Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » खळबळजनक : क्लास वन ऑफिसर सांगून अनेक तरुणींना फसविले !
    क्राईम

    खळबळजनक : क्लास वन ऑफिसर सांगून अनेक तरुणींना फसविले !

    editor deskBy editor deskJuly 17, 2025Updated:July 17, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    कोणाला नायब तहसीलदार तर कोणाला क्लास वन ऑफिसर सांगून धरणगाव येथील निनाद विनोद कापुरे याने लग्नाच्या नावाने अनेक तरुणींना गंडविल्याचा प्रकार उघडकीस आला असून नाशिक आणि फलटण येथील तरुणींनी यासंदर्भात बुधवारी (१६ जुलै) पोलिस अधीक्षकांना भेटून लेखी तक्रार केली. यापैकी फलटणची तरुणी डॉक्टर आहे. तरुणींच्या तक्रारीवरुन नाशिक व फलटण येथे त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल झालेला आहे, मात्र नाशिकच्या गुन्ह्यात अद्याप अटक झालेली नाही.

    या तरुणींनी दिलेल्या माहितीनुसार, मॅरेज ब्युरो या ऑनलाइन साईटवरुन निनाद कापुरे याने त्यांच्याशी संपर्क साधला. आई, वडिलांच्या संमतीने त्याने नाशिकच्या तरुणीकडून सात लाख तर फलटणच्या डॉक्टर तरुणीकडून आठ लाख रुपये उकळले. आपल्याला पदोन्नती मिळाली असून, पुणे येथे तहसीलदार पदावर नियुक्ती होत असल्याने पैशाची गरज असल्याचे सांगून ही रक्कम घेतली. निनाद हा आधीच विवाहित असून, त्याचीही कोर्टात केस सुरु असल्याचे समजल्याने या दोन्ही तरुणींनी त्याच्याविरुध्द फलटण आणि नाशिकला गुन्हा दाखल झाला. फलटणच्या गुन्ह्यात त्याला अटक झाली असून नाशिकच्या गुन्ह्यात अटक झालेली नाही. त्यामुळे त्याला अटक व्हावी, उकळलेली रक्कम परत मिळावी व भविष्यात आणखी तरुणींची फसवणूक होऊ नये यासाठी पोलिस अधीक्षकांना भेटून लेखी तक्रार केल्याचे या तरुणींनी सांगितले. तक्रारी केल्यावरुन सरकारी लाल दिव्याच्या वाहनातील तसेच तहसीलदारांच्या खुर्चीवर बसलेले फोटो या तरुणींना त्याने पाठविले आहेत. हे सर्व फोटो व पैशाचे पुरावे पोलिस अधीक्षकांकडे सादर करण्यात आले आहेत. आतापर्यंत त्याने अशाच प्रकारे सहा तरुणींना फसविले असल्याचे या तरुणींनी सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मनपाच्या महासभेत व्हीसीव्दारे उपस्थित राहण्याची परवानगी द्या ; वैशाली पाटील यांची मागणी !

    April 14, 2026

    सुरक्षा उपायांचा अभाव ठरला जीवघेणा : पाचव्या मजल्यावरून पडून मजुराचा दुर्दैवी मृत्यू

    April 14, 2026

    पोलिसांना चकवा देणारा कुख्यात गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात !

    April 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.