मेष राशी तुम्हाला आजचा दिवस चांगला असेल. जर तुम्ही आज पैसे उधार दिले असतील तर ते परत मिळतील. जर तुम्ही भागीदारीत कोणतेही काम करण्याचा विचार करत असाल तर आज सावधगिरी बाळगा, तुमची फसवणूक होऊ शकते. आज तुम्ही लोकांबद्दल मनापासून चांगला विचार कराल, परंतु लोक स्वार्थी वागतील. तुम्ही कोणतेही काम करा, पण आधी एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घ्या, नंतर त्यात पुढे जा. तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करा. कुटुंबातील सदस्य तुम्ही दिलेल्या सल्ल्याचे पालन करतील. वृषभ राशी या राशीसाठी आजचा दिवस फायदेशीर ठरेल. तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. तुम्ही तुमच्या भविष्यासाठी काही पैसे वाचवू शकता. कुटुंबातील सदस्यांशी काही वाद होण्याची शक्यता आहे.…
Author: editor desk
बीड : वृत्तसंस्था परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणी वाल्मीक कराडचे माजी सहकारी विजयसिंह बांगर यांनी आज पत्रकार परिषद घेत मोठे खुलासे केले आहेत. वाल्मीक कराडचा मुलगा श्री कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांनी महादेव मुंडेंना हालहाल करून मारल्याचा आरोप विजय बांगर यांनी केला आहे. महादेव मुंडे यांच्या शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर आता महादेव मुंडे यांच्या हत्येचे फोटोही विजयसिंह बांगर यांनी पत्रकार परिषदेत दाखवले. महादेव मुंडे हत्येप्रकरणात त्यांच्या पत्नीच्या तीव्र आंदोलनानंतर राज्य सरकारने एसआयटी नेमली आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनीही SIT नेमण्याची मागणी केली होती. या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावणारे वाल्मिक कराडचे माजी सहकारी विजयसिंह बांगर यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे पाटील यांना झालेल्या महाराणी नंतर आरोपी असलेले सूरज चव्हाण आणि त्यांच्यासोबतच्या 9 पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना शरण जाऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे. सूरज चव्हाण यांच्यासह नऊ जण लातूरच्या विवेकानंद पोलिस ठाण्यात शरण आले होते. सकाळी त्यांची जामिनावर सुटका देखील करण्यात आली. या सर्व प्रकरणात कमालीची गुप्तता पाळण्यात आल्यामुळे या विषयी पुन्हा एकदा वादंग उठण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील दोन दिवसापासून पोलिसांची दोन पथके सूरज चव्हाण यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांच्या शोधात होती. या प्रकरणात 11 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी कालच ताब्यात घेतले होते. तर सूरज चव्हाण आणि इतर 9…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधि मंडळामध्ये पत्ते खेळतानाचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना जाब विचारला होता. यावेळी निवेदन देण्यासाठी गेलेल्या छावाच्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी मारहाण केली होती. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले असून या माध्यमातून आता तटकरे यांना छावा संघटनेच्या वतीने इशारा देण्यात आला आहे. इतकेच नाही तर त्यांना विविध फोन कॉलच्या माध्यमातून धमकी वजा इशारा देखील देण्यात आला असल्याची माहिती त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. या सर्व घटना घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले आहे. या संदर्भात…
मुंबई: वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारची महत्वाची लाडकी बहिण योजना आता आपले पहिले वर्ष यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. मात्र, योजनेच्या दुसऱ्या वर्षातील पहिल्या हप्त्यासाठी राज्यातील लाखो महिला लाभार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागत असून, त्यांच्या नजरा आता बँक खात्याकडे लागल्या आहेत. गेल्या वर्षी जुलै महिन्यात राज्य सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा ठराविक रक्कम जमा केली जाते. योजनेच्या पहिल्या वर्षातील सर्व १२ हप्त्यांचे लाभ वेळेवर दिले गेले, ज्यामुळे महिलांना मोठा आर्थिक आधार मिळाला. पहिला टप्पा यशस्वी झाल्यानंतर आता योजनेचे दुसरे वर्ष सुरू झाले आहे. मात्र, दुसऱ्या वर्षातील पहिला हप्ता…
चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील कोदगाव बायपास परिसरात दुचाकी अन् पिकअप वाहन यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. या अपघातातील मयत व्यक्तींची उशिरापर्यंत ओळख पटली नव्हती. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती. शहरातील कोदगाव बायपास परिसरात आज झालेल्या भीषण अपघातात दुचाकी (एमएच-२०, सीएक्स- २०५१) आणि पिकअप वाहन (एमएच २०, जीझेड- १८४४) यांच्यात समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. हा अपघात इतका जबरदस्त होता की, अपघातात पिकअप रस्त्यावर उलटली तर दुचाकीला जबर धडक बसल्याने दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.…
चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील ३७ वर्षीय महिलेचा तिच्या घरात घुसून विनयभंग करून अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित सुरेश गायकवाड याच्याविरोधात येथील पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. पीडित महिला घरी एकटी असताना, संशयित सुरेश गायकवाड सकाळी ९ च्या सुमारास अचानक घरात घुसला. महिलेचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला. हे होत असताना महिलेने आरडाओरड केल्यामुळे शेजारी धावत आले. ते पाहून संशयित गायकवाड तेथून पसार झाला. या घटनेची माहिती समजताच, सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण दातरे यांनी तत्काळ देवळी गावात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. संशयित सुरेश गायकवाडला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
जळगाव : प्रतिनिधी कामावरून घरी जात असलेल्या संजय सुपडू मालचे (५०, रा. रामेश्वर कॉलनी) यांच्या डोक्यात दुचाकीवरील एका जणाने बीअरची बाटली मारून दुखापत केली. याविषयी इसमाने जाब विचारला असता त्यांच्या छातीत दगड मारला. ही घटना २० जुलै रोजी रात्री बी.जे. मार्केट परिसरात घडली. रात्रीच्या वेळी मद्यपींच्या टवाळखोरीला आळा घालावा, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे. सविस्तर वृत्त असे कि, एका हॉटेलमध्ये कामाला असलेले संजय मालचे हे काम आटोपल्यानंतर रात्री पायी घरी जात होते. ते बी.जे. मार्केटजवळ असताना एका दुचाकीवर तीन जण आले. त्यातील मागे बसलेल्याने मालचे यांच्या डोक्यात बीअरची बाटली मारली. यामध्ये मोठा रक्तस्त्राव होऊन ते रक्तबंबाळ झाले. त्यांनी…
जळगाव : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून किरकोळ कारणावरून आपापसामध्ये सुरू असलेल्या धुसफुशीचे पर्यवसान दगडफेकीत होऊन दोन जण जखमी झाले. या घटनेने रामेश्वर कॉलनी परिसरातील स्वामी समर्थ केंद्र चौकात रात्री तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ही घटना मंगळवारी (२२ जुलै) रात्री नऊ वाजता घडली. सविस्तर वृत्त असे कि, रामेश्वर कॉलनीत एका मेडिकलवर असलेल्या तरुणाला कामावरून कमी केल्याने गेल्या काही दिवसांपासून दोन गटांत धुसफुस सुरू होती. मंगळवारी रात्री परिसरातील काही तरुण एका अपार्टमेंटजवळ उभे होते. यावेळी दहा ते बारा जणांचे टोळके दुचाकीवरून आले. त्यांनी तेथे उभ्या असलेल्या तरुणांवर अचानक दगडफेक करण्यास सुरुवात केली. यात सागर पाटील आणि मनोज निंबाळकर हे जखमी झाले.…
भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील खेडी रोडवर रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. घरी सोडतो असे सांगून दुचाकीवरून एका ३५ वर्षीय महिलेला जंगलात नेऊन तिघांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात तिन्ही आरोपींविरोधात सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना अटक करण्यात आली आहे. तिसरा आरोपी अद्याप फरार आहे. पीडित महिला ही आपल्या लहान मुलासह रात्रीच्या सुमारास खेडी रोडने जात असताना दशरथ गोरेलाल भिलाले, कुंदन गोरेलाल भिलाले आणि शंकर भगवानसिंग भिलाले (तिघेही रा. भुसावळ) यांनी तिला घरी सोडण्याचा बहाणा करत दुचाकीवरून जवळच जंगलात नेले. तेथे तिघांनी मिळून तिच्यावर अत्याचार…

