Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पोलीस दलात भाकरी फिरली अन १९ अधिकाऱ्यांच्या बदल्या !
    क्राईम

    पोलीस दलात भाकरी फिरली अन १९ अधिकाऱ्यांच्या बदल्या !

    editor deskBy editor deskJune 25, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जिल्हा पोलिस दलातील १९ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील आदेश सोमवारी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढले असून, बदली झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये ६ सहायक पोलिस निरीक्षक तर १३ पोलिस उपनिरीक्षकांचा समावेश आहे.

    या बदली प्रक्रियेत चार अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्या झाल्या आहेत. बदली प्रक्रियेचे आदेश जारी झाल्यानंतर संबधित पोलिस अधिकाऱ्यांना नवीन नेमणुकीच्या ठिकाणी तत्काळ हजर व्हावे लागणार आहे. सहायक पोलिस निरीक्षकांमध्ये अजयकुमार वाढवे यांची यवतमाळ येथून यावल, संजय निकुंभ पुणे शहरातून पाचोरा, नितीन पाटील यांची नाशिक येथून भुसावळ बाजारपेठ, गणेश फड यांची नियंत्रण कक्षातून आर्थिक गुन्हे शाखेत, योगीता नारखेडे यांची मानव संसाधन विकास विभागातून एएचटीयू विभागात बदली झाली आहे तर पोलिस उपनिरीक्षकांमध्ये अशोक खेडकर यांची गोंदियाहून जळगाव शहर, अविनाश राठोड यांची रायगडहून रावेर, शांताराम देशमुख यांची जिल्हापेठ येथून पाचोरा, सुनील मोरे यांची यावलहून रावेर तर उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांचे वाचक समाधान गायकवाड यांची अमळनेरला बदली झाली आहे. त्याचप्रमाणे चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्याचे कुणाल चव्हाण, पाचोरा येथील योगेश गणगे, अप्पर पोलिस अधीक्षकांचे वाचक सुनील चौधरी, तक्रार अर्ज शाखेचे मकसूद शेख आणि शनिपेठच्या प्रिया दातीर यांना वर्षभराची मुदतवाढ मिळाली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भरधाव क्रुझरची दुचाकीला जोरदार धडक; यावलमध्ये पोलीस कर्मचारी जखमी

    April 20, 2026

    अवैध धंद्यांच्या पार्श्वभूमीवर हल्ला? जळगाव तालुक्यात १९ वर्षीय तरुण गंभीर जखमी

    April 20, 2026

    आठ दिवसावर लग्न असताना तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

    April 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.