कामाचा इतरांवर सकारात्मक परिणाम होईल. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर योग्य दिवस आहे. त्यासाठी तुम्ही अनुभवी व्यक्तीचा सल्ला नक्कीच घ्या. वृषभ : तुम्ही जर विवाहित असाल तर जीवनात गोडवा राहील आणि मन आनंदी राहील. नोकरीतील परिस्थिती सामान्य राहील, संयम ठेवा. व्यावसायिक कामे थोडी मंदावतील, परंतु परिस्थिती पाहता संयम योग्य राहील. घरातील सुखसोयींशी संबंधित काहीतरी खरेदी करण्याची शक्यता आहे. पैसे सावधानीने खर्च करा. मिथुन : नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. काही गोंधळ दूर होतील, ज्यामुळे मन हलके राहील. आर्थिक कामांवर लक्ष केंद्रित करा. खर्च मर्यादित ठेवा आणि अनावश्यक बाबींमध्ये…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील मुकुंदनगर येथील लाठी शाळेच्या मागे असलेल्या मानेश्वर महादेव मंदिरात धार्मिक कार्यासाठी वापरण्यात येणारे चांदीचे मुकुट व अन्य दागिने चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या मंदिरासमोर राहणारे अरुण लक्ष्मण शेटे हे मंदिरातील महादेवाच्या पिंडीवर वापरण्यात येणारे सुमारे ६१,५०० रुपयांचे चांदीचे मुकुट आणि इतर दागिने घरी सुरक्षित ठेवत असतात. हे दागिने सण, उत्सवाच्या दिवशीच मंदिरात नेऊन वापरण्यात येतात. शेटे कुटुंबीय पुण्याला मुलाकडे गेल्यानंतर त्यांच्या अनुपस्थितीत कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराचा दरवाजा उघडून हे दागिने चोरून नेल्याची फिर्याद त्यांनी दिली. या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५०८/२०२५ भा.दं.वि. (BNS) कलम ३३१(३), ३३१(४), ३०५(अ) अंतर्गत…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज (दि. १४) राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना, “अलीकडे जयंत पाटील यांना पंतप्रधान मोदींच्या सर्व योजना आवडू लागल्या आहेत, ही आनंदाची बाब आहे,” असा मिश्किल टिप्पणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच त्‍यांनी उपस्‍थित केलेल्‍या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्याची ग्वाहीदेखील त्यांनी दिली. कामगार कल्याणकारी योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या भांड्यांच्या दर्जा आणि निविदा प्रक्रियेवर जयंत पाटील सवाल केला. यावेळी ते म्‍हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः सांगतात की, कोणताही लाभ थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करा (DBT). मग मध्यस्थांमार्फत वस्तू…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट येथे काळे फासण्यात आले. या हल्ल्याला प्रवीण गायकवाड यांनी सरकारला जबाबदार धरले आहे. माझ्या हत्येचाच कट केला गेला होता, माझ्यावर तशा प्रकारचा हल्ला झालेला आहे. माझे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते संभाजी भोसले आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांमुळेच आज मी जिवंत आहे. अन्यथा माझ्या जिवावर हल्ला झाला होता, याला संपूर्ण सरकार जबाबदार आहे, असा आरोप गायकवाड यांनी केला आहे. प्रवीण गायकवाड म्हणाले, हा माझ्या एकट्यावर झालेला हल्ला नाही, कारण मी गेल्या 30 वर्षांपासून मराठा समाजासाठी काम करत आहे, हा मराठा समाजावर झालेला हल्ला आहे. प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट येथे फत्तेसिंह शिक्षण संस्था…

Read More

पुणे: वृत्तसंस्था शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर सत्ताधारी नेत्याकडून त्यांच्याबाबत अनेक विधान होत असतांना आता पुन्हा एकदा अजित पवारांनी सूचक विधान केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. जयंत पाटील हे वरिष्ठ नेते असून, त्यांनी सात वर्षे पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद भूषवले आहे. नवीन नेतृत्वाला संधी देण्याचा त्यांचा विचार असू शकतो. तसेच राष्ट्रीय पातळीवर काम करण्याचा त्यांनी निर्णय घेतला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचाराजीनामा दिला असावा, असे सूचक विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी केले. त्यांच्या विधानाची राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. बारामती होस्टेल येथे रविवारी (दि.13) पुणे व पिंपरी-चिंचवड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकार्‍यांची बैठक पार पडली.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शिवीगाळ करीत असल्याचा जाब विचारल्याने अनंत कचरु हातांगडे (वय ३२, रा. हरिविठ्ठल नगर) या तरुणाला तिघांनी लाकडी काठीने बेदम मारहाण केली. ही घटना दि. ११ रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास नवनाथ मंदिराजवळ घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील हरिविठ्ठल नगरातील नवनाथ मंदिराजवळ अनंत हातांगडे हे वास्तव्यास असून ते मजूरी करतात. दि. ११ रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास संशयित बापू कोळी, कपील सुतार व युगल सुतार हे हातांगडे याच्याघरासमोर जोरजोरात शिवीगाळ करीत होते. त्यावेळी तरुणाने त्यांना शिवीगाळ का करता असा जाब विचारला. त्याचा राग आल्याने त्या तिघांनी अनंतर…

Read More

जळगाव : प्रतिनिधी वाढदिवस साजरा केल्यानंतर खांबावरील तीन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड करणाऱ्या गोविंदा मुरलीधर बाविस्कर (१८, कांचननगर) व संजय नाना सौदागर (१९, मूळ रा. शेंदुर्णी, ता. जामनेर, ह. मु. अष्टभूजा चौक, कांचननगर) यांना रविवारी ताब्यात घेत त्यांची धिंड काढण्यात आली. सविस्तर वृत्त असे कि, गोविंदा बाविस्कर या तरुणाचा वाढदिवस असल्यामुळे त्याच्या मित्रांनी मध्यरात्री केक कापला. त्यानंतर टवाळखोरांनी खांबावर  लावलेले शासकीय सीसीटीव्ही कॅमेरे दगड मारुन फोडले. याबाबतची माहिती नेत्रमकडून शनिपेठ पोलिसांना कळविण्यात आली. पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांना कॅमेरे तोडणाऱ्यांना ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तसेच परिसरात…

Read More