Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी गेल्या  तीन दिवसांपासून काम नसल्याने वेल्डिंगच्या कामावर गेलेला असताना विजेचा धक्का लागून आवेश अली परवेज अली (२१, रा. उस्मानिया पार्क) याचा मृत्यू झाला. आवेश हा एसी, फ्रीज दुरुस्तीचे काम करायचा, मात्र काम नसल्याने तो वेल्डिंगच्या कामावर गेला होता. उस्मानिया पार्क परिसरातील आवेश अली या तरुणाचे रेफ्रिजरेशन या ट्रेडमध्ये आयटीआय झाले. तो नियमित एसी, फ्रीज दुरुस्तीचे कामे करायचा. मात्र, तीन दिवस काम नसल्याने तो वेल्डिंग दुकानावर कामासाठी गेला होता. वेल्डिंगचे काम सुरू असताना दुपारी अचानक त्याचा पाय उघड्या वीज वाहक वायरवर पडला व त्याचा जबर शॉक लागून तो बेशुद्ध झाला. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले…

Read More

जळगाव : प्रतिनिधी घरात सर्व जण झोपलेले असताना प्रीती कमलाकर जाधव (२२, रा. म्हसावद, ता. जळगाव) या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (२४ ऑक्टोबर) पहाटे पाच वाजता तालुक्यातील म्हसावद येथे उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समोर आले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील म्हसावद येथे प्रीती जाधव ही तरुणी कुटुंबियांसह राहत होती. गुरुवारी मध्यरात्री सर्वजण झोपलेले असताना तिने राहत्या घरात गळफास घेतला. शुक्रवारी पहाटे पाच वाजता हा प्रकार समोर आला. त्या वेळी तिला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले.

Read More

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील बसस्थानक रोडवरील क्षेत्र प्रशिक्षण केंद्र (ए.टी.सी.) समोर २२ रोजी दुपारी दोन ते तीन वाजेदरम्यान पाच वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणाचा तपास भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी अवघ्या काही तासांत लावून मुलीचीप सुटका केली. याबाबत मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. तपासात आरोपी गोरेलाल भगवानसिंग कछवे असल्याचे निष्पन्न झाले. भुसावळ पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीस उजनी देवस्थान (ता. बोदवड) येथून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून मुलीला सुरक्षितपणे शोधत आई –  वडिलांच्या स्वाधीन केले. आरोपीवर यापूर्वीही…

Read More

आजचे राशीभविष्य दि.२६ ऑक्टोबर २०२५ मेष राशी शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. शेतीच्या कामात प्रगती होईल. वैवाहिक जीवनात आनंदाची सुरुवात होईल. आज तुम्ही काही नवीन सुरुवात केली तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. स्पर्धात्मक क्षेत्रात प्रगती करण्याची संधी मिळेल. वृषभ राशी गेल्या काही दिवसांपासून आरोग्यामुळे त्रासलेल्यांना आज मोठा दिलासा मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला बढतीची चांगली बातमी मिळू शकते. आज तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आज कोणत्याही गोष्टीवर जास्त लक्ष केंद्रित करू नका, अन्यथा तुम्हाला गुंतागुंतीचा सामना करावा लागेल. मिथुन राशी आज तुमच्या कुटुंबातले लोकं तुमची प्रशंसा करतील. तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद आणि सुसंवाद वाढेल. सरकारी क्षेत्रातील लोकांशी चांगले संबंध ठेवा आणि…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील नागपूरमध्ये सतराव्या रोजगार मेळाव्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमादरम्यानचा दोन महिला अधिकाऱ्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावेळी भारतीय टपाल सेवेतील दोन महिला अधिकारी पंतप्रधान मोदी आणि गडकरींसमोर या कार्यक्रमात एकमेकींसोबत भिडल्या. मात्र कशावरून? तर केवळ एका खुर्चीवरून… नागपूरमध्ये १७ व्या रोजगार मेळाव्यात पंतप्रधान मोदींनी ५१,००० हून अधिक तरुणांना नोकरी पत्रे वाटली. या कार्यक्रमाला गडकरी व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांच्या बाजूला असलेल्या सोप्यावर टपाल सेवेतील दोन महिला अधिकारी बसलेल्या होत्या. मात्र, या सोप्यावर केवळ एकच अधिकारी बसण्याची व्यवस्था होती.…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था स्थानिक निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी  जोरदार तयारी सुरु केली असून आता  मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली असून, केंद्र आणि राज्याच्या धर्तीवर देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेत वर्चस्व प्रस्थापित करण्याचे ‘मिशन १५० प्लस’ चे लक्ष्य ठेवले आहे. युतीमधील जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असून, भाजप १५० हून अधिक जागांवर उमेदवार उतरवण्याची तयारी करत असल्याचे सूत्रांकडून कळते. यावरूनच शिवसेना उद्धाव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी भाजपला उपरोधिक टोला हाणला आहे. त्याचबरोबर त्यांनी भाजप काहीही म्हणत असलं तरी मुंबई महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसणार असं सांगितलं. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपने १५० जागांचे लक्ष्य ठेवले असले तरी, जागावाटपात मित्रपक्ष असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आगामी होवू घातलेल्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षाची जोरदार तयारी सुरु असतान आता भाजपने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मोठी रणनिती तयार केली आहे. पक्षाने 150 हून अधिक जागांवर उमेदवार उतरवण्याचे लक्ष्य ठेवले असून, उर्वरित जागांवर शिवसेना शिंदे गटाशी युतीचा फॉर्म्युला तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याच दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला रवाना झाल्याने राजकीय चर्चांना अधिकच उधाण आले आहे. भाजपने मुंबईसाठी 150 जागांवर विजयाचे लक्ष्य ठेवताच, शिंदेंनी मध्यरात्री दिल्लीकडे प्रयाण केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यांच्या दिल्ली भेटीमागे नेमके कारण काय, याबाबत अद्याप अधिकृत माहिती नाही. शिंदेंची ही भेट आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्यासाठीच…

Read More

वडीगोद्री : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापासून राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक आंदोलन करण्यात आले असून आता २ सप्टेंबरचा जीआर चुकीचा वाटणाऱ्यांनी मराठ्यांना ओबीसीतून सरसकट कुणबी आरक्षण देण्याचा जीआर काढून दाखवावा, असे आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी विरोधकांना केले. अंतरवाली सराटी येथे माध्यमांशी बोलताना जरांगे म्हणाले की माझ्यावर मीडियात बोलू नका, मी थांबतो तुम्ही लढा. कुणबीतून मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्याचा जीआर काढून दाखवा. तुम्ही तुमचा दुसरा कोणताही जीआर काढा, पण गरीब मराठ्यांचा २ सप्टेंबरचा जीआर आणि शिंदे समितीला धक्का लागू देऊ नका. मी एका वर्षात २ सप्टेंबरच्या जीआरच्या मदतीने सगळे मराठे आरक्षणात घालून दाखवतो असेही जरांगे म्हणाले. ते पुढे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील बीग बाजार परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने विनापरवाना बेकायदेशीरपणे गावठी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या हर्षल जितेंद्र कदम (वय २८, रा. मकरा टॉवर) याला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याजवळून १५ हजार ५०० रूपये किंमतीचा गावठी पिस्तुल व जीवंत काडतूस जप्त करण्यात आले. ही कारवाई दि. २३ रोजी दुपारच्या सुमारास केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील बिग बाजारकडे जाणाऱ्या रोडवर दोस्ती बियर शॉप समोरील सर्कलजवळ संशयित गावठी पिस्तूल घेवून दहशत माजवित असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांना मिळाली. त्यांनी लागलीच सपोनि सुरेश आव्हाड, सफौ सुनिल पाटील, पोहेकॉ सतीश पाटील,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील वाघ नगरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने छापा टाकला. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या या कारवाईमध्ये तीन महिलांना ताब्यात घेतले असून त्यांना तालुका पोलीस ठाण्यात नेले. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील वाघ नगरातील एका घरामध्ये कुंटणखाना सुरू असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे यांना मिळाली. त्यांनी पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले. पथकाने कुंटणखाना सुरु असलेल्या घरावर छापा टाकला असता, तिथे तीन महिला आक्षेपार्ह स्थितीत आढळून आल्या. पोलिसांनी तात्काळ या तिन्ही महिलांना ताब्यात घेतले. या कारवाईमुळे वाघ नगर परिसरात एकच खळबळ उडाली आणि अवैध कृत्यांविरुद्ध…

Read More