Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मराठी माणसाच्या राशीत हे नकोच : जितेंद्र आव्हाड !
    राजकारण

    मराठी माणसाच्या राशीत हे नकोच : जितेंद्र आव्हाड !

    editor deskBy editor deskNovember 20, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    औरंगाबादमध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं. त्यावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. “हे ‘भाज्यपाल’ मराठी माणसाच्या राशीला नकोत!”, असं म्हणत आव्हाडांनी कोश्यारी यांच्या विधानाचा निषेध केलाय.

    “थोड्या दिवसांपूर्वी स्वतः रस्त्यावर उतरून आंदोलन केलं होत की हे भाज्यपाल मराठी माणसाच्या राशीला नकोत! महात्मा फुले,छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल वाईट बोलले गेले. पुन्हा एकदा संपूर्ण देशाचे आदर्श आहेत अशा महाराजांबद्दल त्यांना जुने आदर्श म्हणून हिणवले. बस झाले आता बोचंक गुंडाळ!”, असं ट्विट आव्हाडांनी केलं आहे.

    तुम्हा तरूण मुलांना जर कुणी विचारलं तुमचा आयकॉन कोण? तुमचा आवडता नेता कोण? तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला भेटून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आहेत. मी आधुनिक काळाबाबत बोलत आहे. इथेच मिळतील. डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळतील, असं वादग्रस्त वक्तव्य भगतसिंह कोश्यारी यांनी केलं.

    थोड्या दिवसांपूर्वी स्वतः रस्त्यावर उतरून आंदोलन केलं होत की हे भाज्यपाल मराठी माणसाच्या राशीला नकोत
    महात्मा फुले,छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल वाईट बोलले गेले
    पुन्हा एकदा संपूर्ण देशाचे आदर्श आहेत अशा महाराजांबद्दल त्यांना जुने आदर्श म्हणून हिणवले
    बस झाले आता बोचंक गुंडाळ pic.twitter.com/u6Xu1SFwKr

    — Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 19, 2022

     

    हर हर महादेव चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसाआधी केला होता. त्यानंतर झालेल्या राड्याप्रकरणी आव्हाडांवर गुन्हाही दाखल झाला होता. त्यानंतर आता कोश्यारी यांच्या वादग्रस्त विधानावर आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा पदवीदान समारोह काल पार पडला. यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजप नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डी.लिट पदवी प्रदान करण्याच आली. यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना कोश्यारी यांनी शिवरायांबद्दल हे वादग्रस्त वक्तव्य केलंय.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वाढदिवसाचा अनोखा आदर्श! नगरसेवक इंजि. नरेंद्र पाटील यांनी गरजूंना रेनकोट वाटून दिला सामाजिक संदेश

    July 30, 2026

    जिल्ह्यातील ६३८ शिक्षकांचे शालार्थ आयडी मनोजच्या माध्यमातून: कोट्यवधींच्या मायाजालाचा धक्कादायक खुलासा?

    July 30, 2026

    बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळा; मनोजसह तीन मराठा नेते SITच्या रडारवर?

    July 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.