टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये सर्वाधिक प्रसिद्ध मालिका म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा. गेल्या दीड दशकांहून अधिक काळ या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. त्या मालिकेतील कित्येक पात्रं ही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. त्यातच बबिता फेम मुनमुन दत्ताला अपघात झाल्याची बातमी व्हायरल झाली आहे. मुनमुन ही गेल्या काही दिवसांपासून युरोपच्या दौऱ्यावर आहे. त्यात जर्मनीमध्ये असताना तिला अपघात झाल्याची बातमी व्हायरल झाली आहे. मुनमुनने इंस्टावरुन एक स्टोरी शेयर केली आहे. तिच्या पायाला दुखापत झाली आहे. तिनं चाहत्यांना काळजी न करु नका. आपण सुखरुप असल्याचे म्हटले आहे. मला दुखापत झाल्यानं दौरा अर्धवट सोडावा लागत असल्याचे मुनमुननं म्हटले आहे. मुनमुनची बातमी सोशल…
Author: editor desk
धरणगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या” सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक” मुख्य परीक्षा 2020- या परीक्षेचा अंतिम निकाल दिनांक २१ रोजी जाहीर करण्यात आला. त्यानुसार एकूण 233 उमेदवारांची प्रस्तुत पदाकरिता अंतिम निवड करण्यात आली आहे. अमळनेर येथील निखिल ठाकूर याची सहायक मोटर वाहन निरीक्षक ( आरटीओ ) पदी निवड झाल्याबद्दल (आयपिस) आधिकरी विश्वास नागरे पाटील यांचा लिखित ग्रंथ मन मे हे विश्वास हा ग्रंथ भेट देण्यात आला. यात निखिल अनिल ठाकूर याची वरील पदाकरिता पहिल्याच प्रयत्नात निवड झाली असून त्याने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. या यशाचे संपूर्ण श्रेय निखिल आपला परिवार तसेच त्याचे गुरुवर्य यांना प्रदान…
आपल्या बहारदार गायनानं श्रेयानं चाहत्यांना जिंकून घेणारी बॉलीवूडची प्रसिद्घ गायिका श्रेया घोषालची सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाली आणि चाहत्यांना मोठा धक्का बसल्याचे दिसून आले आहे. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ घेतले आहे. श्रेया ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे. मात्र आता तिच्या त्या पोस्टनं लाखो चाहत्यांच्या काळजात धस्स झाले आहे. तिनचं केलेल्या खुलाशानंतर चाहत्यांनी तिच्यासाठी प्रार्थनाही केली आहे. https://twitter.com/SonaSsg/status/1594307390567948288?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1594307390567948288%7Ctwgr%5E7eb57441b90a1414fc36a8c2810f3deaddd87a01%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.esakal.com%2Fglobal%2F20-people-killed-and-at-least-300-injured-in-an-earthquake-in-indonesia-main-island-of-java-rak94 श्रेयाच्या पोस्टमध्ये काय आहे… श्रेयानं लिहिलं आहे की, गेल्या रात्री माझा ओरलँडोमध्ये नाईट कॉन्सर्ट होता. त्यानंतर अचानक माझ्या आवाजात बिघाड झाला. मला त्रास होऊ लागला. माझा आवाज हा त्या कॉन्सर्टनंतर गेलाच होता. त्यामुळे मी खूप घाबरुन देखील…
मुंबई : वृत्तसंस्था राजस्थानमधील उदयपूर जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील सहा लोकांचे संशयास्पदरित्या घरात मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये आई-वडिल आणि चार मुलांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. सर्व मृतदेह ताब्यात घेत पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवले. कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली याबाबत अद्याप कोणताही खुलासा होऊ शकला नाही. पोलीस याप्रकरणी सखोल तपास करत आहेत. प्रकाश गमेती आणि दुर्गा गमेती अशी मयत जोडप्याची नावे असून, त्यांच्या चार मुलांचाही मृत्यू झाला आहे. घटनास्थळी डॉग स्कॉड पण दाखल झाले असून, घरातील प्रत्येक वस्तू तपासण्यात येत आहे. प्रथमदर्शनी आर्थिक विवंचनेतून कुटुंबाने आत्महत्या केल्याचे दिसत आहे.…
मुंबई : वृत्तसंस्था देशातील गुजरातमध्ये निवडणुकीचे पडघम वाजायची सुरुवात झाली असून याठिकाणी भाजपसह कॉंग्रेस व आम आदमी पार्टीने कंबर कसली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात दौऱ्याचा आज तिसरा दिवस आहे. आज सुरेंद्रनगर येथील प्रचारसभेत त्यांनी आपल्या नेहमीच्या अंदाजात गुजरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुसूदन मिस्त्री यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले – ‘मी तर जनतेचा सेवक आहे. माझी औकात काय?’ मिस्त्रींनी नुकतेच एक वादग्रस्त विधान करत मोदींना त्यांची औकात दाखवण्याची भाषा केली होती. पीएम मोदी म्हणाले, ”काँग्रेसचे नेते मोदींना औकात दाखवण्याची भाषा करतात. हा त्यांचा अहंकार आहे. तुम्ही राजघराण्यातील आहात. मी एका सर्वसामान्य कुटुंबातील आहे. माझी काहीच औकात नाही. तुम्ही…
मुंबई : वृत्तसंस्था २०१५ मध्ये नीतेश राणे यांनी सावरकरांच्या विरोधात ट्विट केले होते. आता भाजपमध्ये आल्यावर सावरकरांवरून बोलणारे शेंड्यावरून शहाणे झालेले बोलायला लागले की, असे नाही बोलायचे तसे नाही बोलायचे, भाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांनी नारायण राणेंच्या कणकवलीमधील घरी जात आंदोलन करावे, असे आव्हान शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या की, तुम्ही सावरकरांचा अपमान करताय असे आता म्हणणारे राणे यांनी 2015 मध्ये सावरकरांनी माफी मागितली होती, असे ट्विट केले होते. त्यावर अंधारे म्हणाल्या की, भाजपने कणकणवलीमध्ये जात राणेंच्या घरात घुसून आंदोलन करावे आणि नीतेश राणेंना बाहेर काढत पालथा घालून तुडवावा. मग आम्ही मानू, असे अंधारेंनी…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिंदे गट व ठाकरे गट कोणत्या न कोणत्या कारणाने समोरा समोर आल्यानंतर राडा होत आहे नुकतेच प्रभादेवी रेल्वे स्टेशन परिसरात ठाकरे गट आणि शिंदे गट आमनेसामने आला. विकासकामांच्या उदघाटन करताना श्रेयवादाच्या मुद्यावरुन दोन्ही गट समोरासमोर आल्याचं कळतं. ठाकरे गटाकडून यावेळी घोषणाबाजीही करण्यात आली. या भागातील विकासकामांचं उद्घाटन शिंदे गटाचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांच्या हस्ते होणार होतं. परंतु यावेळी तिथे ठाकरे गटाकडून घोषणाबाजी करुन उद्घाटनाला विरोध करण्यात आला. यावेळी काहीशी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. एल्फिन्स्टन विभागातील मुरलीधर सामंत मार्ग, फिटवला रोड फुटपाथ याच्या नुतनीकरणाचं हाती घेण्यात आलं…
मुंबई : वृत्तसंस्था दिवाळीच्या दरम्यान आफताबचे कुटुंबीय मीरा रोज येथील 2 बेडरूमच्या फ्लॅटमध्ये रहायला गेले. आफताबचे आई-वडील आधी कचरा टाकायला आल्यावर बाहेर दिसायचे. मात्र हल्ली ते दिसत नसल्याचं शेजाऱ्यांनी सांगितलं. 2019 मध्ये मुंबईच्या एका कॉल सेंटरमध्ये श्रद्धा आणि आफताबची भेट झाली होती. त्यानंतर दोघे प्रेमात पडले. श्रद्धा वालकर ही महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील रहिवासी आहे. 18 मे 2022 रोजी दोघांमधील वाद विकोपाला गेल्याने श्रद्धाची गळा दाबून हत्या केल्याची कबूली आफताबने दिली आहे. खून केल्यानंतर आफताबने तिच्या शरीराचे 35 तुकडे करून ते फ्रीजमध्ये ठेवले आणि त्यानंतर अनेक दिवस तो एक-एक तुकडा जंगलात फेकत होता. श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणावरून लिव्ह इन रिलेशनशिप नाते…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरातील अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील वाघ नगर परीसरातून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस अनोळखी व्यक्तीने मुलीस काही तरी फूस लावीत पळवून नेल्याची घटना दि २० रोजी सकाळी घडली आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी तालुका पोलिसात धाव घेत अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोउनी नयन पाटील हे करीत आहेत.
नवी दिल्ली : वृत्तसंस्था रविवारी रात्री बिहार राज्यातील वैशाली येथे भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात आलेल्या ट्रकने धडक दिल्यामुळे हा अपघात झाला आहे. दरम्यान या अपघातामध्ये लहान मुले आणि महिलांसह एकूण 12 जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अपघातात मृत झालेले आणि जखमी झालेले लोक पिंपळाच्या झाडाखाली उभे राहून पूजा करत होते. तेवढ्यात एक ट्रक 120 च्या वेगाने आला आणि लोकांना चिरडून निघून गेला. दरम्यान अपघातानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि जिल्हा प्रशासना घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पोहोचलेल्या रुग्णवाहिकेतून मुलांचे मृतदेह आणि जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली. पोलिसांनी…

