जळगाव : प्रतिनिधी रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीस्वारांना भरधाव दुचाकीने धडक देत जखमी केले. ही घटना दि. २४ रोजी शहरातील खंडेराव नगर रेल्वे पुलाखाली घडली. याप्रकरणी धडक देणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मेहरुण परिसरातील इकबाल कॉलनीत मुजमील मोहम्मद युनूस पिंजारी (वय २४) हे तरुण वास्तव्यास असून ते डॉक्टर आहे. दि. २४ रोजी ते (एमएच १९, ईसी ७२८६) क्रमांकाच्या दुचाकीने मित्रासोबत जात होते. यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या (एमएच १९, ईसी ७२८६) वरील चालकाने त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. त्यांनी एमआयडीसी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरुन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Author: editor desk
भुसावळ : प्रतिनिधी कर्जाचे हप्ते थकल्यामुळे हप्त्याने काढलेली दुचाकी परस्पर विकून ती दुचाकी चोरी झाल्याचा बनाव करणाऱ्यांचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. दरम्यान, दुचाकी विक्री करणाऱ्यासह घेणारा आणि एजंट या तिघांना अटक करण्यात आली आहे. जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असल्याने त्या उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार यावल तालुक्यातील दगडी मनवेल येथील अशोक मोरे याच्याकडे चोरीची दुचाकी असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली. त्यांनी लागलीच पोहेकॉ प्रितमकुमार पाटील, यशवंत टहाकळे, बबन पाटील, प्रदीप सपकाळे यांचे पथक तयार करुन त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. त्याला (एमएच १९, सीसी ६६४०) क्रमांकाच्या दुचाकीसह ताब्यात घेतले. त्याची…
चाळीसगाव : प्रतिनिधी दिल्ली पोलिस आणि सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करीत एका अज्ञात व्यक्तीने चाळीसगाव येथील ७३ वर्षीय सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याची तब्बल ३१ लाख ५० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश बाबुलाल शिंपी (७३, फुले कॉलनी, चाळीसगाव) असे फसवणूक झालेल्या सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे. १६ ते २३ जून २०२५ या कालावधीत सुनील कुमार नावाच्या एका व्यक्तीने शिंपी यांच्याशी मोबाइलवरून व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल आणि चॅटद्वारे संपर्क साधला. या भामट्याने शिंपी यांना ‘तुमचे बैंक खाते मनी लॉड्रिंगसाठी वापरले जात आहे,’ असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला.…
जामनेर : प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावर कारने दिलेल्या धडकेत अडीच वर्षाच्या चिमुकलीसह आई गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी उपचारानंतर पहूर पोलिसात जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील स्त्री रोग विभागातील सहायक प्राध्यापक डॉ. मिताली गोलेचा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील स्त्री रोग विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. संजय बनसोड व सहायक प्राध्यापक म्हणून डॉ. मिताली गोलेचा हे पती-पत्नी कार्यरत आहेत. दि. ३ जून रोजी डॉक्टर पती-पत्नी हे कारने (एमएच२१, सीए८२३३) जालना येथून जळगावला जात असताना पहूर येथे छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावर ज्योती गोपाल बोडखे (२३) व भाविका गोपाल बोडखे…
पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील सुमठाणे शिवारात एका ४५ वर्षीय महिलेचा डोक्यात दगड टाकून खून करण्यात आला आणि मृतदेह गोणीत भरून जंगलात फेकून देण्यात आला. ही घटना बुधवारी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. सविस्तर वृत्त असे कि, सुमठाणे शिवारात असलेल्या सामाजिक वनीकरणाच्या जंगलामध्ये सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास इंधवे (ता. पारोळा) येथील काही तरुण बकऱ्या चारून घरी परत येत होते. त्यावेळी त्यांना एका महिलेचा खून करून मृतदेह गोणीत टाकून तिला फेकून दिल्याचे आढळून आले. तसेच तिचे हातपाय बांधलेले अवस्थेत होते. ही घटना दोन दिवसाआधी घडली असावी, असा अंदाज आहे. हा परिसर अमळनेर व पारोळा तालुक्याला लागून असल्याने घटनास्थळी आधी…
मेष : दिवस चांगला जाईल. काही महत्त्वाच्या कामासाठी शहराबाहेर जावे लागू शकते. आरोग्य चांगले राहील. व्यवसायात मोठी गोष्ट घडू शकते. आर्थिक फायदा होईल. कुटुंबात शुभ कार्य होण्याची शक्यता आहे. कुटुंबात नवीन पाहुणे येऊ शकतात. वृषभ: दिवस सामान्य राहील. नियोजित काम पूर्ण होईल. आरोग्यात चढ-उतार येतील. कुटुंबात शुभ कार्याची शक्यता आहे. तुम्हाला लग्नाचे प्रस्ताव मिळतील. व्यवसायात आर्थिक स्थिती बिघडू शकते. कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या. मिथुन: तुम्ही कुटुंबासह कुठेतरी बाहेर जाऊ शकता. आरोग्य चांगले राहील. व्यवसायात तुम्हाला आर्थिक फायदा होईल. तुम्ही नवीन काम सुरू करू शकता. कुटुंबात शुभ कार्याची शक्यता आहे. कर्क: दिवस चांगला जाईल. तुम्ही काही खास कामासाठी बाहेर जाऊ शकता.…
पुणे : वृत्तसंस्था राज्यातील मशिदींवरील अनधिकृत भोग्यांचा मुद्दा आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुस्लिम शिष्टमंडळाची बैठक पार पडली. मशिदींवरून जबरदस्तीने भोंगे उतरवले जात असल्याचा आरोप यावेळी मुस्लिम संघटनांनी केला आहे. तर किरीट सोमय्या यांच्या दबावामुळे पोलीस कारवाई करत असल्याचा दावा ही मुस्लिम संघटनांकडून करण्यात आला आहे. मुस्लिम संघटनांनी स्पष्टपणे सांगितलं की, जर किरीट सोमय्या यांच्याकडून पोलिसांवर दबाव टाकून कारवाई करण्यात आली तर कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल आणि याला किरीट सोमय्या जबाबदार असतील. याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी किरीट सोमय्यांना मशिदीत जाऊ नये, त्यांच्या मशिदीत जाण्यामुळे कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे उपमुख्यमंत्री…
चाळीसगाव : प्रतिनिधी भारतीय लोकशाहीवरील काळा डाग असणाऱ्या आणीबाणीला ५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आणीबाणीविरोधात संघर्ष करत प्रसंगी कारावास भोगणारे चाळीसगाव तालुक्यातील जेष्ठ सेनानी तसेच व दिवंगत असलेले सेनानी यांच्या कुटुंबीयांचा सत्कार भाजपा चाळीसगाव शहर मंडळातर्फे आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदानात आयोजित या कार्यक्रमात संविधान वाचवण्यासाठी संघर्ष करणारे सेनानी स्व.डॉ.वा.ग पूर्णपात्रे यांचे नातू डॉ. सत्यजितजी पूर्णपात्रे (चाळीसगाव), स्व.शिवाजी दत्तात्रय पालवे चाळीसगाव यांचे चिरंजीव श्री.प्रशांत शिवाजी पालवे (चाळीसगाव), स्व.जगन्नाथ गोबन राठोड यांचे चिरंजीव श्री.मच्छिन्द्रभाऊ राठोड (वलठाण), स्व.सुखलाल मराठे यांचे चिरंजीव श्री.यशवंतभाऊ मराठे (चाळीसगाव), श्री.रंगराव बालाजी साबळे (करजगाव), श्री.दिलीप लक्ष्मणराव गवळी (चाळीसगाव), श्री पंडित रामचंद्र स्वार…
पाचोरा : प्रतिनिधी शहरातील एका शाळेत शिक्षकाने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेत आत्महत्या केलीय. शाळेतील चौथ्या मजल्यावरील एका खोलीत आत्महत्या केल्याचे आज 25 जून रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आले. दरम्यान, या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास पाचोरा पोलीस करत आहेत. सविस्तर वृत्त असे कि, पाचोरा तालुक्यातील दहिगाव संत येथील रविंद्र महाले हे सध्या पाचोरा शहरात ते वास्तव्यात होते आणि पाचोरा शहरातील एका शाळेत ते शिक्षक म्हणून कार्यरत होते. दरम्यान, आज सकाळी दहा वाजेच्या वाजेच्या सुमारास रविंद्र महाले यांनी शाळेतील एका वर्गखोलीत दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती समजताच शाळेतील कर्मचाऱ्यांनी…
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसपासून शालेय शिक्षणात हिंदी सक्तीचा निर्णय घेतल्यावर अनेकानी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या आता यावर साहित्य व कला क्षेत्रातूनही विरोध होत आहे. संमेलनाध्यक्षा तारा भवाळकर यांच्यानंतर आता अभिनेते सयाजी शिंदे यांनीही महाराष्ट्रात हिंदीची सक्ती करण्याच्या त्रिभाषा धोरणाला कडाडून विरोध केला आहे. मुख्यमंत्री कोणत्या भाषेत शिकलेत? असा सवाल करत त्यांनी या प्रकरणी कोणत्याही एका पक्षाने निर्णय घेतला म्हणून महाराष्ट्रात हिंदीची सक्ती करू नये, असे ठणकावून सांगितले आहे. सयाजी शिंदे बुधवारी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले, आमचे गाव मराठी, आमची भाषा मराठी, आमचा जिल्हा मराठी आणि आमचे राष्ट्रही मराठी. त्यामुळे आमच्या मराठीला पहिले प्राधान्य देण्यात यावे. तिसरी…

