जळगाव : प्रतिनिधी शनिपेठ व शहर पोलिस ठाण्यामध्ये वेगवेगळे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या दोन जणांना जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. तसे आदेश उपविभागीय दंडाधिकारी विनय गोसावी यांनी काढले. सविस्तर वृत्त असे कि, शनिपेठ परिसरातील गुरुनानक नगरातील रहिवासी नीलेश नरेश हंसकर याच्याविरुद्ध पाच गुन्हे दाखल असण्यासह दोन वेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. या शिवाय इंद्रप्रस्थनगरातील दीपक दगडू भोई याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात सहा वेगवेगळे गुन्हे दाखल असण्यासह दोन वेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. या दोघांकडून आणखी काही गंभीर गुन्हा घडू शकतो, त्यामुळे दोघांविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव अनुक्रमे शनिपेठ व शहर पोलिस ठाण्याच्या वतीने पाठविण्यात आला होता. त्यानुसार उपविभागीय…
Author: editor desk
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पहूर येथे दुचाकीला कुत्रा आडवा आल्याने झालेल्या अपघातात पहूर कसबे (ता. जामनेर) येथील माहेरवाशीण प्रीती तुकाराम गीते (४३, रा. पिंपळगाव हरेश्वर, ता. पाचोरा) या ठार झाल्या. त्या द्वारदर्शनासाठी माहेरी येत होत्या. ही घटना पहूर ते पाचोरा रस्त्यावर रविवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली. सविस्तर वृत्त असे कि, पती-पत्नी दुचाकीने पहूर येथे व्दारदर्शनासाठी येत होते. पहूर गाव दोन किलोमीटर अंतरावर असताना पहूर-पाचोरा रस्त्यावर दुचाकीला कुत्रा आडवा आला. काही कळण्याच्या आत पती-पत्नी जमिनीवर कोसळले. कोसळल्यावर प्रीती यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. जखमी पती-पत्नीला पहूर येथील ग्रामीण रुग्णालयात आणि तिथून पुढील उपचारासाठी जळगावला नेत असताना वाटेत प्रीती यांचा मृत्यू…
जळगाव : प्रतिनिधी धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील तरुणीशी सोशल मीडियावर ओळख झाल्यानंतर तिला जळगावात बोलवून नेरीच्या तरुणाने एका खोलीमध्ये तिच्यावर अत्याचार केला. ही घटना १० जुलै रोजी उघडकीस आली. या प्रकरणी संशयित अमोल राठोड (रा.नेरी, ता. जामनेर) याच्याविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शिरपूर येथील एका तरुणीची अमोल राठोड या तरुणासोबत सोशल मीडियावर ओळख झाली. दोघांचे नियमित मोबाइलवर बोलणे सुरू होते. १० जुलै रोजी, सकाळी अमोल राठोड याने तरुणीला जळगाव बस स्थानकावर भेटण्यासाठी बोलविले. मी शाळेत जात असल्याचे आईला सांगून ही तरुणी जळगावात आली. यावेळी हा तरुण हा मित्रासोबत तिला भेटण्यासाठी आला. नंतर…
मेष राशी आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी शुभ राहील. तुम्हाला जीवनात आनंद आणि समाधानाचा अनुभव मिळेल. स्वप्ने पूर्ण करण्याची संधी मिळेल. कामात मान-सन्मान मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत शुभ आहे. व्यवसायिकांनाही चांगला फायदा होईल. कौटुंबिक जीवनात नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक असेल. तुम्ही तुमच्या कामातून वरिष्ठांना इम्प्रेस कराल. बिघडलेले संबंध सुधारण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. लोकांशी सलोखा वाढेल. प्रियजनांसोबत वेळ घालवता येईल. मित्रांसोबत मौजमजा करण्याची संधी मिळेल. आरोग्य सामान्य राहील. उत्पन्नाचे नवीन स्रोत उपलब्ध होतील. मालमत्तेच्या कामात लाभ मिळेल. धर्म-कर्म कार्यात सहभागी व्हाल. मिथुन राशी मिथुन राशीच्या लोकांसाठी…
सोलापूर : वृत्तसंस्था जिल्ह्यातील अक्कलकोटमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना लोकांकडून तोंडाला काळं फासण्यात आले आहे. प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट येथे फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले असताना हि घटना घडली आहे. शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांकडून त्यांना काळं फासण्यात आले. हाती आलेल्या माहितीनुसार प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट दौऱ्यावर होते. यावेळी ते फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी आले होते. तिथे येताच काही लोक अचानकपणे त्यांच्याकडे आले आणि जमा होत त्यांनी प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं. काळं फासणारे लोक हे शिवधर्म फाउंडेशनचे कार्यकर्ते असल्याचे समजत…
तिरुवल्लूर : वृत्तसंस्था देशातील तामिळनाडूतील तिरुवल्लूरजवळ रविवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग लागल्यामुळे रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. या आगीत 4 ते 13 टँकर वॅगन्स जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. रविवारी पहाटेच्या सुमारास ही मालगाडी तिरुवल्लूर स्थानकाजवळून जात असताना अचानक एका वॅगनमध्ये आग लागली. ही आग काही वेळातच अन्य डिझेल टँकरपर्यंत पसरली आणि आगीचे लोट व धुराचे गडद वलय परिसरात पसरले. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे चेन्नई-अरक्कोनम रेल्वेमार्गावरील विद्युत पुरवठा तातडीने बंद करण्यात आला,…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था ज्येष्ठ सरकारी वकील उज्वल निकम यांना मोठी संधी देण्यात आली आहे. राष्ट्रपती नामनिर्देषित खासदार म्हणून उज्वल निकम यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे. अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये उज्वल निकम यांनी काम पाहिले असून ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे. उज्वल निकम यांनी 2024 च्या लोकसभेला उज्जल निकम यांनी उत्तर मध्य मुंबईतून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी पराभव केला. त्यानंतर आता निकम यांची राज्यसभेवर वर्णी लागली आहे. उज्वल निकम यांच्यासोबत तीन जणांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. चार जणांना खासदारपदी निवड हर्षवर्धन श्रृंगला – भारताचे माजी परराष्ट्र सचिव डॉ. मीनाक्षी…
मुक्ताईनगर : प्रतिनिधी भरधाव डम्परने एसटी बसला जोरदार धडक दिल्याने बसचालकासह १९ प्रवासी जखमी झाल्याची घटना तरोडा ते रुईखेडादरम्यान शनिवारी दुपारी दोन वाजता घडली. या जखमींपैकी सात जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना उपचारासाठी जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले आहे. सविस्तर वृत्त असे कि, मुक्ताईनगर आगाराची बस ( एमएच- २०, बीएल- २९४४) मुक्ताईनगर-मलकापूर दुपारी मलकापूरकडे जात असताना तरोडा ते रुईखेडादरम्यान गौण खनिजाने भरलेले डम्पर (एमएच ३०, बीडी- २४१८) वेगात समोरून आले आणि बसला जोरदार धडक दिली. धडकेमुळे बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. या अपघातात १९ प्रवासी जखमी झाले असून यात चालकाचाही समावेश आहे. जखमींवर मुक्ताईनगर ग्रामीण रुग्णालयात उपचार…
अमळनेर : प्रतिनिधी शेतमजुरांची वाहतूक करणाऱ्या रिक्षाला जीपने धडक दिल्याने २२ जण जखमी झाले. यापैकी २ जण गंभीर आहेत. हा अपघात १२ रोजी सकाळी अमळगाव-जळोद रस्त्यावर घडला. सविस्तर वृत्त असे कि, चोपडा तालुक्यातील बुधगाव येथून एकाच रिक्षामध्ये (एमएच १९ बीजे ४३६५) सुमारे १६ शेतमजूर सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अमळगावकडे आणले जात होते. त्यावेळी अमळगावकडून जळोदकडे जाणाऱ्या जीपवरील (एमएच १९ सीझेड २५२२) चालक पवन तुकाराम बाविस्कर याने जोरात धडक दिल्याने रिक्षातील काही प्रवासी रस्त्यावर फेकले गेले व काही रिक्षात अडकले. या अपघातात रिक्षात बसलेले विकास भिला कोळी (वय ३५), सचिन कैलास शिरसाठ (वय २२), उमेश कैलास शिरसाठ (वय १९), रघुनाथ साहेबराव…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील आर.आर.विद्यालयामध्ये कल्पेश वाल्मीक इंगळे (१५, रा. रचना कॉलनी) या विद्यार्थ्याच्या मृत्युप्रकरणी त्याच्या वर्गमित्राविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात संस्थाध्यक्ष, मुख्याध्यापक, वर्गशिक्षिका यांनी दिशाभूल केली असून, त्यांच्याविरुद्धही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाइकांनी केली आहे. कल्पेशच्या डोक्याला दुखापत झाली असल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद आहे. सविस्तर वृत्त असे कि, आर. आर. विद्यालयामध्ये कल्पेश इंगळे या विद्यार्थ्याचा शुक्रवारी (११ जुलै) मृत्यू झाला. त्याला अन्य मुलांनी मारहाण केल्याने मृत्यू झाल्याचे नातेवाइकांनी पोलिसांना सांगितले. तसेच शाळेच्या कारभाराविरुद्ध रोष व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी केली. त्यानुसार शुक्रवारी रात्रीच कल्पेशच्या वर्गशिक्षिका, चार ते पाच वर्गमित्र यांना पोलिसांनी बोलावून…

