Author: editor desk

कोळंबा (ता चोपडा) : बिबट्यापासून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तापी नदीत उडी घेतलेल्या कोळंबा येथील लताबाई बाविस्कर यांचा आज जिल्हा बँकेचे चेअरमन तथा माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी साडी चोळी देऊन सत्कार केला. चार दिवसांपूर्वी शेतात लताबाई दिलीप बाविस्कर या शेंगा तोडत असताना बिबट्या त्यांच्या दिशेने येताना दिसला. त्यावेळी एकीकडे काटेरी झुडपे तर दुसरीकडे तापीमाई असल्याचे त्यांना दिसले. क्षणाचाही विलंब न लावता लताबाई यांनी तापी नदीमध्ये उडी घेतली. दुपारी चार वाजेला घडलेल्या या घटनेनंतर केळी खांबाच्या सहाय्याने त्या दुसऱ्या दिवशी पोहोत पोहत अमळनेर तालुक्यातील नीम गावाच्या पांथ्यापर्यंत पोहोचल्या होत्या. त्या ठिकाणी ग्रामस्थांनी त्यांना बाहेर काढून विचारपूस केली व त्यांच्या अतुलनीय धाडसाचे…

Read More

पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील निपाणे येथे दिनांक १३ च्या रात्री एक धक्कादायक घटना समोर आली आहे.आईचं प्रेत घेऊन तो गावाच्या सार्वजनिक स्मशानभूमीत पोहचला खरा पण जातीचे कारण देत या स्मशानभूमीत प्रेत जाळू नये म्हणून काही राजकीय पुढारी, लोकप्रतिनिधी व नागरिकांनी थेट विरोध केला. मृत्यू झालेल्या महिलेचा मुलगा अंत्यसंस्कार करण्यासाठी विनवणी करीत होता पण कुणीच ऐकून घेतले नाही अखेर स्मशान भूमीच्या बाहेर अंत्यसंस्कार करण्यात आले या प्रकरणी आज दिनांक १५ रोजी पाचोरा पोलिसात ११ जणांविरुद्ध अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोहर गिरधर पाटील, रोशन धनराज पाटील, राजेद्र विश्राम पाटील, त्रिंबक हिलाल पाटील,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी एका समाजाविषयी आक्षेपार्ह्य व अश्लील भाषा वापरल्याप्रकरणी त्यांना तत्काळ निलंबित करावे, अन्यथा मोठा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दिला आहे. आमदार मंगेश चव्हाण यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून म्हटले आहे की, फोनवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप मला काल संध्याकाळी प्राप्त झाली होती. एका पोलीस अधिकाऱ्याची एखाद्या समाजाविषयीची भावना व वापरलेली भाषा पाहता अशा जातीयवादी प्रवृत्तीच्या अधिकाऱ्याचे तत्काळ निलंबन करण्यात येऊन त्याची चौकशी करावी अशी मागणी मी कालंच संध्याकाळी जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांच्याकडे फोनवरून केली होती. मात्र मला प्राप्त माहितीनुसार सदर…

Read More

जळगाव : प्रतिनिधी राज्याचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांचा उद्या १५ सप्टेबर २०२२ रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहे. १५ रोजी सकाळी ९.१५ वाजता चाळीसगाव येथील माजी आ.राजीव देशमुख यांच्या निवासस्थानी त्यानंतर १०.३० वा.गो.से.हायस्कूल पाचोरा येथील विविध कार्यक्रमासाठी पाचोरा – भडगाव मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा १२.३० वाजेपर्यंत राखीव असेल, तर दुपारी १२.३० वाजता माजी आ.दिलीप वाघ यांच्याकडे, दुपारी २.४५ वा.जळगाव जिल्हा व महानगर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कार्यकर्ता मेळावा जळगाव येथे तर सायंकाळी ५ वा. पत्रकार परिषद घेतील. त्यानंतर ६ वाजता राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रविद्र भैय्यासाहेब पाटील यांच्या निवासस्थानी भेट असा दौरा होत आहे.

Read More

मुंबई : वृत्तसंस्था Mazagon Dock Shipbuilders Limited ने विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. तुम्ही सरकारी नोकरी शोधत असाल तर तुम्ही नॉन-एक्झिक्युटिव्ह पदांसाठी अर्ज करू शकता. 1,041 पदे रिक्त आहेत. ही पदे 3 वर्षांच्या कालावधीसाठी निश्चित मुदतीच्या कराराच्या आधारावर आहेत, कमाल 2 वर्षांपर्यंत वाढवता येतील. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज केले जात असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२२ आहे. या पदांवर भरती होणार आहे याद्वारे सुतार, ड्रायव्हर, मशिनिस्ट, स्टोअर कीपर, वेल्डर, फिटर, स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर अशा गैर-कार्यकारी पदांवर भरती केली जाणार आहे. एकूण पदांची संख्या १,०४१ पात्रता या पदांसाठी 10वी उत्तीर्ण उमेदवारही अर्ज करू शकतात. वेगवेगळ्या पदांसाठी भिन्न पात्रता निश्चित करण्यात…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था शहरात मुलं पळवणारी टोळी आली म्हणत ब्लँकेट विकणाऱ्यांना दोघांना नागरिकांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. नाशिकच्या टाकळीरोड परिसरात ही घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. या घटनेनं परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी उपनगर पोलीसांना कळवताच पोलीसांचे पथक दाखल झाले होते. पोलीसांनी त्यांची चौकशी करत कागदपत्रे तपासली. मुलं पळवणारी किंवा चोरणारी ही टोळी नसल्याचे निष्पन्न झाले. पोलीसांनी दोघा ब्लँकेट विक्रेत्यांना पोलीस ठाण्यात घेऊन जात गुन्हा दाखल न करता सोडून दिले. यापूर्वी देखील अशा गैरसमजूतीतून मारहाणीच्या घटना समोर आल्या आहे. मुलं पळवणारी किंवा चोरणारी टोळी आली म्हणत नागरिक बेदम मारहाण करतात. पालघरमध्येही…

Read More

पाचोरा : प्रतिनिधी एका नराधम बापाने पोटच्या अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना पाचोरा तालुक्यात घडली आहे. पोलिसांनी या बापाला अटक केली आहे. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या आईने तक्रार दाखल केली. त्या तक्रारीनुसार पोलिसांनी नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला गजाआड केले आहे. तक्रारीनुसार नराधम बाप आपल्या १५ वर्षीय मुलीला मोबाईलमध्ये अश्लील व्हिडीओ दाखवायचा. तसेच तिच्यासोबत अश्लील चाळे करायचा. हा किळसवाना प्रकार मागील तीन वर्षापासून पासून सुरु होता. नराधम बाप मुलीला तुझ्या आईला घराबाहेर काढून देईल, अशी धमकी द्यायचा. त्यामुळे मुलगी अन्याय सहन करत होती. परंतू…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहर परिसरात दुचाकी चोरत असतांना एका तरुणाला शहर पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे. त्याने चौकशीत आतापर्यंत तब्बल ११ दुचाकी चोरल्याची कबुली दिली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकी चोरून मौजमजा करणारा दुचाकी चोरटा पवन प्रेमचंद पाटील (वय २६ रा. आव्हाणी, ता. धरणगाव) याला कोर्ट चौकातून दुचाकी चोरताना शहर पोलिसांनी सोमवारी १२ सप्टेंबर रोजी दुपारी रंगेहाथ पकडले होते. पोलिसांच्या चौकशीनंतर त्याने चोरीच्या ११ दुचाकी काढून दिल्या. या प्रकरणी मंगळवारी १३ सप्टेंबर रोजी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी गुन्हे शोध पथकाला दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील वरणगाव येथील एका परिसरात सावत्र मुलाकडून आईचा विनयभंग केल्याची धक्कादायक घडली आहे. याप्रकरणी वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत पिडीत महिलेने म्हटले आहे की, दि.१३ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास चहा बनविण्यावरून झालेल्या वादानंतर पत्नी व मुलाला का मारले? याचा जाब विचारून सावत्र आईला चापट्याबुक्यांनी मारहान करून मनात लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्ये केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात असून पुढील तपास पोहेका मुकेश जाधव हे करीत आहेत.

Read More

जळगाव : प्रतिनिधी जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांची मंगळवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. यामुळे पोलिस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. एका समाजाविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी लोकप्रतिनिधींनी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. अखेर ही बदली करण्यात आल्याची चर्चा आहे. जळगाव गुन्हे शाखा निरीक्षकांचा जिल्ह्यात सर्वाधिक दबदबा असतो हे सर्वश्रृत आहे. शिवाय या पदावरील खुर्ची मिळण्यासाठी अधिकार्‍यांमध्ये मोठी चढाओढदेखील असते. मात्र या पदावरील अधिकार्‍याची पोलिस अधीक्षकांनी तडकाफडकी बदली केल्यानंतर प्रचंड खळबळ पोलिस दलात उडाली आहे. पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या कार्यकाळात अनेक खुनांसह कठीण गुन्ह्यांचा उलगडा करण्यात गुन्हे शाखेला यश आले होते.…

Read More