Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी बदली होऊन एक वर्ष होत आले तरी पोलिस मुख्यालय परिसरातील शासकीय निवासस्थाने न सोडणाऱ्या पाच पोलिस अंमलदारांना मोठा दंड करण्यात आला आहे. ही रक्कम त्यांच्या पगारातून कपात केली जाणार असून, तसे आदेश काढण्यात आले आहेत. पोलिस मुख्यालय परिसरात शासकीय निवासस्थाने आहेत. ज्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या इतरत्र झाल्या आहेत, त्यांना ही निवासस्थाने सोडण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली जाते. मात्र इतरत्र बदली झालेल्या पाच कर्मचाऱ्यांनी कालावधी उलटूनही निवासस्थानांचा ताबा सोडलेला नाही. त्यामुळे त्यांनी दिलेली मुदत उलटून किती कालावधीसाठी निवासस्थान ताब्यात ठेवले आणि क्षेत्रफळानुसार दंड करण्यात आला आहे. एका जणाला एक लाख दोन हजार २१९, दुसऱ्याला एक लाख १३ हजार ४१२…

Read More

जळगाव : प्रतिनिधी गतिरोधकावर दुचाकी उधळल्याने सागर रामचंद्र सूर्यवंशी (वय ३२, रा. रावळगाव, ता. मालेगाव) हे दुचाकीस्वार खाली पडून डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (१५ जुलै) रात्री प्रेम नगरातील महाराणा प्रताप हायस्कूलजवळ घडली. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सूर्यवंशी हे कामानिमित्त सासरी आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील दशरथ नगरात सागर सूर्यवंशी यांचे सासर आहे. ते सोमवारी (१४ जुलै) कामानिमित्त दुचाकीने सासरी आलेले होते. मंगळवारी (१५ जुलै) रात्री ते दुचाकीने प्रेम नगरातील महाराणा प्रताप हायस्कूल जवळून जात असताना गतिरोधकावर त्यांची दुचाकी आदळली गेली. त्यात ते खाली पडले व त्यांच्या…

Read More

एरंडोल : प्रतिनिधी तालुक्यातील खडकेसिम येथील महिला बचत गटाच्या अध्यक्षा जयश्री योगेश सुतार व सचिव संगीता भरत पाटील या बचत गटाची कर्जाची रक्कम स्टेट बैंक एरंडोल शाखेतून काढून घरी जात असताना दुचाकीवरील दोघांनी रोकड असलेली पिशवी धूम स्टाईलने लांबवली. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. सविस्तर वृत्त असे कि, जयश्री सुतार यांनी हातातील पिशवी बाजूला असलेल्या ओट्यावर ठेवली. त्यावेळी चोरट्यांनी संधी साधू पोबारा एरंडोल तालुक्यातील खडकेसिम येथे सावित्री महिला बचतगट असून त्यात एकूण १० सदस्य आहेत. या बचतगटाच्या अध्यक्षा जयश्री योगेश सुतार व सचिव संगीता भारत पाटील या आहेत. उमेद अभियानांतर्गत मे महिन्यात ६ लाख रुपयांचे कर्ज या बचत गटास मंजूर…

Read More

जळगाव : प्रतिनिधी कोणाला नायब तहसीलदार तर कोणाला क्लास वन ऑफिसर सांगून धरणगाव येथील निनाद विनोद कापुरे याने लग्नाच्या नावाने अनेक तरुणींना गंडविल्याचा प्रकार उघडकीस आला असून नाशिक आणि फलटण येथील तरुणींनी यासंदर्भात बुधवारी (१६ जुलै) पोलिस अधीक्षकांना भेटून लेखी तक्रार केली. यापैकी फलटणची तरुणी डॉक्टर आहे. तरुणींच्या तक्रारीवरुन नाशिक व फलटण येथे त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल झालेला आहे, मात्र नाशिकच्या गुन्ह्यात अद्याप अटक झालेली नाही. या तरुणींनी दिलेल्या माहितीनुसार, मॅरेज ब्युरो या ऑनलाइन साईटवरुन निनाद कापुरे याने त्यांच्याशी संपर्क साधला. आई, वडिलांच्या संमतीने त्याने नाशिकच्या तरुणीकडून सात लाख तर फलटणच्या डॉक्टर तरुणीकडून आठ लाख रुपये उकळले. आपल्याला पदोन्नती मिळाली असून,…

Read More

मेष राशी आजचा दिवस कठीण जाईल. महत्त्वाचं काम पूर्ण करण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागू शकतो. सामाजिक कार्य करताना वागण्यात संयम ठेवा. विरोधक तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करू शकतात. या बाबतीत सावधगिरी बाळगा. कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रम करूनही, तुम्हाला चांगले परिणाम मिळणार नाहीत. वृषभ राशी कोणत्याही महत्त्वाच्या कामाची जबाबदारी दुसऱ्यावर देण्याऐवजी ते काम स्वतः करा. व्यवसायात, भावनांपेक्षा तुमच्या बुद्धिमत्तेला आणि विवेकाला जास्त महत्त्व द्या. राजकारणात, तुमच्या प्रभावी भाषणाचे कौतुक केले जाईल. जर तुम्ही तुमच्या जवळच्या नातेवाईक आणि मित्रांसोबत एकत्र काम केले तर नफ्याची शक्यता जास्त असेल. मिथुन राशी आज तुम्ही तुमच्या शत्रूंवर विजय मिळवाल. व्यवसायातील परिस्थिती सुधारेल. राजकीय विरोधकांचा पराभव होईल.…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात एक मोठी बातमी समोर आली आहे. महायुती सरकारचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने नवा डाव टाकला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेना आणि आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेची युती होणार आहे. हे दोन्ही पक्ष आगामी महापालिका निवडणुका आणि जिल्हापरिषदेच्या निवडणुका एकत्रितपणे लढणार आहेत. आनंदराज आंबेडकरांच्या पक्षासोबत युती करुन एकनाथ शिंदेंनी मराठी आणि दलित मतदार सोबत घेण्याची खेळी खेळल्याची राजकीय चर्चा सध्या सुरु झाली आहे. दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्षाने त्यासाठी कंबरही कसली आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधाती महाविकास आघाडीतील मित्र पक्ष आपली…

Read More

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था राज्यातील काबाडकष्ट करून चार एकर शेतामध्ये कोथिंबिरीचे पीक घेतले. चार पैसे हाताशी येतील या आशेने जीवापाड जपलेल्या कोथिंबिरीला बाजारात योग्य भाव न मिळाल्याने एका शेतकऱ्याने निराश होऊन चक्क ४ एकर कोथिंबिरीवर रोटर फिरवल्याची दुर्दैवी घटना चाकूर येथे घडली आहे. दयानंद धोंडगे हे चाकुरातील एक अल्पभूधारक शेतकरी आहेत. ते दिवसरात्र शेतीत राबतात, त्या पिकास विविध खते, अत्याधुनिक औषधी आणि फवारणीचा वापर करून चाळीस दिवस त्याची निगा राखली. बाजारात चांगला भाव मिळेल या आशेने त्यांनी बाजारात कोथिंबीरच्या भावाची विचारपूस केली. कोथिंबीरचे भाव पडल्याचे लक्षात येताच शेतात केलेली मेहनत आणि त्यासाठी केलेला ४० हजार खर्च निघणार नाही, मजुरीचे पैसेही…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधूंच्या मराठीच्या मुद्यावरून एकत्र आल्यानंत शिवसेना उबाठा आणि मनसेच्या युतीच्या जोरदार चर्चा होत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या असताना ठाकरे बंधूंचे एकत्र येणे याला राजकीय लेअर असल्याचे बोलले जात आहे. मात्र, अद्यापर्यंत उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्यावर सकारत्मकता दाखवली असली तरी राज ठाकरे आपली सावध भूमिका घेत आहेत. अशातच उद्धव ठाकरे यांची सामनाचे संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीचा टीझर समोर आला आहे. या टीझरमध्ये राऊत विविध मुद्यांवर उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणातले ठाकरी वारे काही हटत नाही थंड पडत नाही, असं विचारतात. “सदा सर्वदा ठाकरे…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर शशिकांत शिंदे यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली. मात्र जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देताच एका दिग्गज नेत्याकडून त्यांना महायुतीसाठी ऑफर देण्यात आली आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जयंत पाटलांना महायुतीत येण्याची ऑफर दिली आहे. “जयंत पाटील यांचे तिकडे मन लागत नसेल किंवा त्यांना मार्ग बदलायचा असेल तर त्यांनी महायुती सोबत आले पाहिजे. जयंत पाटील हे संघर्षशील नेते आहेत. त्यांनी राजीनामा दिला आहे, त्यांना विकास करायचा असेल तर सत्तेसोबत आलं पाहिजे. राष्ट्रवादी सोडणार असाल तर मी मध्यस्थी करून त्यांना महायुतीत आणायला तयार आहे”,…

Read More

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील दहिगाव येथील एका ३५ वर्षीय तरुणाचा शेतातील विहिरीत पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे घडली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सविस्तर वृत्त असे कि, दहिगाव येथील प्रदीप घनश्याम महाजन (वय ३५) हा तरुण मोहराळे शिवारातील बाळू रघुनाथ पाटील यांच्या शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेला होता. विहिरीजवळ असताना पाय घसरून तोल गेल्याने प्रदीप महाजन हे विहिरीत पडले. यात विहिरीतील पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १५ रोजी पहाटे घडली. या बाबत पुरुषोत्तम छगन महाजन यांनी दिलेल्या माहितीवरुन यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ…

Read More