Author: editor desk

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर शासनाने मदतीची रक्कम वर्ग होण्यास सुरूवात झाली असली तरी प्रत्यक्षात मदतीची आकडेवारी पाहता जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याला नुकसानीपोटी सरासरी साडेसात हजार रुपये मदत मिळणार आहे. या तुटपुंज्या मदतीत नेमके काय होणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. या मदतीवर आता शेतकरी संघटनांकडून विरोध होऊ लागला आहे. सप्टेंबरमध्ये परतीच्या तीन दिवसाच्या मुसळधार पावसात शेतातील उभी पिके जमीनदोस्त झाली. सोंगणीला आलेली पिके मातीत गाडली, तर नुकताच लागवड झालेला कांदाही वाफ्यातच सडून कोमेजला. मका पाण्यात तरंगून खराब झाली. अतिवृष्टीने डोळ्यादेखत शेतातील काढणीला आलेली पिके सडली, काही वाहून गेली. विभागाने शासनाकडे जिल्ह्यातील ४ लाख ९ हजार…

Read More

आजचे राशिभविष्य दि.२१ ऑक्टोबर २०२५ मेष राशी आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाने भरलेला असणार आहे. जर तुम्ही कला क्षेत्रात असाल तर तुम्हाला प्रगतीचे अनेक नवीन मार्ग दिसतील. विद्यार्थ्यांसाठीही आजचा दिवस अनुकूल असेल. नवीन अभ्यासक्रमात सामील होण्यासाठी हा एक शुभ दिवस आहे. वृषभ राशी तुमचे नियोजित काम आज पूर्ण होईल. चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात हंगामी फळांचा समावेश कराल. कुटुंबातील सदस्य परस्पर समन्वयाने कोणत्याही घरगुती समस्या सोडवू शकतील, ज्यामुळे कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण होईल. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. मिथुन राशी आज तुम्हाला नफ्याच्या काही नवीन संधी मिळतील. तुमच्या कुटुंबात शांती आणि आनंद नांदेल. तुमच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळाल्याने आनंद मिळेल. संयमाने निर्णय…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था देशभर दिवाळीचा उत्साह सुरु असून राजकीय क्षेत्रात देखील भाषणबाजी सुरु आहे. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी भाजपच्या कार्यकर्त्यांना आपल्या कृत्याकडे नीट डोळे उघडून पाहण्याचे आवाहन केले. इतिहासात आपल्या नावाची पापाचे धनी म्हणून नोंद होऊ देऊ नका. त्यामुळे आपण काय करत आहात व कोणते विष पोसत आहात याकडे एकदा डोळे उघडून नीट पाहा, असे उद्धव भाजप कार्यकर्त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना म्हणालेत. नाशिकमध्ये मागील काही महिन्यांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जोरदार राजकीय धक्के बसत आहेत. ठाकरे गटाच्या अनेक माजी नगरसेवकांनी सत्ताधारी भाजपसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. या आऊटगोईंगच्या…

Read More

देशभरात पाच दिवसांच्या दिवाळीच्या उत्साहात लक्ष्मी पूजन या सणाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. हिंदू पंचांगानुसार, हा सण आश्विन महिन्याच्या अमावास्येच्या रात्री साजरा केला जातो. या दिवशी स्थिर धन-संपत्तीची देवी माता लक्ष्मी, बुद्धी आणि शुभ-लाभाचे देव श्री गणेश आणि धनाचे रक्षण करणारे देव कुबेर यांची विधिवत पूजा केली जाते. या रात्री माता लक्ष्मी पृथ्वीवर संचार करते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. जे भक्त आपले घर स्वच्छ ठेवून आणि दिव्यांची रोषणाई करून तिचे स्वागत करतात, त्यांच्या घरी ती स्थिर स्वरूपात दीर्घकाळ वास करते आणि घरात धन, समृद्धी आणि ऐश्वर्य कायम राहते. 1. लक्ष्मी पूजनाचे महत्त्व लक्ष्मी पूजनाचा मुख्य उद्देश केवळ पैसा मिळवणे नसून,…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज, दिवाळीच्या दिवशी, श्री क्षेत्र देहू येथे लाक्षणिक उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. सकाळी 9 वाजता जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांच्या समाधीस्थळी नतमस्तक होत, मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर ते उपोषणाला बसणार आहेत. शेतकऱ्यांच्याही घरात दिवाळी साजरी व्हावी म्हणून आज दिवाळीच्या दिवशी थोड्याच वेळाच ९ वाजता श्री क्षेत्र देहूमध्ये जगद्गुरु संत श्री तुकोबारायांच्या समाधीवर नतमस्तक होऊन मंदिरापुढे लाक्षणिक उपोषणाला बसतोय, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले. रोहित पवार यांनी रविवारी या उपोषणाची घोषणा केली होती. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी तुम्हाला शनी आहे असे सांगून हातचलाखी करून तीन मदारींनी वृद्धाच्या हातातील ५० हजार रुपये किमतीची अंगठी चोरून नेल्याची घटना दि १८ रोजी साडे अकरा वाजता अमळनेर बसस्थानकावर घडली. अवघ्या काही तासात पोलिसांनी तपास चक्रे फिरवत तीघांना अटक करण्यात आली असुन खाकी दाखवताच त्यांनी अंगठी काढून दिली आहे. दरम्यान यातील एक संशयीत फरार झाला आहे. चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील बळवंतराव जयवंतराव वाघ (वय ८६) हे आपल्या जावयाकडे गांधली ता अमळनेर येथे सुभाष रामराव देशमुख यांच्याकडे येण्यासाठी बसस्थानकावर आले. जावयाने बाजार करून येतो तोपर्यंत वृद्धाला बसस्थानकावर थांबायला सांगितले. काही वेळात एक इसम आला आणि त्याने वृद्धाला शेगाव जाणारी बस…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील कृष्णानगर परिसरात किरकोळ कारणावरून महिलेला मारहाण करून चाकूने जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी रेखा धनराज बोरोले (वय ३३, व्यवसाय – गृहिणी, रा. कृष्णानगर, भिरूड हॉस्पिटलजवळ, भुसावळ) यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. रेखा बोरोले या पती धनराज बोरोले, दोन मुले व सासूसह राहतात. १८ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांचा मोठा मुलगा तुषार हा गल्लीमध्ये फटाके फोडण्यासाठी गेला होता. सुभाष सोनवणे यांचे फटाक्यांचे दुकान असून तेथे भांडण सुरू होते. भांडणाचा आवाज ऐकून रेखा बोरोले बाहेर आल्या. तेवढ्यात आजादसिंग श्रावणसिंग भाटिया याने रेखा यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. कारण विचारल्यावर तो म्हणाला, ‘तुझ्या नवऱ्याने…

Read More

जळगाव : प्रतिनिधी धनत्रयोदशीला सोने चांदीच्या भावात घसरण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी (१९ ऑक्टोबर) भाव स्थिर राहिले. आगामी काळात चांदीचे भाव एक लाख ६० ते एक लाख ७० हजार रुपयांदरम्यान राहू शकतात. मात्र सोन्याच्या भावात तेजी राहणार असल्याचा अंदाज सुवर्ण व्यावसायिकांनी वर्तविला आहे. दरम्यान, चांदीसाठीचा २५ हजार रुपयांवर पोहोचलेला प्रीमियम आता शून्यावर आला आहे. अनेक दिवसांपासून सोने-चांदीच्या भावात मोठी वाढ होत आहे. त्यात धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी सोन्याच्या भावात तीन हजार ३०० रुपयांची वाढ होऊन ते एक लाख ३१ हजार ५०० रुपयांवर पोहोचले होते. मात्र ऐन मुहूर्तावर सोन्याच्या भावात तीन हजार रुपयांची घसरण होऊन ते एक लाख २८ हजार ५०० रुपये…

Read More

आजचे राशिभविष्य दि.२० ऑक्टोबर २०२५ मेष राशी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला जाणार आहे. तुम्ही एखाद्या फायदेशीर प्रवासाला निघू शकता. तुम्ही घरी वेळ घालवण्यासाठी खूप व्यस्त असलात तरी, तुम्ही अनेक महत्त्वाची कामे पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. आज कोणतेही व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. वृषभ राशी आज काही धार्मिक कार्यात सहभागी होण्याची शक्यता आहे. कोणत्याही विषयावर इतरांशी बोलणे किंवा सल्लामसलत करणे फायदेशीर ठरेल. तुम्ही महत्त्वाच्या कामांचा आणि नातेसंबंधांचा विचार कराल आणि नियोजन कराल. कुटुंबाशी संबंधित कोणत्याही समस्या संपण्याची शक्यता आहे. मिथुन राशी आज तुम्ही जे काही काम सुरू कराल ते वेळेवर पूर्ण होईल. तुम्हाला करिअरच्या नवीन संधी मिळतील. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्‍यात ९६ लाख बोगस मतदार भरले आहेत. आम्ही निवडणूक आयोगावर बोलतो प्रश्न विचारतोय सत्तधारी पक्ष का रागावतो आहे. कशा पद्धतीच राजकारण सुरु आहे हे सर्वाना माहिती आहे. राज्यातील स्‍थानिक पक्ष संपविण्‍याचे कारस्‍थान सुरु आहे. तुम्ही मतदान करा किंवा नका करू मॅच फिक्‍स आहे. ही कोणत्या पद्धतीचे लोकशाही आहे, अशात निवडूक होणार असेल तर कशाला प्रचार करायचा, कशाला पैसा खर्च करायचा, अशा शब्‍दांमध्‍ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महायुती सरकारवर हल्‍लाबोल केला. मुंबई- गोरेगाव नेस्‍को सेंटरमध्‍ये मनसे पदाधिकारी मेळाव्‍यात ते बोलत होते. यावेळी राज ठाकरे म्‍हणाले की, निवडणूक आयोग हा सत्ताधारी पक्षांचा गुलाम नाही. कित्‍येक र्षांपासून मतदारयाद्‍यांमध्‍ये घोळ…

Read More