जळगाव : प्रतिनिधी रात्रीच्या सुमारास घराकडे पायी जात असलेल्या सैय्यद फैय्याज गयासुद्दीन (वय ५२, रा. सुप्रिम कॉलनी) या व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोकड जबरीने हिसकावून नेल्याची घटना घडली होती. यातील संशयित अमन उर्फ खेडका सैय्यद रशिद (रा. सुप्रिम कॉलनी) याच्या एमआयडीसी पोलिलसांनी मुसक्या आवळल्या. शहरातील कांद्याचे व्यापारी असलेले सैयद फैय्याज गयासुद्दीन हे दि. १२ जुलै रोजी रात्री अजिंठा चौफुलीपासून सुप्रिम कॉलनीकडे पायी जात होते. त्या वेळी एका बेकरीजवळ अमन खेकडा नामक व्यक्तीने त्यांना अडविले व चाकू काढून त्यांच्या पोटाला लावला. कॉलर पकडून शिवीगाळ करीत ‘किती पैसे आहे लवकर काढ नाही तर भोसकून देईल’, अशी धमकी दिली. सैयद यांनी प्रतिकार…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी शहरातील महिला महाविद्यालयात पदविचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीशी मोबाईलवर संपर्क करुन रिक्षाचालकाकडून त्रास दिला जात होता. गुरुवारी या रिक्षाचालकाने मुलीला रिक्षात बसवुन खान्देश सेंट्रल येथे नेत अंगलट करण्याचा प्रयत्न केला. परिसरातील नागरीकांनी पोलिसांना पाचारण केल्यानंतर पिडीतेच्या तक्रारीवरुन शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असलेली २० वर्षीय तरुणी शहरातील एका महिला महाविद्यालयात पदविचे शिक्षण घेत आहे. या विद्यार्थीनीला गेल्या काही दिवसांपासुन एक रिक्षाचालक मोबाईलवर संपर्क करुन त्रास देत होता. मुलीने माझे लग्न ठरलेले असल्याचे सांगीतल्या नंतरही संशीताकडून त्रास सुरु असतांना मुलीने दुर्लक्ष केले. आज गुरुवार दुपारी साडेबारा वाजता कॉलेज सुटल्यावर…
बोदवड : प्रतिनिधी शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील भोईवाडा परिसरात १७ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घराशेजारी जागेच्या मोजणीवरून वाद झाला. यातून दोन गटात हाणामारी झाली. मिळालेल्या माहितीनुसार, नगरसेविका बेबीबाई चव्हाण यांच्या घराशेजारील नमदाबाई एकनाथ भोई या दोन कुटुंबांमध्ये हा वाद झाला. फिर्यादी नर्मदाबाई भोई यांनी नगरसेविका बेबीबाई चव्हाण यांचा मुलगा नितीन रमेश चव्हाण व सचिन रमेश चव्हाण तसेच रमेश नामदेव चव्हाण, सुरेश नामदेव चव्हाण, दीपक सुरेश चव्हाण, सागर सुरेश चव्हाण यांनी मारहाण करत शिवीगाळ केल्याची तक्रार दिली. तर या घटनेत माजी नगरसेवक व नगरसेविकेचा मुलगा नितीन रमेश चव्हाण यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांना जळगाव येथे हलविण्यात आले आहे. यामुळे…
जळगाव : प्रतिनिधी चोपडा तालुक्यातील वैजापूर परिसरात हरणाचे मांस विकण्यासाठी आलेल्या दोन जणांना बुधवारी दुपारी २ वाजता चोपडा ग्रामीण पोलिसांनी वनविभागाच्या मदतीने अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून हरणाचे मांस आणि दोन शिंगे जप्त करण्यात आली असून, याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील वांगऱ्या बारेला आणि त्याचा साथीदार दुचाकीवरून (एमपी १०, एनसी ४८५७) वैजापूर परिसरात हरणाचे मांस विक्रीसाठी येणार होते. ही माहिती वन्यप्राण्यांच्या तस्करीशी संबंधित असल्याने, तत्काळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात त्यानंतर, पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांच्यासह राजू महाजन, राकेश पाटील, गजानन पाटील, विनोद पवार, चेतन महाजन, सुनील कोळी तसेच वनविभागाचे…
मेष राशी आज दिवसाची सुरुवात काही तणावपूर्ण बातम्यांनी होऊ शकते. तुम्हाला अनावश्यकपणे इकडे तिकडे धाव घ्यावी लागेल. कामाच्या ठिकाणी खूप सुव्यवस्था असेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वयाने वागा. अनावश्यक वाद टाळा. वृषभ राशी आज क्रीडा जगताशी संबंधित लोकांना काही महत्त्वाचे पद किंवा जबाबदारी मिळू शकते. ज्यामुळे समाजात तुमचा प्रभाव वाढेल. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाच्या कामावर चर्चा करण्याची संधी मिळेल. मिथुन राशी आज नोकरीत स्थान बदलण्याची शक्यता आहे. विरोधक राजकारणात अधिक सक्रिय होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या विरोधकांच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवावे लागेल. कोणताही नवीन व्यवसाय सुरू करणे टाळा.व्यवसायात सर्व गुंतवणूक काळजीपूर्वक विचार करून करा. कामगार वर्गाला नोकरी…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर मंत्री नितेश राणे यांनी मदरशांवर लक्ष्य करत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. हिंदी-मराठी भाषेच्या वादावर बोलताना मंत्री नितेश राणे यांनी मराठी सक्तीचीच असली पाहिजे म्हटले. तर काँग्रेसकडून अमराठी भाषिकांना मराठी शिकवण्याचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याबद्दल राणे म्हणाले, ‘विरोधी पक्षांनी मुस्लिमांना सांगितले पाहिजे की, मशिदींमध्ये अजान पठण होते, अजानही मराठीतून झाली पाहिजे. मदरशांमध्येही मराठी सक्तीची करण्यात आली पाहिजे.” “मराठीतून शिक्षण दिले गेले, तरच तिथे खरे शिक्षण सुरू होईल. नाहीतर तिथून केवळ बंदूकाच निघतील. महाराष्ट्रात खूप मदरसे आहेत. तिथे उर्दूऐवजी मराठी सुरू करा, त्यामुळे तुमची मेहनत कमी होईल. तुमच्या मुल्ला-मौलवींना सांगा…
मुंबई: वृत्तसंस्था राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हनी ट्रॅप मुद्द्यावरून विरोधक आज (दि. १७) विधानसभेत आक्रमक झाले. त्यानंतर त्यांनी सभात्याग करत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी काँग्रेस नेते व आमदार नाना पटोले यांनी हनी ट्रॅपबाबत माझ्याकडे पेनड्राईव्ह असल्याचा दावा करून सरकारने उत्तर द्यावे, अशी मागणी केली. राज्यातील अनेक वरिष्ठ अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकेले आहेत. त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. हा मुद्दा मी विधानसभेत मांडला, पण सरकारने गांभीर्याने घेतलेला दिसून येत नाही. सरकार अजून उत्तर देत नाही. मला कोणाचे चारित्र्य हणन करायचे नाही. माझ्याकडे पेनड्राईव्ह सुद्धा आहे,असा दावा काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना केला. याबाबत सरकार वास्तविक गोष्टी…
नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील नाशिक जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. दिंडोरी कळवण रस्त्यावरील संस्कृती लॉनच्या समोर झालेल्या अपघातात सात जण ठार झाले आहे. अपघातामधील मृतांमध्ये तीन महिला, तीन पुरुष तसेच लहान बालकांचा देखील समावेश आहे. मोटरसायकल आणि अल्टो कार यांच्यात हा अपघात झाल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी मध्यरात्री 11 :30 च्या सुमारास मोटरसायकल आणि अल्टो कार क्रमांक एम एच ०४ डी वाय ६६४२ यांचा अपघात झाला असून अल्टो कार मधील सात प्रवासी ठार झाले आहेत. तर मोटरसायकल चालवणारे मंगेश यशवंत कुरघडे वय-२५, अजय जगन्नाथ गोंद वय -१८, राहणार नडगे गोट, तालुका जव्हार जिल्हा पालघर सध्या राहणार सातपूर…
मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणातील राणे व राऊत या दोन्ही नेत्यामुळे तापलेले असते आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात भाजप नेते नारायण राणे यांना बजावण्यात आलेले समन्स रद्द करण्याची मागणी सत्र न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता संजय राऊत यांच्या विरुद्ध नारायण राणे या प्रकरणावरील सुनावणी सुरुच राहणार आहे. या सर्व प्रकरणात नारायण राणे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा खटला 15 जानेवारी 2023 रोजी भांडूप येथील कोकण महोत्सवात राणे यांनी केलेल्या भाषणादरम्यान केलेल्या टिप्पणीशी संबंधित आहे. जिथे त्यांनी 2004 च्या लोकसभा निवडणुकीत राऊत यांच्या उमेदवारीच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.…
चाळीसगाव : प्रतिनिधी गुटख्याची वाहतूक करताना शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत नागदच्या व्यापाऱ्याचा ७लाख १९ हजार २९ रूपये किंमतीचा गुटखा पकडला आहे. वाहनासह एकूण १५ लाख १९ हजार २९ रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई १६ रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान शहर पोलिसांच्या पथकाने केली आहे. याप्रकरणी तीनजणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वाहनचालक सलीम मुनीर खान (२४, ग्रीन पार्क, जारगाव चौफुली, पाचोरा), अरबाज इब्राहीम पठाण (२२, सार्वे, ता. पाचोरा) व गुटख्याचा पुरवठादार दीपक प्रविणचंद बेदमुथा उर्फ जैन (नागद, ता. कन्नड) अशी तिघा आरोपींची नावे आहेत. सविस्तर वृत्त असे कि, चाळीसगाव शहर पोलिस…

