मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही महिन्यापासून पोलीस भरतीसाठी तरूण सराव करीत होते. नुकतीच त्यांनी पोलीस भरतीसाठी अर्ज केले असून आता पोलिस भरतीच्या मैदानी परीक्षेचे वेळापत्रक शहर पोलिस आयुक्तालयाकडून अंतिम झाले आहे. चालक पदाची पहिल्यांदा आणि त्यानंतर पोलिस शिपाई पदांसाठी मैदानी चाचणी होईल. २ ते २० जानेवारीपर्यंत मैदानी चाचणी उरकली जाणार आहे. ग्रामीण पोलिस दलाची मैदानी चाचणी देखील २ जानेवारीपासूनच सुरु होणार आहे. सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयातर्फे चालकपदाच्या ७३ जागांसाठी पाच हजार ५५८ उमेदवारांचे अर्ज आहेत. तर शिपाई पदाच्या ९८ जागांसाठी सहा हजार ६२१ उमेदवार मैदानात आहेत. चालकसाठी २५२ महिला तर शिपाई पदासाठी एक हजार ३८५ महिला उमेदवार आहेत. आयुक्तालयाच्या…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी गेल्या आठवड्यात नियमित जामीन झाल्यानंतर जळगावात दाखल झालेले माजी आ.सुरेशदादा जैन यांना दि २३ रोजी न्युमोनियाची लागण झाली असून त्यांना उपचारांसाठी मुंबई येथील ब्रीच कँडी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. सुरेश जैन यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे. सुरेशदादा जैन यांना 23 डिसेंबर मध्यरात्रीच्या सुमारास श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्यानंतर शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी त्यांना न्युमोनियाची लागण झाल्याचं निदान डॉक्टरांनी केले होतं. यानंतर जैन यांना पुढील उपचारांसाठी तातडीने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात नियमित उपचार सुरु असल्याने त्यांना एअर अॅम्ब्युलन्सच्या मदतीने मुंबईत…
अमळनेर : प्रतिनिधी बस स्थानकाजवळ विक्रीसाठी आणलेला दोन लाख तीस हजार रुपये किमतीचा १५ किलो गांजा अमळनेर पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीवरून पकडला असून त्यात एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून एक जण फरार होण्यात यशस्वी झाला आहे. सविस्तर वृत्त असे कि, 22 रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास अमळनेर बस स्थानकाजवळ दोन जण गांजा आणणार असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना मिळाली होती.त्यानुसार बसस्थानक परिसरात राधेश्याम रामसिंग पावरा व सुरेश साहेबराव भदाणे दोन्ही रा.हिसाळे ता.शिरपूर जि. धुळे हे एका पिशवीत सुमारे दोन लाख तीस हजार रुपये किमतीचा १५ किलो ५६६ ग्रॅम गांजा सोबत पोलिसांना आढळून आले. सुरेश साहेबराव भदाणे यास…
पुणे : वृत्तसंस्था आज पहाटे भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातानंतर गाडी ५० फुट खोल दरीत कोसळली. यावेळी गाडीत आमदार गोरेंसह चौघे जण होते. जखमींना उपचारासाठी बारामतीला हलविण्यात आलं. तर गोरे यांच्यावर पुण्यात उपचार सुरू आहे. गोरे हे सातारा जिल्ह्यातील मान-खटावचे आमदार आहेत. साताऱ्यातील फलटण येथे जयकुमार गोरेंच्या गाडीला अपघात झाला. बानगंगा नदीच्या पुलावरुन जयकुमार गोरे यांची गाडी सुमारे 50 फूट खोल दरीत कोसळली. नदीच्या पुलाला लावलेल्या तारा तोडून गाडी सुमारे 50 फूट खोल दरीत कोसळल्याची माहिती मिळत आहे. साताऱ्यातील मान खटाव मतदार संघाचे भाजप आमदार जयकुमार गोरे मुंबईहून आपल्या घराकडे रवाना होत असताना त्यांच्या…
जळगाव : प्रतीनिधी शहरासह परिसरामध्ये दहशत माजविणाऱ्या तीन गुन्हेगारांना शुक्रवारी जळगाव जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी काढले आहे. यामध्ये सागरसिंग जीवनसिंग जन्नी (२८) रणजीतसिंग जीवनसिंग जुन्नी (२५) आणि शक्तिसिंग जीवनसिंग जुन्नी (२८, सर्व रा. राजीव गांधीनगर) असे हद्दपार केलेल्या गुन्हेगारांची नावे सागरसिंग, रणजीतसिंग आणि शक्तिसिंग यांच्याविरुद्ध रामानंदनगरसह जिल्हापेठ पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांचा हद्दपारीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाची चौकशी करण्यात आली. तिघे टोळीने राहून जळगाव शहरासह परिसरामध्ये दहशत पसरवितात.
चोपडा विभागीय पोलीस अधिकारी कृषिकेश रावले यांची कारवाई ! धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावाजवळील रस्त्यावर चोपडा विभागीय पोलीस अधिकारी कृषिकेश रावले यांच्या पथकाने विमल गुटखा अवैध वाहतूक करणाऱ्या आयशर गाडीस पकडल्याने धरणगाव तालुक्यातील गुटखा माफियाचे धाबे दणाणले आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील एका गावातील मुख्य रस्त्यावरून अवैध गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधिकारी कृषिकेश रावले यांनी सापळा रचत दि 23 रोजी 00.30 वाजता पोलीस निरीक्षक धरणगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक जिभाऊ पाटील, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे पोलिसांमलदार व धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार अशांनी धरणगाव पोलीस स्टेशन हद्दीत रोडवर गावाजवळ विमल गुटखा अवैध वाहतूक…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील मोठी अपघाताची बातमी समोर आली आहे. सिक्कीमच्या जेमा येथे शुक्रवारी लष्कराचा ट्रक दरीत कोसळला. यामध्ये 16 जवान शहीद झाले असून 4 जखमी झाले आहेत. एका तीव्र वळणावर वाहन घसरले आणि थेट दरीत कोसळल्याचे लष्कराने सांगितले. या वाहनासोबत लष्कराची आणखी दोन वाहने होती. तिन्ही वाहने सकाळी चट्टण येथून थंगूकडे जात होती. लष्कराचे बचाव पथक हेलिकॉप्टरद्वारे मृतदेह आणि जखमी जवानांना बाहेर काढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला असून जखमी लवकरात लवकर बरे होण्याची कामना केली आहे. शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार…
बॉलिवूडमधील कंगना रनौत नेहमी आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यामूळं चर्चेत असतं. कंगणा कधी कूणाबद्दल काय बोलेल याचा भरोसा नाही. कधी ती कुणाला झाडते तर कधी कुणाच्या कौतुकाचा वर्षाव करते. आता तर तिने काही वेगळंच केलयं. तिने तिची तुलना चक्क भारतरत्न लता मंगेशकर यांच्याशीच स्वत:ची तुलना केली आहे. यामुळे नेटकऱ्यानी रनौतला चांगलेच फटकारले आहे. कंगना राणौतने नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये गायिका आशा भोसले दिवंगत गायिका लता मंगेशकर यांच्याबद्दल बोलत आहेत. व्हिडीओमध्ये आशा भोसले सांगत आहेत की, लता मंगेशकर कधीही लग्नसमारंभात गात नाही गायच्या. त्यांना कितीही पैसे देऊ केले तरी त्या लग्नात कधीच गायच्या नाहीत. हा व्हिडिओ शेअर करताना कंगना…
नागपूर : वृत्तसंस्था राज्याचे हिवाळी अधिवेशनात कालपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांच्या निलंबनामुळे विरोधक आक्रमक झाले असून त्यांनी विधिमंडळाच्या कामकाजावर बहिष्कार टाकलाय. ते दोन्ही सभागृहातील कामकाजात विरोधक सहभागी होणार नाहीत. विधिमंडळाच्या पायऱ्यावर विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. महाविकास आघाडी सरकार असताना भाजप नेत्यांनीच भुखंड घोटाळाप्रकरणी ‘आयएल’ दाखल केली होती. त्यांनीच एकनाथ शिंदेंचा भुखंड घोटाळा पुढे आणला, असा दावा अजित पवार यांनी केला आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. गेल्या 3 दिवसांपासून राज्यातील विविध प्रश्नांवर विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार चर्चा घडत आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे अधिवेशन संपेपर्यंत निलंबन केल्याने राष्ट्रवादी आक्रमक…
बुलढाणा : वृत्तसंस्था राज्यात महिलांना विविध क्षेत्रात मोठे स्थान प्राप्त झाल्यावर सुद्धा आजही काही भागात महिलांना चुकीची वागणूक दिली जात आहे. याचाच प्रत्यय बुलडाण्यात आला आहे. एका महिला सरपंचाच्या घरात तब्बल १५ जणांनी जबरदस्तीने प्रवेश करत तिला बेदम मारहाण केली आहे. जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील सारशिव गावात ही संतापजनक घटना घडली आहे. रमाबाई जाधव असे या जखमी झालेल्या महिला सरपंचाचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २२ डिसेंबर गुरुवारी १५ जणांनी अचानक रमाबाई जाधव यांच्या घरात घुसून त्यांच्यावर हल्ला करत त्यांना जबर मारहाण केली. तू फुकट सरपंच झाली, असं म्हणत आरोपींनी महिला सरपंचासह तिच्या मुलावरही हल्ला चढवला. या हल्ल्यात दोघांनाही किरकोळ जखम झाली…

