Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं. उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती खूप बिकट असल्यांचा सांगितलं. त्यांनी शेतकऱ्यांना कर्जातून बाहेर काढण्याची हीच खरी वेळ आहे असं देखील सांगितलं. उद्धव ठाकरे म्हणाले, ‘मी संजय राऊत, अंबादास दानवे, ओमराजे, कैलास आणि सर्व शिवसैनिकांनी एक दिवस मराठवाड्याच्या शेतकऱ्यांची भेट घेतली. आताची परिस्तिथी भयानक आहे..अजूनही काही भागात जोरात पाऊस सुरु आहे हातात आलेल्या शेतकऱ्याचा घास गेलेला आहे. हा शेतकऱ्यांचाच नाही तर आपला देखील घास गेला. त्याचं अख्ख आयुष्य वाहून गेलं. त्यात त्यांच्या डोक्यावर कर्ज आहे.’ उद्धव ठाकरे पुढं म्हणाले, ‘हिचं…

Read More

जळगाव : प्रतिनिधी भरधाव वेगात असलेल्या वाळूच्या डंपरने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून, एक अकरा वर्षांचा बालक गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्दैवी घटना मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड फाट्याजवळ शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली. अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये नितेशसिंग जगजितसिंग चौहान (वय ३२), पत्नी सुनीता नितेश चौहान (वय २५), व मुलगा शिव नितेश चौहान (वय ७, सर्व रा. मातापूर, ता. डोईफोडा, जि. ब-हाणपूर, मध्य प्रदेश) यांचा समावेश आहे. तर त्यांचा मोठा मुलगा नेहालसिंग नितेशसिंग चौहान (वय ११) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. श्री नितेशसिंग चौहान हे गेल्या दोन वर्षांपासून…

Read More

मेष राशी आज, तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळेल, ज्यामुळे तुमच्या घरात आनंद येईल. तुमच्या वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या कोणत्याही समस्या आज दूर होतील आणि कौटुंबिक वातावरण चांगले राहील. आज, तुम्हाला एका ऐतिहासिक परंपरेशी जोडण्याची एक उत्तम संधी मिळेल, जी तुम्हाला तुमच्या चालीरीती आणि परंपरा चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करेल. वृषभ राशी आज, तुम्हाला कुटुंबातील वडीलधाऱ्यांकडून सल्ला मिळेल, ज्यामुळे कोणतेही काम पूर्ण करणे सोपे होईल. या राशीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल, ज्यामुळे कोणताही प्रकल्प पूर्ण करणे सोपे होईल. आज तुम्ही सर्जनशील कामांकडे अधिक कल ठेवाल. बऱ्याच दिवसांपासून अडकलेलं काम पूर्ण होईल. मिथुन राशी आज तुमच्या नोकरीतील अडथळे दूर…

Read More

नवी दिल्ली : प्रतिनिधी सहकार क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल येथील शैलजादेवी दिलीप निकम यांना देशपातळीवरील ‘सहकारिता विभूषण पुरस्कार २०२४-२५’ प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार दि. २५ सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या कृभको (KRIBHCO)च्या ४५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एका विशेष समारंभात प्रदान करण्यात आला. या वर्षी संपूर्ण देशातून केवळ दोन व्यक्तींना हा गौरव मिळाला असून, त्यामध्ये शैलजादेवी निकम यांचा समावेश असणे हे महाराष्ट्रासाठी आणि सहकार क्षेत्रासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. पुरस्कार प्रदान सोहळ्याला कृभकोचे अध्यक्ष व्ही. सुधाकर चौधरी, सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते चंद्रपालसिंग यादव, इफकोचे चेअरमन दिलीप सिंघानिया, एनसीसीएफचे चेअरमन विशाल सिंग, माजी केंद्रीय कृषी मंत्री मोहनभाई कुंडारिया, कृभकोचे…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारसाठी महत्वाची योजना म्हणून लाडकी बहिण योजनेकडे पाहिले जात आहे. या ‘लाडकी बहीण’ योजनेनुसार फक्त वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. विशेष म्हणजे, कार्यरत सरकारी कर्मचारी किंवा निवृत्त कर्मचारी यांना या योजनेतून लाभ घेण्यास स्पष्ट मनाई आहे. तरीही काही महिलांनी जाणीवपूर्वक शासनाची फसवणूक केली. महिला व बालकल्याण विभागाने माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या मदतीने अशा सर्व बोगस लाभार्थींची यादी तयार केली आहे. या यादीत जिल्हा परिषदेतील कर्मचारी, शिक्षक, विविध शासकीय विभागातील महिला कर्मचारी तसेच निवृत्त कर्मचारी अशा 8 हजारांपेक्षा अधिक महिलांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र सरकारच्या लोकप्रिय…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील शनिमंदिर वॉर्डात राहणाऱ्या चौधरी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला, जेव्हा त्यांच्या १८ वर्षीय मुलाने, वडिलांनी रागावल्याच्या कारणावरून मानसिक तणावात येत तापी नदीत उडी घेतल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी घडली. उडी मारण्याआधी त्याने आपल्या मित्राशी व्हिडीओ कॉलवर संवाद साधत, “घरचे टेन्शन आहे… मी तापीत उडी घेतोय”, असे सांगितले आणि नंतर फोन बंद केला. मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय नीलेश चौधरी (वय १८) असे या तरुणाचे नाव आहे. बुधवारी सकाळी ९.३० वाजता तो तापी नदी पुलावर गेला. तिथून त्याने कंडारी येथील मित्र विजय बोदडे याला व्हिडिओ कॉल केला. संवादाच्या दरम्यान अक्षय रडू लागला आणि त्याने थेट नदीत उडी मारल्याचे विजयने सांगितले.…

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील मराठावाड्यात गेल्या काही दिवसापासून पावसाचे थैमान सुरु असून आता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) गुरुवारी महाराष्ट्राच्या विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यांमध्ये पाच दिवसांसाठी मध्यम पावसाचा इशारा देत पिवळा इशारा (यलो अलर्ट) जारी केला आहे. यापैकी दोन जिल्ह्यांमध्ये – चंद्रपूर आणि यवतमाळ – गुरुवारी – ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पिवळा इशारा मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता दर्शवितो, तर ऑरेंज अलर्ट मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देतो. आयएमडीच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने २५ ते २९ सप्टेंबर दरम्यान नागपूर, बुलढाणा, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अमरावती, अकोला, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यांसाठी पिवळा इशारा जारी केला आहे. पुढील काही तासांत यवतमाळ…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यावर टोलच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. गडकरी यांनी टोलच्या माध्यमातून जनतेचा पैसा त्यांच्याशी संबंधित कंपन्यांमध्ये वळवला असून, त्यांच्या दोन्ही मुलांच्या कंपन्यांना याचा थेट फायदा झाला असल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे. या आरोपांना भारतीय जनता पक्षाने (भाजप) तथ्यहीन आणि बदनामीसाठी केलेले जुने आरोप असल्याचे सांगत फेटाळून लावले आहे. दमानियांचे आरोप काय? अंजली दमानिया यांनी गडकरींवर टोल व्यवस्थापन आणि रस्ते बांधणीच्या कंत्राटांमध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. त्या म्हणाल्या, “नागरिक रोड टॅक्स, सेल्स टॅक्स, जीएसटीसारखे कर भरत असताना टोल का…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालयात दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी राज्यस्तरीय आयनोव्हा २०२५ स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत आयटी क्विझ, गेमेथॉन, थिंकर टँक व पोस्टर प्रेझेंटेशन अशा आकर्षक उपक्रमांचा समावेश होता. पदवी तसेच पदव्युत्तर गटांमधील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवून वातावरण उत्साही केले. या उपक्रमाचे विशेष म्हणजे हा संपूर्ण कार्यक्रम २४ विद्यार्थी स्वयंसेवक यांनी प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. राकेश जगदीश रामटेके (वरिष्ठ प्राध्यापक व संचालक, संगणकशास्त्र शाळा, प्रमुख – डॉ. आंबेडकर विचार विभाग, समाजशास्त्र शाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. प्रा. डॉ. राकेश रामटेके यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून…

Read More

जळगाव : प्रतिनिधी धरणगाव तालुक्यातील चांदसर गावाचे माजी प्रथम लोकनियुक्त सरपंच श्री. सचिन जगन्नाथ पवार यांची अखिल भारतीय सरपंच परिषद उत्तर महाराष्ट्र विभाग संघटक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सरपंच कार्यकाळात श्री. पवार यांनी गावच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कार्य केले असून, त्याचे सकारात्मक परिणाम संपूर्ण परिसरात पाहायला मिळाले. त्यांच्या या कार्याची दखल घेत परिषद अध्यक्षांनी ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील सरपंच बांधवांना मार्गदर्शन व सहकार्य मिळणार असून, गावपातळीवर अधिक सक्षम नेतृत्व तयार होण्यास हातभार लागणार आहे. या निवडीबद्दल राज्याचे माननीय पालकमंत्री मा. गुलाबराव पाटील…

Read More