Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » वाद संपत नसल्याने पतीने केला पत्नीचा खून व पोहचला पोलीस स्थानकात…
    क्राईम

    वाद संपत नसल्याने पतीने केला पत्नीचा खून व पोहचला पोलीस स्थानकात…

    editor deskBy editor deskNovember 21, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    औरंगाबाद : वृत्तसंस्था 

    साहेब, मी बायकोला मारून आलोय, मला अटक करा,’ असे म्हणत आपतगाव ग्रामपंचायतीच्या महिला सदस्याचा पती रविवारी दुपारी २ वाजता चिकलठाणा पाेलिस ठाण्यात हजर झाला. कडुबा भागाजी हजारे (४२) असे आरोपीचे नाव असून त्याने ठाण्यात येण्याच्या तासाभरापूर्वी पत्नी सुनीता (३८) यांचा शेतात गळा दाबून खून केला. चिकलठाणा पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

    रविवारी दुपारी चिकलठाणा पोलिस ठाण्यात दैनंदिन कामे सुरू होते. पोलिस कर्मचारी काही स्थानिकांच्या तक्रारी ऐकत होते. तेवढ्यात कडुबा ठाण्यात आला. समोर बसलेल्या अधिकाऱ्याने काय काम आहे? असे विचारले. तेव्हा ‘साहेब, मी बायकोला मारून आलाेय, मला अटक करा,’ असे चेहऱ्यावर शांत भाव ठेवून त्याने सांगितले. त्याचे हे बाेलणे एेकून क्षणभर पाेलिस हैराण झाले. उपनिरीक्षक बालाजी ढगारे यांनी त्याला सविस्तर घटना विचारली. त्यानंतर उपअधीक्षक जयदत्त भवर, सहायक निरीक्षक सुदाम शिरसाट यांना घटना कळवली. दोघेही तत्काळ पोलिस ठाण्यात दाखल झाले. कडुबा घटना सांगत होता, मात्र आम्हाला शहानिशा करण्यासाठी घटनास्थळी जाणे महत्त्वाचे होते. त्यामुळे आम्ही कडुबाला घेऊन तत्काळ गावात पाेहाेचलाे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

    कडुबा यांचा लहान मुलगा शेतात पाेहाेचला तेव्हा आई बेशुद्धावस्थेत आढळल्यानंतर त्याने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. मी गावात एवढे प्रस्थ तयार केले होते. तिला ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आणले तरी आमचे वाद संपत नव्हते. हे सर्व सहन न झाल्याने मी तिला मारून टाकले, अशी कबुली कडुबाने अधिकाऱ्यांसमोर दिली.

    सुनीता या ग्रामपंचायत सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आल्या होत्या. मात्र, कडुबा व त्यांच्यात सतत वाद हाेत हाेते. त्यामुळे कडुबा यांचे आई-वडील वेगळे राहू लागले. काही महिन्यांपूर्वी लग्न झालेला मोठा मुलगा व सूनदेखील वेगळे झाले. रविवारी सुनीता व कडुबा शेतात होते. तेथे त्यांच्यात पुन्हा वाद झाल्याने कडुबाने सुनीता यांना मारहाण सुरू केली. त्यामुळे त्या पळत सुटल्या. तेव्हा कडुबाने त्यांचा पाठलाग करून त्यांच्याच स्कार्फने गळा आवळून खून केला. त्यानंतर दोन वाजेच्या सुमारास पोलिस ठाण्यात हजर झाला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कर्की फाट्यावर अपूर्ण पुलामुळे सर्व्हिस रोडवर खड्ड्यांचे साम्राज्य; गणेशमूर्ती नेताना भक्तांना तारेवरची कसरत !

    September 13, 2026

    रिचार्ज अपडेट करताना बँक खात्यावर डल्ला; वृद्धाचे तब्बल १० लाख लंपास

    September 13, 2026

    वरण-बट्टी खराब, तक्रार केली म्हणून मारहाण; जळगावात घडली घटना !

    September 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.