Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » महिला बचत गटाचे साडेचार लाखांच्या रोकडवर चोरट्यांना डल्ला !
    क्राईम

    महिला बचत गटाचे साडेचार लाखांच्या रोकडवर चोरट्यांना डल्ला !

    editor deskBy editor deskJuly 17, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    एरंडोल : प्रतिनिधी

    तालुक्यातील खडकेसिम येथील महिला बचत गटाच्या अध्यक्षा जयश्री योगेश सुतार व सचिव संगीता भरत पाटील या बचत गटाची कर्जाची रक्कम स्टेट बैंक एरंडोल शाखेतून काढून घरी जात असताना दुचाकीवरील दोघांनी रोकड असलेली पिशवी धूम स्टाईलने लांबवली. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली.

    सविस्तर वृत्त असे कि, जयश्री सुतार यांनी हातातील पिशवी बाजूला असलेल्या ओट्यावर ठेवली. त्यावेळी चोरट्यांनी संधी साधू पोबारा एरंडोल तालुक्यातील खडकेसिम येथे सावित्री महिला बचतगट असून त्यात एकूण १० सदस्य आहेत. या बचतगटाच्या अध्यक्षा जयश्री योगेश सुतार व सचिव संगीता भारत पाटील या आहेत. उमेद अभियानांतर्गत मे महिन्यात ६ लाख रुपयांचे कर्ज या बचत गटास मंजूर असून १ लाखाची रक्कम याआधी त्यांनी काढलेली आहे. मात्र या कर्जाचे सुमारे ४० हजारांचे २ हप्ते कपात होऊन या बचत गटाच्या बँक खात्यावर ४ लाख ६० हजार एवढी रक्कम शिल्लक होती. बुधवारी दुपारी सुतार व पाटील या दोन्ही बचत गटाच्या पदाधिकाऱ्यांनी एरंडोल येथे स्टेट बँकेत जाऊन ही रक्कम धनादेशाद्वारे काढली. ती रक्कम कापडी पिशवीत ठेऊन घराकडे पायी जात असताना ही घटना घडली. याप्रकरणी रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खळबळजनक : १८ वर्षीय तरुणीचा विनयभंग !

    March 13, 2026

    अमळनेरात गांजा सेवन करणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई; चौघांना रंगेहाथ पकडले

    March 13, 2026

    पेट्रोल भरताना अचानक चक्कर; व्यावसायिकाचा रुग्णालयात मृत्यू

    March 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.