जळगाव : प्रतिनिधी स्वर्. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आयोजित २४ व्या “पाडवा पहाट” या प्रातःकालीन मैफलीचे आयोजन महात्मा गांधी उद्यानात पहाटे ६ वाजता करण्यात आले होते. यामध्ये प्रख्यात राष्ट्रीय कीर्तनकार, शास्त्रीय तसेच नाट्यसंगीत गायक व नट डॉ. चारुदत्त आफळे यांच्या नाट्यसंगीत व अभंग वाणी या मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. प्रतिष्ठानच्या परंपरेनुसार गुरुवंदना जळगावचे गायक वरुण नेवे यांनी सादर केली. त्यानंतर दीप प्रज्वलन डॉ. रणजीत चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर व सचिव अरविंद देशपांडे तसेच आजच्या कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती डॉ. चारुदत्त आफळे यांनी केले. कलाकारांचा सत्कार मेजर नानासाहेब वाणी, विवेकानंद कुलकर्णी अरविंद देशपांडे व शरदचंद्र…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी तब्बल 8 वर्षांपासून फरार असलेल्या सोन्याच्या अपहार प्रकरणातील आरोपीस रामानंद नगर पोलिसांनी उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथून अटक केली असून, त्याच्याकडून 11 लाख 90 हजार रुपये किमतीचे 100 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. मिळालेल्या माहितीनुसार, दि. 30 मार्च 2017 रोजी सचिन वसंतराव भामरे (रा. गांधी नगर, जळगाव) यांनी त्यांच्या साई ज्वेलर्स या पिंप्राळा परिसरातील दुकानात काम करणाऱ्या सुशांत सुनिल कुंड्डु (रा. हावडा, पश्चिम बंगाल) या कामगारास दागिने तयार करण्यासाठी सुमारे 30 तोळे सोने दिले होते. मात्र, आरोपीने ते सोने अपहार करून पसार होत आपल्या…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. युतीबाबतचे तर्क-वितर्क सुरू असतानाच काँग्रेसचे ज्येठ नेते आणि माजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी स्पष्टपणे जाहीर केले आहे की, काँग्रेस पक्ष ठाकरे बंधूंसोबत, म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, या दोघांच्या पक्षांसोबत युती करणार नाही. मी मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष असताना हीच भूमिका स्पष्ट केली होती आणि आजही त्यात बदल नाही, असे ठामपणे सांगत जगताप यांनी पक्षातील कार्यकर्त्यांचा आवाज मांडला आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या रणांगणात काँग्रेस स्वतंत्रपणे उतरू शकते, अशी शक्यता अधिक बळावली आहे. भाई जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही…
पुणे : वृत्तसंस्था देशभर दिवाळीचा उत्साह सुरु असताना दिवाळीच्या मंगलमय सणात पुण्यातील वातावरण एकीकडे पाडवा पहाटेच्या पारंपरिक जल्लोषाने उजळले, तर दुसरीकडे शहरातील विविध भागांत लागलेल्या सलग 40 हून अधिक आगींनी प्रशासनाला अक्षरशः तारेवरची कसरत करायला लावली. दरम्यान, सारसबाग येथील सुप्रसिद्ध दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रमात दोन गटांमध्ये वाद आणि हाणामारी झाल्याने कार्यक्रमाला गालबोट लागले. हिंदुत्त्ववादी संघटनांकडून मिळालेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम आधीच वादात सापडला होता. पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला असला तरी दिवाळीच्या दिवसाची सुरुवातच गोंधळात झाली. सारसबागेत पहाटे तीन वाजल्यापासूनच पुणेकर तरुणाईचा मोठा जमाव पाडवा पहाट कार्यक्रमासाठी जमा झाला होता. पारंपरिक वेषात, हातात झेंडे व दिमाखदार साजशृंगारासह युवकांनी सांस्कृतिक सादरीकरणाचा…
जळगाव : प्रतिनिधी रस्त्याने पायी घराकडे निघालेल्या सुनंदा सुधीर महाजन (वय ६५, रा. श्रीकृष्ण कॉलनी) यांच्या गळ्यातून दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी ९५ हजारांच्या तीन तोळ्याची सोन्याचे मंगळसूत्र जबरीने चोरुन नेले. ही घटना दि. २० रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास श्रीकृष्ण कॉलनीत घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील कृष्ण कॉलनीत सुनंदा सुधीर महाजन या वास्तव्यास असून दि. २० रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास त्यांची जाऊ रेखा महाजन, सून स्वाती महाजन, नात काव्या यांच्यासोबत भुसावळला गेले होते. सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ते भुसावळातून जळगाव बस स्थानकावर आल्या. रिक्षाने त्या श्रीकृष्ण कॉलनीत जाण्याकरीता निघाले. गणेश कॉलनीतील दत्त मंदिराजवळ रिक्षातून…
आजचे राशिभविष्य दि. २२ ऑक्टोबर २०२५ मेष राशी तुमच्या प्रार्थनेचे फळ लवकरत मिळेल. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा आणि सकारात्मक राहा. तुमच्याद्वारे कोणतीही कठीण समस्हीया सोडवली जाईल. जर तुम्ही आज इतरांवर जास्त अवलंबून राहण्याचे टाळले तर तुम्ही कामावर चांगले प्रदर्शन कराल. वृषभ राशी तुमच्या मुलांच्या काही कृतींमुळे तुम्हाला दुःख होऊ शकते. जर तुम्ही शांतपणे समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला तर सर्व काही ठीक होईल. तुमचा विश्वास आणि आत्मविश्वास आज अबाधित राहील. तुम्ही जे काही हाती घ्याल ते नक्कीच पूर्ण होईल. काही गोष्टी गुप्त ठेवात, अन्यथा त्या कुटुंबातील सदस्यांसमोर उघडकीस येऊ शकतात. मिथुन राशी आज, प्रॉपर्टी व्यवसायासाठी परिस्थिती अनुकूल आहे. तुम्हाला कामात…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिवसेना पक्ष व चिन्हाप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीत अंतिम निकाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने येण्याची शक्यता अगदी शून्य आहे. कायदेशीर व घटनात्मक पद्धतीने निकाल लागणार असेल तर तो उद्धव ठाकरे यांच्याच बाजूने लागेल, असा ठाम दावा विधिज्ञ असीम सरोदे यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे सत्ताधारी शिवसेनेत एकच खळबळ माजली आहे. सद्यस्थितीत वारंवार तारीख देण्याची प्रक्रिया अतिशय वाईट पातळीला पोहोचली आहे. न्यायाला विलंब होणे हा ही एकप्रकारचा अन्यायच आहे, असेही ते यावेळी म्हणाले. शिवसेना पक्ष चिन्ह व नावाची सुनावणी सुप्रीम कोर्टात 12 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या सुनावणीकडे महाराष्ट्रासह अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे.…
विजय पाटील : प्रतिनिधी चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे माजी आमदार राजीवदादा देशमुख यांचे आज, मंगळवार, २१ ऑक्टोबर रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. दुपारी ही दुःखद घटना समोर येताच संपूर्ण राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. माजी आमदार राजीव देशमुख यांची आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास अचानक तब्येत बिघडली. त्यांना तातडीने चाळीसगाव सर्वात आधी डॉ.मंगेश वाडेकर यांच्या शैलजा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये नेले तिथून त्यांना धुळे येथे रेफर करण्यात आले. यावेळी चाळीसगावचे विद्यमान आमदार मंगेश चव्हाण हे त्यांच्या सोबत असल्याचे कळते. प्रकृतीची अधिक गंभीरता लक्षात घेऊन, व तिथूनच चाळीसगाव येथून आ. मंगेश चव्हाण डॉ. नरेंद्र राजपूत, डॉ,सुनील…
मुंबई : वृत्तसंस्था कामोठे येथील सेक्टर 36 मधील आंबे श्रद्धा सहकारी सोसायटीत रात्री लागलेल्या भीषण आगीत आई-मुलगी जिवंत होरपळून मरण पावल्या. सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. ऐन सणासुदीच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार कामोठे येथील सेक्टर 36 मधील आंबे श्रद्धा सोसायटीच्या रूम क्रमांक 301 मध्ये रविवारी रात्री अचानक आग लागली. सुरुवातीला काही वेळातच ही आग संपूर्ण घरात पसरली. स्थानिकांनी धूर आणि ज्वाळा पाहताच तात्काळ बाहेर धाव घेतली आणि अग्निशमन दलाला फोन केला. तोपर्यंत सोसायटीतील इतर नागरिकांनी इमारतीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या तातडीने…
अमळनेर : प्रतिनिधी अमळनेर तालुक्याचा अतिवृष्टी नुकसान भरपाई चा दि. १८/१०/२०२५ चा शासन निर्णय मध्ये समावेश नसल्याचे जाहीर होताच जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. गुलाबरावजी पाटील यांना पाळधी येथे जाऊन मा. आमदार शिरीषदादा चौधरी यांनी भेट घेवून अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानी बाधितांना मदत मिळणे बाबत. निवेदन दिले. निवेदनात अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी आम्ही वेळोवेळी मागणी केली आहे. वरील संदर्भीय शासन निर्णयानुसार जळगाव जिल्ह्यातील ३२५३५९ शेतकऱ्यांना २४७२६२.०१ हेक्टर क्षेत्राकरिता रु.२९९९४.४७ लाख इतकी मदत घोषित झाली असून याबाबत सविस्तर माहिती घेतली असता यामध्ये अमळनेर तालुक्याचा कुठेही समावेश करण्यात आलेला नाही. यामुळे अमळनेर…

