रायगड: वृत्तसंस्था “छत्रपती शिवाजी महाराज की जय….!” अशा घोषणांनी दुमदुमलेला परिसर, पर्यटकांचा वाढलेला उत्साह आणि स्थानिक व्यावसायिकांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधानाचे भाव… हे चित्र होते आज (दि.१९) किल्ले रायगडाच्या पायथ्याशी. निमित्त ठरले जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयाचे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेला रायगडचा पायरी मार्ग आता केवळ हवामान खात्याचा ‘रेड’ किंवा ‘ऑरेंज’ अलर्ट असेल, त्याच दिवशी बंद ठेवला जाणार आहे. काही दिवसांपूर्वी, जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी अतिवृष्टीचा धोका लक्षात घेऊन रायगडचा पायरी मार्ग पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय योग्य असला तरी, यामुळे रायगडावर येणाऱ्या शिवप्रेमी आणि पर्यटकांचा मोठा हिरमोड झाला होता. त्याचबरोबर,…
Author: editor desk
अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील मंगरूळ येथील ३८ वर्षीय तरुणाने राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरुवार १७ जुलै रोजी सकाळी १० वाजता समोर आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. निंबा पांडुरंग कुंभार (वय-३८), रा. मंगरूळ ता. अमळनेर असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे. नातेवाईकांकडून मिळालेली ही माहिती अशी की, निंबा कुंभार हा आपल्या कुटुंब अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथे वास्तव्याला होता. गुरुवार १७ जुलै रोजी सकाळी १० वाजेच्या राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. दरम्यान आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. ही घटना समोर आल्यानंतर नातेवाईकांनी धाव…
बोदवड : प्रतिनिधी जागेच्या मोजणीवरून १७ रोजी प्रभाग क्रमांक ११ च्या नगरसेविकेच्या कुटुंबाचा शेजारच्यांशी वाद झाला होता. या वादातून मारहाणीपर्यंत प्रकरण गेले होते. या घटनेची पहिल्या गटाकडून गुरुवारीच भोई यांनी तक्रार दिली होती. तर शुक्रवारी पुष्पा सुरेश चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे. एकनाथ फकिरा भोई, राजू फकिरा भोई, अनिकेत राजू भोई, निखिल राजू भोई, मंदा एकनाथ भोई, शोभा राजू भोई सर्व रा. भोईवाडा यांनी मारहाण व शिवीगाळ केल्याची फिर्याद शुक्रवारी बोदवड पोलिसात नोंदविण्यात आली आहे. दरम्यान नर्मदाबाई भोई यांनी नगरसेविका बेबीबाई चव्हाण यांचा मुलगा नितीन रमेश चव्हाण व सचिन रमेश चव्हाण तसेच रमेश नामदेव चव्हाण, सुरेश नामदेव चव्हाण, दीपक सुरेश…
फैजपूर : प्रतिनिधी बामणोद येथील सराईत गुन्हेगार रोहित ऊर्फ सोनट्या नितीन केदारे (वय २३) याला फैजपूर उपविभागीय अधिकारी यांनी सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. त्याच्या विरुद्ध फैजपूर पोलिस ठाण्यात बरेच गुन्हे दाखल आहेत. पोलिसांच्या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली फैजपूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर मोताळे, हवालदार मोती पवार, पोलिस नाईक समाधान पाटील, पोलिस कॉन्स्टेबल मुकद्दर तडवी यांनी केली.
मेष : दिवस संतुलित राहील. वडीलधाऱ्यांचा सल्ला फायदेशीर ठरू शकतो. काम सामान्य राहील, आर्थिक स्थिती स्थिर राहील. कौटुंबिक समस्या सोडवल्या जातील. वृषभ : दिवस आनंदाने भरलेला असेल, जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्न बळकट होईल, काम पूर्ण समाधानाने पूर्ण होईल. मुलांशी संबंधित योजना प्रत्यक्षात येतील. मिथुन : दिवस व्यस्ततेने भरलेला असेल. काम चांगले होईल, परंतु वाद टाळा. धार्मिक कार्यक्रम शक्य आहेत, सुसंवाद राखा. मानसिक थकवा कायम राहू शकतो. कर्क : दिवस चांगला आहे, लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात, कामात यश मिळेल. नातेसंबंधांमध्ये नवीन ऊर्जा येईल. सर्जनशील काम मानसिक आराम देईल. सिंह : सुवर्ण दिवस, तुम्हाला…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुंबईत दि.१८ जुलै २०२५ रोजी सकाळी अचानक एक तीन मजली चाळ कोसळली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 12 जण अडकल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाने (एमएफबी) लेव्हल-2 अलर्ट जारी केला आणि बचाव कार्य सुरू केले. पोलिस आणि बचाव पथकांनी मोठ्या प्रयत्नानंतर लोकांना बाहेर काढले आहे. मुंबईतील वांद्रे परिसरातील भारत नगर येथील चाळ क्रमांक-37 मध्ये ही दुर्घटना घडली. स्फोटानंतर संपूर्ण इमारत कोसळली. आतापर्यंत ढिगाऱ्यातून बाहेर काढलेल्या 12 जणांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना आज सकाळी 7:50 च्या सुमारास घडली. प्राथमिक तपासानुसार, इमारतीत सिलिंडरचा स्फोट झाला, त्यानंतर इमारतीचा काही…
पुणे : वृत्तसंस्था देशात सोन्याचे भाव गगनाला भिडले असतानाच, सामान्य ग्राहकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणीनंतर अखेर सरकारने नऊ कॅरेट सोन्यालाही हॉलमार्किंगची परवानगी दिली आहे. यामुळे लवकरच बाजारात नऊ कॅरेटचे प्रमाणित हॉलमार्क दागिने उपलब्ध होणार असून, ग्राहकांना आता स्वस्त दरात दागिने खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. हॉलमार्किंग परवानगी मिळाल्यामुळे सोन्याच्या दागिन्यांची विविधता वाढणार असून, ग्राहकांसाठी एक नवीन पर्याय खुला झाला आहे. नऊ कॅरेट म्हणजे सुमारे 38% शुद्धता असलेले सोनं, जे 24 कॅरेटच्या तुलनेत तब्बल 60% पर्यंत स्वस्त पडते. सध्या 24 कॅरेट सोन्याची किंमत 1 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास असून, त्याच वजनाचे नऊ…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील विधीमंडळाच्या लॉबीत गुरुवारी गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणाची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गंभीर दखल घेतली. जी घडना घडली ती गंभीर आहे. याबाबत सुरक्षा अधिकाऱ्यांनी अहवाल दिला असल्याचे नार्वेकर यांनी शुक्रवारी (दि.१८ जुलै) सभागृहात सांगितले. या प्रकरणी ६ ते ७ जणावर मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात आली. दोघे जण परवानगी न घेता विधीमंडळ परिसरात आले. ते कोणत्याही स्वरूपाची परवानगी नसताना आणि अनधिकृतपणे सदस्यांसोबत आले. हे आक्षेपार्ह कृत्य असल्याचे नार्वेकर यांनी नमूद केले. विधानभवन सभागृहात असे कधीही झाले नाही. मुळात त्या अभ्यांगतांना आत आणायची…
मुंबई: वृत्तसंस्था विधानभवन परिसरात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीच्या घटनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “ही चित्रफीत पाहून महाराष्ट्राची काय अवस्था झाली आहे, असा प्रश्न पडतो,” असे म्हणत त्यांनी सध्याच्या राजकीय संस्कृतीवर जोरदार टीका केली. जर अशा घटनांना वेळीच आवर घातला नाही, तर “भविष्यात विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही,” असा गंभीर इशाराही दिला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर बोलताना ठाकरे म्हणाले, “सत्ता हे साध्य नसून साधन आहे, याचा विसर पडल्याने वाटेल त्या लोकांना पक्षात घेऊन त्यांचा वापर ज्येष्ठ नेत्यांवर गलिच्छ शेरेबाजीसाठी केला जात आहे. हा भंपकपणा आता जनतेच्या लक्षात…
मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या विधिमंडळ परिसरात आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये काल हाणामारी झाली. त्यानंतर जितेंद्र आव्हाड रात्री दोन वाजेपर्यंत विधिमंडळ परिसरात थांबून आंदोलनाच्या भूमिकेत होते. त्याच दरम्यान विधानभवनाच्या मागच्या गेटने आव्हाड यांचा समर्थक नितीन देशमुख याला पोलिस घेऊन जात असताना आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांची काडी अडवली. पोलिसांच्या गाडीच्या समोरच आंदोलन करत आव्हाड थेट गाडीच्या खाली घुसले होते. त्यामुळे काल मध्यरात्री विधिमंडळ परिसरात चांगलाच गोंधळ उडाला. पोलिसांच्या वतीने मार खाणाऱ्याला अटक केली जात असून त्याला मारहाण करणारे पाच जणांची पाठराखण केली जात असल्याचा आरोप यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी केला. या प्रकरणातील गोपीचंद पडळकर यांच्या समर्थक…

