Author: editor desk

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील शिरपूर-कन्हाळा रोड परिसरात राहणाऱ्या अमृत कॉलनी मध्ये एका विद्यार्थिनीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना गुरुवार दिनांक २३ ऑक्टोबर रोजी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, लावण्या मुकेश अंभोरे (वय अंदाजे १५ वर्षे) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून तिचे वडील मुकेश अंभोरे हे मध्य रेल्वे, भुसावळ येथे नोकरीस आहेत. गुरुवारी सायंकाळी पती-पत्नी खरेदीसाठी बाजारात गेले असता घरात दोन्ही मुली होत्या. सुमारे सायंकाळी सात वाजता ते घरी परतल्यानंतर मोठी मुलगी लावण्या हिने घरात गळफास घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तत्काळ तिला खाली उतरवून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच…

Read More

जळगाव : प्रतिनिधी नवरात्रौत्सवाच्या समाप्तीवेळी देवीच्या मूर्तीचे विसर्जन करताना गिरणा नदीपात्रात वाहून गेलेल्या हेमेश संतोष पाटील (१८, रा. मयूरेश्वर कॉलनी, दादावाडी परिसर) या तरुणाचा २० दिवसांनंतर शोध लागला. मुलाचा शोध घेत असताना अखेर त्याचा मृतदेहच दोनगाव शिवारात पाटील कुटुंबाच्या हाती लागला. ऐन भाऊबीजेदितशीच मृतदेह सापडल्याचा दुर्दैवी योग आला व बहिणीने भावाला तिरडीवर अखेरचे ओवाळले. या प्रसंगाने सर्वच गहिवरून गेले होते. मिळालेल्या माहितीनुसार,  निमखेडी रेल्वे पुलाजवळ ऑक्टोबर रोजी हेमेश हा मित्रांसोबत देवीची मूर्ती विसर्जन करण्यासाठी गेला असताना विसर्जन केल्यानंतर पाय घसरून तो नदीपात्रात पडून वाहून गेला होता. त्यावेळी त्याचा शोध घेण्यात आला; मात्र तो सापडला नव्हता. त्यानंतरही त्याचा शोध सुरूच होता.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी अमळनेर व जामनेर तालुक्यातून गुरे चोरणाऱ्या चार संशयितांना अमळनेर येथे आणत असताना दोन जण बेड्यांसह पसार झाले. ही घटना बुधवार, दि. २२ रोजी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास कुन्हे अंडरपास, ता. अमळनेर येथे घडली. दोन दिवसांनंतरही त्यांचा शोध लागू शकलेला नाही. शाकीर शाह अरमान शाह (३० रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) आणि अमजद शेख फकीर कुरेशी (३५ रा. अशोक किराणा जवळ मेहरूण, जळगाव) अशी या पसार झालेल्या संशयितांची नावे आहेत. अमळनेर तालुक्यातून लोणे आणि पिंपळे येथून सात गुरे चोरी झाली होती. त्याचा शोध स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाकडून सुरू होता. जवखेडे येथे सीसीटीव्हीमध्ये गुरे चोरताना काही जण आढळले. त्यांच्याकडे…

Read More

आजचे राशिभविष्य दि.२५ ऑक्टोबर २०२५ मेष राशी घरापासून दूर शिक्षण घेणाऱ्यांना आज त्यांच्या कुटुंबियांना भेटायला मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हा आणि एकत्र वेळ घालवा, ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. तुमच्या भावंडांकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल. वृषभ राशी नकारातम्क विचारांमुळे उदास वाटू शकेल. बऱ्याच काळपासू अडकलेले पैसे परत मिळतील. आज तुम्ही तुमचे सर्व खर्च भागवू शकाल. आर्थिक चिंता कमी होतील. मिथुन राशी तुमच्या कामातील समर्पणामुळे आणि मेहनतीमुळे खूप यश मिळेल. आज तुम्ही अनुभवी व्यक्तीच्या सहवासात असाल, ज्यामुळे तुम्हाला बरे वाटेल. आज एक महत्वाचे काम पूर्ण होईल. इतरांवर अवलंबून राहण्याऐवजी, स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा, कठोर परिश्रम करा. यश मिळेल.…

Read More

पुणे  : वृत्तसंस्था देशभर दिवाळीचा उत्साह सुरु असताना आता महाराष्ट्रात पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. गेल्या आठवडाभर राज्यात उन्हाचे चटके जाणवत होते, मात्र सोमवारी पहाटेपासूनच मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाने झोडपले. मुंबई, सोलापूर, सातारा, पुणे आणि कोकणातील काही भागांत अचानक आलेल्या सरींनी नागरिकांना गारवा मिळवून दिला असला तरी शेतकऱ्यांच्या कपाळावर मात्र चिंता वाढवणाऱ्या आठ्या उमटल्या आहेत. मुंबईत आज सकाळीच मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे रस्त्यांवर पाणी साचले आणि कार्यालयीन वेळेत वाहतूक कोंडी झाली. हवामान खात्याने मुंबई आणि आसपासच्या भागासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस राज्यात ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पावसाच्या सरी कायम राहणार…

Read More

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भारताचे संविधान, तिरंगा ध्वज तथा महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट कायद्याची प्रत स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे संघाचा संविधान, तिरंगा व स्वतःची नोंदणी करण्यास ठाम विरोध असल्याचे स्पष्ट होते, असा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. वंचित बहुजन आघाडीने शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. यासाठी हजारो आंबेडकर अनुयायी शहरातील क्रांती चौकात जमले होते. पोलिसांनी त्यांच्या मोर्चाला परवानगी नाकारली, पण तरीही वंचितचे कार्यकर्त्यांनी आपला मोर्चा काढला. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला भारताचे संविधान, तिरंगा व महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट अ‍ॅक्टची प्रत देण्याचा प्रयत्न केला. पण संघाने त्यांचा स्वीकार…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने गेल्या काही वर्षात अनेक शहरांच्या नावात बदल केल्यानंतर आता गेली चाळीस ते पन्नास वर्षांची सातत्याने होत असलेली मागणी अखेर पूर्ण झाली असून, सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे ‘ईश्वरपूर’ असे नामांतरण करण्याच्या प्रस्तावास केंद्र सरकारने अंतिम मंजुरी दिली आहे. केंद्र शासनाच्या अध्यादेशामुळे यापुढे सर्व शासकीय कार्यालये, दस्तऐवज आणि रेल्वे, पोस्ट खात्याच्या नोंदींमध्येही शहराचा उल्लेख ‘ईश्वरपूर’ असाच होणार आहे. या निर्णयामुळे हिंदुत्ववादी संघटनांसह शहरवासीयांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, सर्वत्र आनंदोत्सव साजरा करण्यात आला. राज्य सरकारने शुक्रवार १८ जुलै रोजी इस्लामपूर शहराचे ‘ईश्वरपूर’ असे नामांतरण करण्याच्या नगरपालिकेच्या प्रस्तावास विधिमंडळात मंजुरी दिली होती आणि तो प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे…

Read More

सातारा : वृत्तसंस्था राज्यातील सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण वैद्यकीय क्षेत्र हादरले आहे. येथील कार्यरत महिला डॉक्टर डॉ. संपदा मुंडे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना समजताच रुग्णालयातील सहकारी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा पसरली. आपल्या कर्तव्यनिष्ठ आणि रुग्णसेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या या डॉक्टरने असे टोकाचे पाऊल उचलल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. स्थानिकांपासून वैद्यकीय संघटनांपर्यंत सर्व स्तरांवर या घटनेबाबत दुःख आणि संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून डॉ.मुंडे या पोलिस आणि आरोग्य विभागातील प्रशासकीय वादात अडकल्या होत्या. एका वैद्यकीय तपासणी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर चौकशी सुरू होती. या कालावधीत…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे परंतू कोरोनानंतर फटाक्यांचे कमी झालेले प्रमाण या वर्षी पुन्हा वाढले आहे. दिल्ली सारख्या राजधानीत तर हवा इतकी अशुद्ध झाली आहे की तेथे कृत्रिम पाऊस पाडण्याची नौबत आली आहे.तर अशात कठोर कायदे असलेल्या सिंगापूरात फटाके फोडल्याच्या आरोपाखाली एका भारतीयाला अटक झाली आहे. भारतीय लोक ज्या देशात जातात तेथे आपल्या प्रथा परंपरा चालू ठेवण्याचा प्रयत्न करात. परंतू अशा प्रथापरंपरा पाळताना तेथील स्थानिक कायदे काय आहेत याची जाणीव असायला हवी. कारण सिंगापूरात दिवाळीचा जोश साजरा करताना आतिषबाजी केल्या आरोपावरुन बुधवारी ३९ वर्षीय भारतीय मूळ असलेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे.…

Read More

पुणे : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापासून राज्यासह अनेक ठिकाणी गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात घडत असताना परिवारातील पती-पत्नीमध्ये देखील हमरीतुमरी होवून मोठ्या वादात रुपांतर होत असते आता पतीची दिवाळीच्या दिवशीच हत्या केल्याची धक्कादायक घटना ही पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. चारित्र्यावर वारंवार संशय घेतल्याने पती-पत्नीत सारखा वाद व्हायचा. कालच दिवाळीचा शेवटचा दिवस होता, तरी त्यांच्यात आधी संध्याकाळी आणि मग रात्री पुन्हा वाद झाला. आणि त्याच वादानंतर रागाच्या भरात पत्नीने तिचीच ओढणाी वापरत पतीचा गळा दाबला आणि त्याची निर्घृणपणे ह्त्या केल्याचा अत्यंत संतापजनक आणि तितकाच क्रूर गुन्हा उघडकीस आला आहे. आरोपी पत्नीला चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नकुल भोईर असे मृत इसमाचे नाव…

Read More