Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !
    क्राईम

    जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !

    editor deskBy editor deskJune 14, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी

    दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील ५०० मेगावॅट प्रकल्पात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या एमएसएफ (महाराष्ट्र सुरक्षा दल) जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. गणेश बापू दैवत (वय ३१, रा. माहीजी, ता. पाचोरा) हे नियमित वॉकिंगदरम्यान मैदानावर कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला.

    ११ जून २०२५ रोजी गणेश दैवत यांनी ड्युटी पूर्ण करून सायंकाळी मैदानावर फिरण्यासाठी गेले. तेथेच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. ते मैदानावरच कोसळले. त्याचवेळी पावसाला सुरुवात झाली होती. पावसातही उठत नसल्याचे पाहून त्यांच्या सहकाऱ्यांनी जवळ जाऊन पाहणी केली. गणेश यांना भुसावळ येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांचा पत्नी, आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    २४ तासांत चोरीचा पर्दाफाश : जळगाव पोलिसांची झटपट कारवाई !

    April 18, 2026

    राज्यात उष्णतेचा कहर, अवकाळी पावसाचा तडाखा : दुहेरी संकटात शेतकरी-नागरिक हैराण

    April 18, 2026

    धक्कादायक : मास्टर कॉलनी तरुणाने संपविले आयुष्य !

    April 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.