Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन रविंद्र रामचंद्र धनगर (वय ३५, रा. त्रिभूवन कॉलनी, कानळदा रोड) यांच्यासह त्यांच्या भावाला तिघांनी बेदम मारहाण केली. तसेच रविंद्र धनगर यांच्या डोक्यात लोखंडी पाईप मारुन जखमी केले. ही घटना दि. १५ रोजी सकाळच्या सुमारास त्रिभूवन कॉलनीत घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील कानळदा रोडवरील त्रिभूवन कॉलनीत रविंद्र धनगर हे वास्तव्यास असून महावितरण येथे वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून नोकरीस आहे. दि. १४ रोजी त्यांचा लहान भाऊ सुनिल धनगर हा रात्री ११ वाजता कामावरुन घरी येत असतांना, योगेश परदेशी याने काहीही कारण नसतांना त्याला शिवीगाळ केली.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी किराणा दुकानात चहा मसाल्याची पुडी घेण्यासाठी आलेल्या दोन जणांनी दुकानमालक महिलेच्या गळ्यातील एक लाख रुपये किमतीची सोनपोत ओढून नेली. ही घटना १४ जुलै रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास निवृत्ती नगरात घडली. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्तअसे कि, शहरातील निवृत्ती नगर परिसरात पुंडलिक पाटील यांचे घराला लागूनच किराणा दुकान असून, १४ जुलै रोजी रात्री ते घरात गेले व त्यांच्या पत्नी प्रमिला पाटील दुकानात थांबल्या होत्या. त्यावेळी दोन जण दुचाकीने आले व त्यांनी चहा मसाल्याची पुडी घेतली. त्यांना पैसे परत देण्यासाठी पाटील खाली वाकल्या असता त्यांच्या गळ्यातील एक लाख…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील एका भागात भांडणात तिघांविरुद्ध महिलेच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिस ठाण्यात अश्लील शिवीगाळ, विनयभंग, मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला व तिचा मोठा भाऊ तसेच लहान बहीण यांना किरकोळ कारणावरून भास्कर चावदस चिनावले, विनोद बढे, अतुल बढे व राहुल बढे या चौघांनी दमबाजी केली. महिलांवर अश्लील टिप्पणी केली. फिर्यादी महिलेच्या भावासही मारहाण केली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात भास्कर चावदस चिनावले (रा. गडकरी नगर), विनोद, अतुल व राहुल बढे (सर्व रा. गांधी नगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Read More

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील पाडळसे आणि भोरटेक परिसरात वाघाचे वास्तव्य असल्याच्या चर्चाना आता पुष्टी मिळत आहे. मंगळवारी पहाटे भोरटेक गावाजवळ शेतकरी भास्कर रमेश कोळी यांच्या गुरांच्या गोठ्यावर हल्ला करून एका म्हशीला ठार केले. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात वाघाच्या अस्तित्वाची चर्चा होती. वनविभागाच्या मते हा बिबट्या असावा, असे म्हटले होते तर काही ग्रामस्थांनी वाघाला प्रत्यक्ष पाहिल्याचा दावा केला होता. या घटनेनंतर पाडळसे येथील पोलिस पाटील, सुरेश खैरनार यांनी वन विभागाला माहिती दिली. यावल पूर्वचे वनक्षेत्रपाल एस. एम. पटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली डोंगरकठोरा वनपाल आय. एस. तडवी, फैजपूर वनपाल अतुल तायडे, गस्तीपथक…

Read More

मेष राशी आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी धावपळीचा असेल. आज तुम्हाला लांब प्रवास करावा लागेल. मात्र त्यात असुविधा आणि थकवा जाणवू शकतो, त्यामुळे सावधगिरी बाळगा. कामात काही संभ्रम निर्माण होईल, पण संयम महत्त्वाचा आहे. खर्च वाढेल. पण बचत कायम राहील.  रखडलेले पैसे मिळतील. नवीन नात्यात घाई करणे टाळा. आरोग्याकडे लक्ष द्या. वृषभ राशी वृषभ राशीच्या व्यक्ती आज इतरांना मदत करतील. जुन्या मित्रांसोबत वेळ घालवल्याने मन हलके होईल. नोकरीत चांगले परिणाम मिळतील. नवीन कामाची सुरुवात उत्साहात होईल. हळूहळू केलेली आर्थिक पायाभरणी भविष्यात फायदेशीर ठरेल. गुंतवणुकीतून लाभ संभवतो. पार्टनरसोबतचे नाते अधिक दृढ होईल. थोडा आळस जाणवू शकतो. आपल्या कल्पना इतरांशी मोकळेपणाने शेअर करा. फायदा होईल. मिथुन राशी मिथुन…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी अखेर आमदार शशिकांत शिंदे यांची निवड झाली आहे. पक्षाच्या आज झालेल्या बैठकीत विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर एकमताने शशिकांत शिंदे यांची त्या पदावर निवड करण्यात आली. या निवडीमुळे जयंत पाटील यांच्या राजीनाम्याविषयी गत 4 दिवसांत निर्माण झालेला संभ्रम संपुष्टात आला आहे. दरम्यान, शरद पवार गटाचे अनेक नेते सध्या सत्ताधारी महायुतीत जात आहेत. शशिकांत शिंदे यांच्यापुढे पक्ष एकसंध ठेवण्याचे मोठे आव्हान आहे. शशिकांत शिंदे हे पक्षाच्या स्थापनेपासूनच शरद पवार यांचे खंदे सहकारी राहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीवेळी त्यांनी पवारांची निष्ठेने साथ दिली. पश्चिम महाराष्ट्रातील प्रभावशाली नेतृत्व…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी मैदानात उतरलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी पदयात्रेने संपूर्ण राज्यभराचे लक्ष वेधून घेतले. मात्र आता बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय महामार्ग रोखून धरल्या प्रकरणी बच्चू कडूंसह 12 जणांवर यवतमाळच्या महागांव पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. बच्चू कडू यांच्या सातबारा कोरा पदयात्रेची समारोप सभा श्री गजानन महाराज मंदिर आंबोडा येथे नियोजित होती. मात्र ऐनवेळी आयोजकांनी व बच्चू कडू यांनी समारोप सभा आंबोडा उडान पुलावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वर आयोजित केली. यावेळी ट्रॅक्टर महामार्गवर आडवे लावून वाहतूक पूर्णपणे बंद केली होती, यामुळे तीन…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात पावसाचा पुन्हा एकदा जोर धरला असून, हवामान विभागाने राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. रायगड जिल्ह्यात काही तासांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक भागांत पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. नद्या-ओढे दुथडी भरून वाहत असून काही सखल भागात पाणी साचले आहे. यामुळे स्थानिक प्रशासन सतर्क झाले असून, जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोकण आणि घाटमाथ्याच्या परिसरात दक्षिण-पश्चिम मान्सून पूर्ण ताकदीने सक्रीय झाल्यामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, मुंबई, पुणे आणि नाशिक या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ‘यलो’ आणि ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. रायगडमध्ये आज संध्याकाळनंतर आणि रात्रीच्या…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था मागील आठवड्यात ५ जुलै रोजीच्या मेळाव्यानंतर शिवसेना(उबाठा) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना युती होईल अशी चर्चा राज्याच्या  राजकारणात रंगली आहे. मात्र, अद्यापर्यंत या वृत्ताला ठाकरे बंधूंकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. मेळाव्याचे औचित्य हे मराठीचा मुद्दा असल्याचे सांगितले जात आहे. उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांच्याकडून ठाकरे बंधू एकत्र येण्यावर सकारात्मक विधानं केली जात आहे. उद्धव ठाकरे यांनी देखील युतीबाबत प्रतिसाद दर्शविला आहे. मात्र, राज ठाकरे यांच्याकडून सावध भूमिका घेतली जात आहे. अशातच आता युतीबाबत स्वतंत्र अनौपचारिक गप्पांमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनीहीह मोठं भाष्य केले आहे. युतीबाबत सध्या टप्प्याटप्प्याने प्रक्रिया सुरू असल्याचे उद्धव ठाकर म्हणाले…

Read More

जळगाव : प्रतिनिधी सहा महिन्यांपुर्वीच लग्न झालेल्या अश्विनी गणेश पाटील (वय १९, रा. लमांजन, ता. जळगाव) या विवाहितेने घरी कोणीही नसतांना गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी विवाहितेची सासू कामावरुन घरी आल्यानंतर उघडकीस आली. विवाहितेच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील लमांजन येथे अश्विनी गणेश पाटील या विवाहिता पत्नी, सासू सासऱ्यांसह वास्तव्यास होत्या. सहा महिन्यांपुर्वीच त्यांचे गावातीलच गणेश पाटील यांच्यासोबत विवाह झाला होता. सोमवारी त्यांचे पती एमआयडीसी परिसरातील कंपनीत कामाला गेले होते, तर सासू सासरे हे मजूरी कामासाठी गेले होते. त्यामुळे घरी एकट्याच असलेल्या अश्विनी पाटील या…

Read More