Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अजित पवारांचे वादग्रस्त विधान : धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरी करूनच कोट्यधीश झाले !
    राजकारण

    अजित पवारांचे वादग्रस्त विधान : धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरी करूनच कोट्यधीश झाले !

    editor deskBy editor deskJune 16, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यातील महायुती सरकारचे उपमुख्यमंत्री अजित पवार आता वादग्रस्त विधानाने चर्चेत आले आहे. रिलायन्स उद्योग समुहाच्या माध्यमातून जगभरात भारताचा मान उंचावणारे दिवंगत उद्योगपती धीरूभाई अंबानी यांच्याविषयी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वादग्रस्त विधान केले आहे. धीरूभाई अंबानी पेट्रोल पंपावरील पेट्रोल चोरी करून कोट्यधीश झाले, असे ते म्हणालेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांच्या विधानाचा व्हिडिओ पोस्ट करत त्यांना खोचक टोला हाणला आहे. धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरून कोट्यधीश झाले आणि तुम्ही? असा सवाल त्यांनी यासंबंधी केला आहे.

    बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारन्याची येत्या 22 जून रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या प्रचारात अजित पवार दंड थोपटून उतरलेत. त्यांनी ब वर्ग सहकारी संस्था मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी या निवडणुकीच्या प्रचारात पाहुणेवाडी येथे आयोजित एका सभेत धीरूभाई अंबानी यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले. त्यांच्या या विधानाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

    अजित पवार काय म्हणाले व्हिडिओत?

    अजित पवार आपल्या व्हिडिओत म्हणतात, धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरी करूनच कोट्यधीश झाले. मला सहकार टीकवायचे नसते, तर मी पेट्रोल पप काढले असते का? काही का होईना, माझ्या गोरगरिबांची मुले तिथे लागली ना कामाला. पंपावर काम करणे कमीपणाचे नाही. पंपावरच पेट्रोल चोरी करून धीरूभाई अंबानी कोट्यधीश झाले. त्यामुळे पडेल ते काम करण्याची तयारी असली पाहिजे. मिळेल त्या कामातून आपण सोने तयार केले पाहिजे.

    मी सहकार मोडायला निघालो असतो, तर मी संस्था मोठ्या केल्या असत्या का? माझा खासगी कारखाना काढण्याची तयारी नव्हती. सरकारने बंधने घातली. पण आम्ही आमचे कारखाने कुणाला चालवायला दिले नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

    अजित पवार यांनी हे विधान उपस्थितांना कामाचे महत्व पटवून देण्यासंबंधी केले. पण त्यावरून आता सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात चांगलाच वाद रंगला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांचा व्हिडिओ पोस्ट करत त्यांना त्यांनी केलेल्या घोटाळ्यांची आठवण करून दिली आहे. धीरूभाई अंबानी पंपावर पेट्रोल चोरून कोट्यधीश झाले आणि तुम्ही? सिंचन घोटाळा, एमएससीबी घोटाळा करून आपण काय केलेत? असे प्रश्न दमानिया यांनी आपल्या पोस्टमध्ये केलेत.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कष्टकरी कुटुंबातून मुंबई कोर्टापर्यंत; भगवान नन्नवरे यांची प्रेरणादायी वाटचाल

    August 11, 2026

    शालार्थ घोटाळ्याचा जळगाव कनेक्शन धक्कादायक! ६६ संस्था, ८४९ जण संशयाच्या भोवऱ्यात

    August 11, 2026

    राष्ट्रीय महामार्गांच्या हद्दीत नवीन ढाबे, हॉटेलला ब्रेक; अनधिकृत बांधकामे ६० दिवसांत हटवण्याचे आदेश

    August 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.