Author: editor desk

भुसावळ : प्रतिनिधी शहरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन गावठी पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे आणि दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई रेकॉर्डवरील आरोपींवर लक्ष ठेवण्याच्या आदेशानुसार करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. पोलिस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधिक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्या निर्देशानुसार रेकॉर्डवरील आरोपींवर नजर ठेवण्याचे आणि त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. पोलिस कर्मचारी विजय नेरकर आणि जावेद शहा हे रात्रीच्या गस्तीदरम्यान असताना त्यांना माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी कुणाल नितीन ठाकूर (वय 19, रा. कस्तुरी नगर, भुसावळ) हा रेगोली हॉटेलजवळील त्रीमूर्ती प्रोव्हिजन समोर गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसांसह…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आंध्र प्रदेशातील कुरनूल येथे एक मोठा अपघात झाला. हैदराबादहून बेंगळुरूला जाणाऱ्या बसला आग लागली. कुरनूलच्या उपनगरातील चिन्नाटेकुर येथे राष्ट्रीय महामार्ग ४४ वर कावेरी ट्रॅव्हल्सच्या बसला आग लागली. या अपघातात २० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. अपघातानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी शोक व्यक्त केला असून मदतीचे आश्वासन दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही बस हैदराबादहून बंगळूरकडे ४० हून अधिक प्रवाशांना घेऊन जात होती. पहाटेच्या सुमारास मोटारसायकलची धडक बसताच बसला आग लागली आणि काही क्षणांतच या आगीने संपूर्ण वाहनाला विळखा घातला. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्यामागचे मुख्य कारण म्हणजे, आग लागल्यानंतर बसचा दरवाजा…

Read More

आजचे राशिभविष्य दि.२४ ऑक्टोबर २०२५ मेष राशी आज, ऑफिसमध्ये फोन कमी वापरा आणि तुमच्या कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करा, अन्यथा संकटात सापडाल. आर्थिक बाबींमध्ये लोकांवर जास्त विश्वास ठेवणे टाळा. आई-वडीलांच्या आशीर्वादाने जुनी , अडकलेली कामं पूर्ण होतील. वृषभ राशी व्यवसायात भागीदारी फायदेशीर ठरू शकते. तुम्ही गोष्टी चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न कराल. कुटुंबातील सदस्यांशी संबंध सुधारतील, सौहार्दपूर्ण संबंध टिकतील. तुम्हाला एखादे रहस्य कळू शकेल. जीवन बदलेल. मिथुन राशी तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी तुम्हाला नवीन संधी मिळतील. तुम्ही एखाद्याला उधार दिलेले पैसे अचानक परत मिळू शकतात. तुमच्या व्यवसायात एखाद्याकडून फायदा होण्याची शक्यता वाढेल. त्यामुळे उत्साहही वाढेल. कर्क राशी तुम्हाला ऑफिसमध्ये काही…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात येत्या काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून, सध्याच्या राजकीय परिस्थिती आणि मराठा-ओबीसी वादाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुका राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेच्या बनल्या असून, महायुती आणि महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वबळावर, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे वक्तव्य करत राजकीय चर्चांना उधाण आणले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, एमएमआर (मुंबई महानगर क्षेत्र) मध्ये काही ठिकाणी महायुती एकत्र निवडणूक लढवणार, तर काही ठिकाणी स्वबळावर लढणार. यावेळी त्यांनी आणखी एक महत्त्वाचे विधान केले की, “मी 2029 पर्यंत कुठेही जाणार नाही,” ज्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था देशभरात आज बहिण भावाच्या अतूट नात्याचा महत्वाचा दिवस म्हणजेच भाऊबीज सण आहे. या सणानिमित्त बहिणीकडून भावाचे औक्षण केले जाते. त्यामुळे आजच्या दिवसाला अनेक अर्थांनी महत्व आहे. राज्यातील राजकीय नेत्यांकडून बहिण भावाचा सण म्हणजचे भाऊबीज साजरी केली जात आहे. ठाकरे कुटुंबातही भाऊबीज निमित्ताने आनंदाचे वातावरण आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा ठाकरे कुटुंब एकत्र आले आहेत. राज ठाकरे यांच्या सख्या भगिनी जयजयवंती ठाकरे देशपांडे या उद्धव ठाकरे ठाकरेंना औक्षण करणार आहेत. या सगळ्या ठाकरे कुटुंबाच्या एकत्रीकरणाच्या घडामोडीत उद्धव ठाकरेंनी उबाठाच्या रणरागिनी मुलूख मैदानी तोफ सुषमा अंधारे यांच्याशी फोनद्वारे संवाद साधत भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याबाबत स्वतः अंधारे यांनी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात मराठा आरक्षणासाठी रान पेटवणारे मनोज जरांगे पाटील आता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मैदानात उतरले आहेत. अतिवृष्टीमुळे राज्यातील 29 जिल्ह्यांमध्ये झालेल्या मोठ्या नुकसानीनंतरही शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचली नसल्याने, जरांगे पाटलांनी थेट भाऊबीजेच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांसाठी आंदोलन उभारण्याचा इशारा सरकारला दिला आहे. अतिवृष्टीमुळे राज्यात अनेक ठिकाणी शेती पाण्याखाली, तर नदीकाठच्या जमिनी वाहून गेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून सरकारने जाहीर केलेल्या 3 हजार कोटींच्या मदत पॅकेजचा लाभ अजूनही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेला नाही. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटलांनी थेट शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा ‘नांगर’ टाकण्याची घोषणा केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी म्हणाले, राज्यात अनेक ठिकाणी अधिकारीच सरकारपेक्षा मोठे झाले आहेत. जे काम करत…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मतदार यादीत घोळ असल्याचा आरोप करत विरोधकांनी निवडणूक आयोगासह भाजपवर हल्लाबोल केला आहे. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिले आहे. इतकेच काय तर, विरोधकांवर बॉम्ब टाकणार असून लोकसभा निवडणूक काळात त्यांना ज्या मतदारसंघात लाभ झाला तेथील मतदारयाद्यांतील घोळ पुराव्यांसह जनतेसमोर आणू, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. “निवडणुका आताच घेतल्या तर पराजयाला सामोरे जावे लागेल अशी शंका विरोधकांना वाटत आहे. त्यांना निवडणुका अडचणीच्या वाटत आहेत. त्यामुळे सहा महिने निवडणुका पुढे गेल्या तर बरे होईल, असे त्यांचे मत आहे. म्हणून मतदार याद्यांचे कारण पुढे केले जात आहे. मतदार याद्यांत सुधारणा व्हावी ही माझीही…

Read More

बीड : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्हा गेल्या अनेक महिन्यापासून मोठ्या चर्चेत आला होता. आता बीडमध्ये ओबीसी नेत्यांची महाएल्गार सभा पार पडली होती, या सभेत बोलताना ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. या सभेत बोलताना गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारस म्हणून भुजबळ यांनी धनंजय मुंडे यांचा उल्लेख केला, त्यानंतर भुजबळ यांच्या या वक्तव्याची राज्यात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे, यावर आता करुणा मुंडे यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी धनंजय मुंडे यांचं कौतुक केलं आहे. छगन भुजबळ यांनी 100 टक्के सत्य सांगितलं आहे. राजकारणामध्ये पोटचा वारसा नसून तो विचारांचा वारसा असतो, आणि…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील आगामी स्थानिक निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. मात्र महायुती निवडणुकीत एकत्र लढणार की नाही? याबाबत सातत्याने चर्चा सुरू आहेत. दुसरीकडे, ठाणे, नवी मुंबईसह 19 ठिकाणच्या पालिका निवडणुकीत जागावाटपावरून महायुतीत मतभेद सुरू आहेत. महायुतीत ठाणे,नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, सांगली या जागांवर मतभेद आहेत. त्याशिवाय सातारा, मावळ, लोणावळा, रायगड, नाशिक, जळगाव, धुळे, हिंगोली, नांदेड, अहिल्यानगर आणि नंदुरबार या जागांवरही महायुतीत जागावाटपावरून धुसफुस समोर आली आहे. एकीकडे जागा वाटपावरुन अंतर्गत वाद समोर येत असताना, दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी मात्र अंतर्गत वादाच्या चर्चांना फेटाळून लावत महायुती म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाणार…

Read More

आजचे राशिभविष्य दि.२३ ऑक्टोबर २०२५ मेष राशी काही गोष्टी सगळ्यांसमोर बोलू नका, गुप्त ठेवा. कामाच्या ठिकाणी गॉसिपिंग नको, पूर्ण लक्ष देऊन काम करा, उत्तम रिझल्ट मिळेल. वृषभ राशी तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा आणि सकारात्मक राहा. तुमच्या मेहनतीने कोणतीही समस्या सोडवली जाईल. आज इतरांवर जास्त अवलंबून राहू नका, तुमचं काम तुम्हीच करा. उत्तम रिझल्ट मिळेल. मिथुन राशी आज, व्यवसायासाठी परिस्थिती चांगली आहे. तुम्हाला कामात यश मिळण्याची शक्यता आहे. देवावरील तुमचा विश्वास वाढेल. तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवा. आनंद येईल, समाधान वाटेल. कर्क राशी तुमच्या चुका ताबडतोब दुरुस्त करा. तुम्हाला दिसणारे बदल इतरांना सकारात्मक वाटतील. अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी हा दिवस…

Read More