जळगाव : प्रतिनिधी शिवसेनेचे पदाधिकारी तथा माजी महापौर ललित कोल्हे यांच्या फार्म हाऊसवर सुरु असलेल्या बनावट कॉल सेंटर चालविणाऱ्या आंतराष्ट्रीय सिडर्डीकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. या सिर्डीकेटची व्याप्ती महाराष्ट्र, राजस्थान व पश्चिम बंगाल पर्यंत असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. या सिंडीकेटमधील मुख्य सूत्रधारांसह परदेशातील आणखी कोणी यात सहभागी आहेत या याचा शोध घेण्यासाठी अटकेतील ललित कोल्हेंसह आठ संशयितांना दि. ४ रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. अॅमेझॉन इतर बँक व कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचे सांगून परदेशी नागरिकांना फसविणाऱ्या बनावट कॉल सेंटवर पोलिसांनी रविवारी छापा टाकला, शिवसेनेचे पदाधिकारी तथा माजी महापौर ललित कोल्हे यांच्या मालकीच्या फार्म हाऊसवर सुरु असलेल्या सिंडीकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केल्यानंतर…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी काम आटोपून माघारी परतण्याकरीता बस स्थानकावर आलेल्या कल्पना सुनिल लखोटे (वय ५९, रा. माळी गल्ली जामनेर) यांच्या गळ्यातून ६० हजार रुपये किंमतीची सोनसाळखी चोरट्याने चोरुन नेली. ही घटना दि. २४ रोजी सायंकाळच्या सुमारास नवीन बसस्थानकात घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, जामनेर येथील कल्पना सुनील लखोटे (वय ५९) या आपल्या कामासाठी जळगाव शहरात आल्या होत्या. त्यांचे खासगी काम संपल्यानंतर त्या दि. २४ सप्टेंबरला सायंकाळी ५ वाजता जामनेरला जाण्यासाठी नवीन बसस्थानकावर आल्या होत्या. त्याच वेळी, गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीची सोन्याची सोनसाखळी तोडून पळ…
पाचोरा : प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे भागातील शहरातील कृष्णापुरी टेकडी गल्लीत धाब्याचे घर कोसळल्याने एक १२ वर्षाच्या बालकाचा मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला तर, दुसरा एक बालक जखमी झाला आहे. मयत बालकाच्या वडिलांचे यापुर्वीच निधन झाले असून तो एकुलता एक असल्याने आईचा वृध्दपकाळातील सहारा हरपल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टेकडीगल्लीत विठ्ठल काशिनाथ पाटील हे आपल्या मुला सोबत धाब्याच्या घरात राहत असून त्यांच्याकडे चाळीसगाव तालुक्यातील लोंढे येथे राहणाऱ्या दिपाली नितिन राणे हिचा एकुलता एक मुलगा महेश नितिन राणे (वय १२) हा राहत होता. सोमवारी दुपारी महेश नितिन राणे व त्याचा मावसभाऊ योगेश बाळू पाटील हे दुपारी घरातील मागच्या बाजूस झोपले…
मेष राशी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला राहणार आहे. आज तुम्हाला करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळतील. यामुळे तुमची प्रशंसा होईल आणि इतरांना तुमच्याकडून शिकायला आवडेल. जर तुम्हाला आज नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुमच्या कुटुंबाकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल. वृषभ राशी आज, तुम्हाला अचानक असे काहीतरी मिळेल जे तुम्ही खूप दिवसांपासून शोधत होता. टूर आणि ट्रॅव्हल व्यवसायात गुंतलेल्यांना हा दिवस फायदेशीर वाटेल. तुम्हाला एका मोठ्या कंपनीसोबत भागीदारी करण्याची संधी मिळेल, ज्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त नफा मिळेल. मिथुन राशी आज या राशीत जन्मलेल्या विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे वेळापत्रक बदलेल, ज्यामुळे त्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होईल. आज वैवाहिक जीवन आनंदी राहील आणि तुम्हाला…
पुणे : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचे उपमुख्यमंत्री अजित पवार दौऱ्यावर असल्याने अनेक मोठे विधान विधान केल्याने अजित पवार चर्चेत आले होते आता देखील एक महत्वाचे विधान केले आहे. सोन्याचे दागिने स्त्रियांनाच शोभून दिसतात, पुरुषांनी त्या भानगडीत पडू नये. सोन्याच्या जाडजूड चेन घालणारे पुरुष गळ्यात साखळी घातलेल्या बैलांसारखे दिसतात, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोल्डमॅन म्हणून मिरवणाऱ्या पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अजित पवार यांनी चिमटा काढला. चाकण येथील एका ज्वेलर्स शोरूम उद्घाटनावेळी ते बोलत होते. अजित पवार हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. अनेकवेळा त्यांनी परखड वक्तव्य करत कानटोचणी केल्याचा याआधीही पाहायला मिळाले आहे. अशातच चाकण येथील एका ज्वेलर्सच्या उद्घाटनप्रसंगी बोलत…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीसाठी जागा निश्चित करण्यात निवडक गुणवत्ता (इलेक्टिव्ह मेरिट) हा महत्त्वाचा घटक असेल, असे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. रविवारी शिवसेनेच्या शाखा प्रमुखांना संबोधित करताना शिंदे म्हणाले की, महानगरपालिका निवडणुकीत युतीतील प्रत्येक घटकाला वाटप केलेल्या जागांपेक्षा महायुतीचा सामूहिक विजय जास्त महत्त्वाचा आहे. महायुतीच्या जागावाटप करारात सेनेला योग्य आदर दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. कोणाला किती जागा मिळतात हे महत्त्वाचे नाही. निवडक गुणवत्ता महत्त्वाची आहे, जी जागा निश्चित करण्यात महत्त्वाची असेल. जानेवारी २०२६ च्या अखेरीस होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना लोकसभा मतदारसंघनिहाय बैठका घेत आहे. शिवसेनेतील महत्त्वाचे सहकारी असलेले शाखाप्रमुख कामाचे…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरात अवैधपणे सुरू असलेल्या गॅस भरण्याच्या धोकादायक व्यवसायामुळे मोठा अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. शहरातील एका ठिकाणी चारचाकी वाहनामध्ये गॅस भरत असताना सिलेंडरचा जोरदार स्फोट झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र संबंधित चारचाकी वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. स्फोटामुळे आजूबाजूच्या इमारतींच्या भिंती हादरल्या असून, नागरिकांनी भीती व्यक्त केली आहे.घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात हे गॅस भरण्याचे काम पूर्णपणे बेकायदेशीर पद्धतीने सुरू असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी संबंधित दुकानदार व वाहनधारकावर तात्काळ कारवाई केली असून दोघेही अनेक दिवसांपासून…
धरणगाव : प्रतिनिधी भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा व नारीशक्ती उन्नती अभियान अंतर्गत सोनवद प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत भव्य आरोग्य शिबिर घेण्यात आले. त्याप्रसंगी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष पी सी आबा पाटील पंचायत समितीचे माजी सभापती प्रेमराज पाटील भाजपाचे तालुकाध्यक्ष किशोर झवर भाजपाचे सरचिटणीस तथा सोनवद चे माजी सरपंच निर्दोष पवार वैद्यकीय सेलचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर नितीन पाटील सोनवद सरपंच धीरज मिठाराम पाटील पोलीस पाटील श्री रवींद्र भोई बोरखेडा चे सरपंच डॉ. विजय पाटील बाजार समितीचे संचालक ईश्वर भाऊसाहेब सावंत भाजपाचे महिला पदाधिकारी सौ माधुरी ताई जोशी अहिराचे सरपंच पवन पाटील निंभोरा चे सरपंच कैलास सोनवणे…
अहिल्यानगर : वृत्तसंस्था राज्यातील अहिल्यानगर येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. अहिल्यानगर इथं पोलिसांनी रास्ता रोको करणाऱ्या एका समाजावर लाठी चार्ज केला आहे. अहिल्यानगर – छत्रपती संभाजीनगर महामार्गावर मुस्लिम समाजाचे आंदोलन सुरू होतं. त्यांनी धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. त्याबाबत रास्ता रोको करणाऱ्यांवर पोलिसांनी लाठी चार्ज केला. दरम्यान अहिल्यानगरमध्ये तणापूर्ण शांतता आहे. याबाबत पोलिसांनी देखील शांतता राखा आणि अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन केलं आहे. रस्त्यावर लिहिलेल्या आक्षेपार्ह मजकुरावरून दोन गटांत तणाव निर्माण झाला. हा मजकूर मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखवणारा आणि त्यांचा अवमान करणारा होता. या घटनेमुळे मुस्लिम समाज आक्रमक झाला होता. त्यांनी तत्काळ कोतवाली…
मुंबई : वृत्तसंस्था येत्या विजयादशमीला अगदी काही दिवस शिल्लक राहिले असून याच दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण होणार आहेत. अशातच काँग्रेसच्या प्रदेशाध्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जहरी टीका केली आहे. संघाला अनुरोध आहे की तुम्ही शंभराव्या वर्षात फेल झालेला आहात. तुमचा संघ विसर्जित करा, नाहीतर मनुस्पुर्तीची होळी करा असा खळबळजनक सल्ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे. पुढे ते म्हणाले, संविधान स्वीकारा किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात गांधींचा फोटो लावा असाही सल्ला सपकाळ यांनी दिला आहे. गांधीच्या तत्वज्ञानाचा विरोध म्हणून तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली असल्याचा गंभीर आरोपही हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. नागपुरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी…

