पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील २२ वर्षीय तरुणीच्या साखरपुड्यात एका विवाहित तरुणाने राडा घालत तरुणीच्या नातेवाईकांना शिवीगाळ करीत तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी की, पारोळ्या तालुक्यातील एका गावात आपल्या परिवारासह वास्तव्यास असलेली बावीस वर्षीय तरुणीला संशयित आरोपी मिलिंद सुभाष देवरे यांनी दिनांक ९ डिसेंबर २०२२ पासून तर आजपर्यंत वारंवार लग्नाचे आम्हीच देत युवतीला मंगळसूत्र घालून सेल्फी फोटो घेतला होता. त्यानंतर तरुणीला सांगितले की मी माझ्या बायकोला फारकती देऊन तुझ्याशी लग्न करेल व तरुणीला प्रेम करण्यास भाग पाडले. त्यानंतर तरुणीचा साखरपुडा असल्याने त्या ठिकाणी जात तरुणीच्या नातेवाईकांना शिवीगाळ करीत व तरुणीस सेल्फी…
Author: editor desk
औरंगाबाद : वृत्तसंस्था राज्यात हिवाळी अधिवेशनात विरोधक व सत्ताधाऱ्यामध्ये चढाओढ पाहायला मिळत असतांना दुसरीकडे भाजपचे नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीबाबत मोठं विधान केलं आहे. राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभेच्या देखील निवडणुका होणार असल्याचा दावा रावसाहेब दानवे यांनी केला आहे. औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यात नवनिर्वाचित भाजप सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार सोहळ्यात दानवे यांनी हे विधान केलं आहे. भाजपच्या नवनिर्वाचित सरपंच यांच्या सत्कार सोहळ्यात बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले की, हल्लीची राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता लोकसभेबरोबर विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात. सोबतच राजकीय घडामोडी होऊन इतर औरंगाबाद जिल्ह्यातील इतर पक्षातील नेते भाजपमध्ये प्रवेश करतील,…
नागपूर : वृत्तसंस्था नागपूर येथे विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात याबाबत लक्षवेधी मांडली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते,माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे त्यांच्या विरोधात आता एसआयटी चौकशीचे आदेश महसूलमंत्री बाळासाहेब विखे यांनी दिले आहे. मंदाकिनी खडसे यांनी मुक्ताईनगर येथील गौण खनिजामध्ये राज्य सरकारचा ४०० कोटीचा महसूल बुडवला आहे, असा आरोप आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. नुकत्याच झालेल्या जळगाव दूध संघ निवडणुकीत मंदाकिनी खडसे यांचा पराभव झाला आहे. एकनाथ खडसे यांच्या पत्नीचा मोठा पराभव झाल्याने दूध संघावरील पकड आता कमी झाल्याचे बोलले जात आहे. भाजपेचे नेते गिरीश महाजन आणि…
नागपूर : वृत्तसंस्था कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी करा, अशी मागणी करत सोमवारी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली. विधिमंडळ अधिवेशनात सोमवारी विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधान परिषदेत अनिल परब यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप केले. याप्रकरणी सत्तारांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश खुंटीला टांगून अब्दुल सत्तार यांनी मौजे गोडबाभूळ (ता. जि. वाशीम) येथील गट नंबर 44 मधील 37 एकर 19 गुंठे सरकारी गायरान जमिनीचे एका व्यक्तीला वाटप केले. या जमिनीची किमंत साधरणतः दीडशे कोटी रुपये आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीही हा निर्णय अवैध पत्र…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाचे संरक्षण करीत असताना शहीद झालेल्या जवानाच्या परिवारातील बहीण आणि मुलींनाही आता अनुकंपा तत्त्वावर सैन्यात नोकरी मिळू शकणार आहे. लष्करात सुरू असलेल्या सुधारणांच्या कामात हा पुढाकार घेतला जात आहे. संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय समितीच्या शिफारशीनंतर सरकार यावर गांभीर्यानं विचार करत आहे. समितीनं अशी नियुक्ती लिंगभेद न करता करण्याची शिफारस केली होती. त्यात म्हटलंय, शहीद जवानाचा मुलगा, भाऊ अथवा मुलगी आणि बहिणीला अनुकंपा तत्त्वावर सैन्यात नोकरी दिली जावी, असं नमूद केलंय. सध्याच्या नियमांनुसार, ‘जेसीओ (JCO) किंवा कोणत्याही दर्जाचा जवान युद्धात मारला गेला तर लष्कर त्याच्या एका मुलाला ताबडतोब सैन्यात नियुक्त करतं. पण, कन्येची नियुक्ती करण्याचा पर्याय अद्याप उपलब्ध…
अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातून मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी तब्बल ७० हजाराचे पशुधन चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील अचलवाडी या गावातील रहिवासी नरेंद्र विश्वास पाटील यांच्या अंगणातून दिनांक २४ रोजीच्या मध्यरात्रीच्या सुमारास अनोळखी चोरट्यांनी ४० हजार रुपये किमतीची जर्सी गाय व तीस हजार रुपये किमतीची असलेली जर्सी गाय असे दोन पशुधन ७० हजार रुपये किमतीचे अनोळखी चोरट्यांनी चोरून नेले आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये अनोळखी चोरट्याने विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोहेका जनार्दन पाटील हे करीत आहे
सध्या देशात लग्नसराई जोरदार सुरु आहे. त्यामुळे लग्नाचे नियोजन हि मोठ्या प्रमाणावर केले जाते. तर प्रत्येक तरून व तरुणीच्या महत्वाचा प्रसंग हा लग्न असतो त्यमुळे तो उत्तमरीत्या झाला पाहिजे असा दोघांचा मानस असतो. तर लग्नाच्या पहिल्याच रात्री जर सजविलेल्या रूममध्ये अचानक नातेवाईक येवून बसले तर काय होईल हे तुम्ही या व्हीडीओमधून पाहू शकता. व तो सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. इंटरनेटवर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लग्नानंतर नवरदेव आपल्या नवरीला सासरी घेऊन येतो. नवरदेवाच्या घरच्यांना नववधूला सरप्राइज द्यायचं होतं. हा व्हिडिओ तुम्हाला सुद्धा सरप्राईजच देईल. लग्नाच्या पहिल्या रात्री नवरदेवाची खोली चांगलीच सजवलेली दिसते. नवरदेव नवरीला घेऊन खोलीत शिरला,…
जळगाव : प्रतिनिधी जगातील चीन पाठोपाठ भारतात देखील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली आहे. राज्याकडून उपाययोजना करण्याबाबत सूचना प्राप्त होताच रविवारी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी बैठक घेऊन आरोग्य विभागाला तपासण्या व लसीकरण वाढवण्याच्या सूचना दिल्या. त्यात रेल्वेस्थानक, बसस्थानक या ठिकाणी देखील तपासण्या सुरु करण्याबाबत महापालिकेला सूचना दिल्या. रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, महापालिकेचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी, जिल्हा परिषदेचे डी. बी. पांढरे, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. सुपे उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिका, जिल्हा परिषद व जिल्हा सामान्य रुग्णालय यांचा आढावा घेतला. हेल्थ पोस्ट शिवाय बसस्थानक व रेल्वेस्थानकावर…
मुंबई : वृत्तसंस्था देशात मोठ्या प्रमाणात गेल्या आठ दिवसापासून थंडी सुरु असतांना आता नवीन अंदाजानुसार नववर्षाचे स्वागत करण्यासाठी थंडी आता सज्ज झाली असून ३१ डिसेंबर ते ४ जानेवारी या पाच दिवसांत हंगामातील सर्वात कडाक्याची थंडी पडू शकते. पंजाब, हरियाणासह काही राज्यांत रात्रीचे तापमान नीचांकी होऊ शकते. दिल्ली, राजस्थान, पश्चिम-उत्तर प्रदेशात रात्रीचे तापमान १ ते ४ अंशांदरम्यान राहू शकते. कमाल तापमान १० ते १४ अंश सेल्सियस राहू शकते. नवीन वर्षाच्या सुरुवातीला उत्तरेकडील डोंगराळ राज्यांपासून पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, पूर्व आणि उत्तर मध्य प्रदेशातील बहुतांश भागात दाट धुके पाहायला मिळेल. दक्षिणेकडील राज्ये वगळता नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात देशभरात तापमानात घट…
जळगाव : प्रतिनिधी नवनिर्वाचित सरपंच व सदस्य हे आता गावाचे कारभारी आहेत. आपले अधिकार, कर्तव्ये, ग्रामपंचायतीचे दप्तर समजल्यास चांगले काम करता येईल. त्यासाठी नवीन सरपंचांनी ‘सरपंचकी’ समजून घ्यावी.. सरपंचाने गावाचा अभ्यास करावा ; नियमांची माहिती जाणून घेण्याची गरज आहे. आता निवडणूक संपली असल्याने नवीन सरपंच व सदस्यांनी गावाची एकजूट कायम ठेवून एकोप्याने “गावाचा विकास ” साध्य करा. ग्रामपंचायत स्तरावर सरपंच विकासाचा केंद्रबिंदू आहे. हा सत्कार एकट्या सरपंचांचा नसून संपूर्ण गावाचा सत्कार आहे. आपल्या गावात मंजूर असलेली पाणीपुरवठा योजना मुदतीत पूर्ण करून १००% यशस्वी करा असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. आज दिवसभरात १५ पेक्षा जास्त सरपंच व ७५ च्यावर…

