Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी  नशिराबाद हे बाजारपेठेचे व व लोकवस्तीचे मोठे शहर असून बेरोजगारांच्या गरजा लक्षात घेता नशिराबाद – उमाळा परिसरात मोठा प्रकल्प उभारण्याचा मानस आहे. ते पुढे म्हणाले की, नशिराबादच्या विकासासाठी आपण भरीव निधी दिला असून यातील नगर विकास व डीपीडीसी मधून १० कोटींची कामे सुरु आहेत. CRF व बजेट अंतर्गत नशिराबाद ते सुनसगाव या ५ किमीच्या रस्त्यासाठी १५ कोटी निधी मंजूर आहे. यात गावाजवळील भातातील दोन्ही बाजूला कॉन्क्रीट गटारी व काँक्रीट रस्ता होणार आहे. नशिराबाद हे शहर हायवेला टच असून आता मोठ्या प्रमाणात विस्तारत आहे. यामुळे येथे वैद्यकीय सुविधा देखील वाढीव अशी लागणार असल्याने येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा…

Read More

पुणे : वृत्तसंस्था  सोशल मिडिया व चित्रपटातून कितीपत लोक योग्य कला घेतील हे सांगता येत नाही. दृश्यम चित्रपट पाहून दोन मुलांनी चक्क आपल्या बापालाच संपविल्याचा प्रताप उघड झाला आहे. पुण्यातील 2 भावांनी आपल्याच वडिलांची हत्या करून त्यांच्या मृतदेहाची जाळून विल्हेवाट लावली. या दोघांनी वडिलांना ठार मारण्याचा प्लॅन दृश्यम चित्रपट पाहून तयार केला. हत्येनंतर स्नॅक्स तयार करण्याच्या घरच्या भट्टीत त्यांनी वडिलांचा मृतदेह जाळला. या खळबळजनक घटनेनंतर 8 दिवसांनी शुक्रवारी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या. धनंजय नवनाथ बनसोडे असे मृताचे नाव आहे. ते आपल्या फूड कॉर्नरवर फरसान विकत होते. त्यांचा 22 वर्षीय मोठा मुलगा सुजीत कंप्यूटर इंजीनिअरिंग कॉलेजमध्ये द्वितीय वर्षात शिकत आहे.…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यात भाजप व शिवसेना २०१९ मध्ये युती असतानाच विधानसभा निवडणुकीपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबत सेटलमेंट झाले होते असा दावाच आज पत्रकार परिषदेत माजी मंत्री विजय शिवतारे यांनी गौप्यस्फोट केला आहे. शिवतारे पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी करण्याआधीच सर्व काही ठरले होते. कोणत्या जागावरील उमेदवार पाडायचे, कोणत्या उमेदवारांना विजयी करायचे हे सर्व आधीच ठरले होते. बहुमताचे आकडे कसे जुळवून आणायचे हा कट निवडणुकी आधी तयार होता, असेही शिवतारे यांनी म्हटले आहे. निवडणुकीनंतर केवळ मविआची घोषणा झाली. मात्र निवडणूक ही त्याच अनुषंगाने लढविण्यात आली होती. आता ही लोकं केवळ सर्वांना फसवत आहेत, असा दावा शिवतारेंनी केला आहे. शिंदे…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी  तालुक्यातील एका गावातून अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्रीत दोन जणांचे घरफोडीत लाखोंचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी मेहुनबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील शिरसगाव येथील विजय केशवराव चव्हाण यांच्या घरातील व त्यांच्या समोर राहत असलेले नंदलाल नामदेव शेवाळे यांच्या घरातून अनोळखी चोरट्यांनी पाच लाख 40 हजार रुपयांचा दागिन्यांसह रोकड लंपास केली आहे. यामध्ये वीस हजार रुपये किमतीच्या प्रत्येकी अर्धा ग्रॅम वजनाच्या दहा अंगठ्या , नऊ हजार रुपये किमतीचा सोन्याचा शिक्का, एक हजार रुपये किमतीचे चांदीचे देव, दहा हजार रुपये किमतीच्या साड्या, नंदलाल शेवाळे यांच्या घरातील पाच लाख रुपये रोकड असा येऊन लंपास केला आहे. याप्रकरणी विजय…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  एका परिसरातील बंद घराचे कुलूप तोडून चोरी झाल्याची घटना उघड झाली आहे याप्रकरणी रामानंद पोलीसात गुन्हा दाखल केला आहे. शहरातील महाबळ नगर परिसरात त्रंबक नगरात रहिवासी असलेले माया राजेंद्र सोनवणे यांच्या घरी दिनांक २० रोजी सकाळी १० वाजे पासून ते २३ च्या मध्यरात्रीपर्यंत अनोळखी चोरट्यांनी घराच्या दरवाज्याचे कुलूप व कडी कोयना तोडून घरात प्रवेश करीत. नऊ हजार रुपये किमतीचे सोन्याचे अंगठी, पाच हजार रुपये किमतीचे सोन्याचे अंगठी, 38 हजार रुपये किमतीचे सोन्याचे पोत व अठरा हजार रुपये रोकड असा एकूण 70 हजार रुपयांचा सोन्या चांदीचे दागिने व रोकड लंपास केली आहे. याप्रकरणी कुंदन दगडू देसले यांच्या फिर्यादीवरून…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  अजिंठा चौफुलीवर दुचाकीस्वाराला ट्रकने चिरडल्याची घटना शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. अपघात झाल्यानंतर चौफुलीवर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. नगिन सकरू राठोड (३८) रा. एमआयडीसी) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव असून, उदय गजाजन राठोड (४०, रा. एमआयडीसी) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एमआयडीसी भागात राहणारे नगिन राठोड आणि उदय राठोड हे दोघे जण शनिवारी दुचाकीने सुनसगाव येथे बांधकाच्या कामासाठी गेले होते. रात्री ते काम संपवून घराकडे निघाले होते. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ते अजिंठा चौफुली येथून जात असताना, त्यांच्या दुचाकीला ट्रकने (क्र. एमएच ४०, बीजी ८९१५) जोरदार धडक दिली. यात…

Read More

पारोळा : प्रतिनिधी  ३१ डिसेंबर काही दिवसावर येवून ठेपली आहे सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात मद्यप्रेमी मद्य पचवीत निरोप देत असतात यामध्ये दरम्यान जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मद्य विकले जाते, त्या अनुशगाने हि कारवाई केली गेल्याचे बोलले जात आहे. येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील सत्यनारायण मंदिरासमोर एका गोदामात बनावट देशी दारूचा कारखाना गुप्त माहितीवरून नाशिक दारूबंदी उपायुक्त यांनी छापा टाकून लाखो रुपयाची दारूसह तीन ट्रक, कच्च्या माल यासह 22 जणांना अटक करण्यात आली आहे. याबाबत पारोळा शहरासह तालुक्यात एकच खळबळ माजली असून बनावट दारू बनवण्यात पारोळा तालुका हा अग्रेसर असून यापूर्वीही असे अनेक कारखाने दारूबंदी विभागाने उघड केले आहेत. हि…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  ३१ डिसेंबर रोजी होणाऱ्या मोठ मोठ्या पार्टीच्या अनुषंगाने राज्यातील विविध ठिकाणी आता बनावट दारू विक्री करणारे व दारू तयार करणारे यांच्यावर राज्य उत्पादन विभागाचे बारीक लक्ष असून आता जिल्ह्यात नाशिक विभागाच्या राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यानी मोठी कारवाई केल्याची बातमी समोर आली आहे. या प्रकरणी पुढील कार्यवाही सुरु असल्याची खात्रीलायक वृत्त आहे. मिळालेली माहिती अशी कि, पारोळा शहरातील धुळे रस्त्यावर नाशिक येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने एका ठिकाणी सुरु असलेले बनावट देशी दारूच्या १ हजार पेट्या जप्त केल्या असून याबाबत पुढील कार्यवाही सुरु असल्याचे वृत्त आहे. जळगाव जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यानी संपर्क केला असता तो होवू…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  सब टीव्हीच्या दास्तान-ए-काबुल या मालिकेत मुख्य भूमिकेत असलेली 20 वर्षीय टीव्ही अभिनेत्री टुनिशा शर्माने मालिकेच्या सेटवरच आपली जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तिने एवढं टोकाचं पाऊल का उचललं, हे अद्याप कळू शकलेलं नाही. https://twitter.com/ANI/status/1606634922860777472?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1606634922860777472%7Ctwgr%5E4d71919d696048336622424e2441228795292036%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.esakal.com%2Fmanoranjan%2Fali-baba-dastaan-e-kabul-lead-actor-tunisha-sharma-dies-by-suicide-hangs-herself-in-makeup-room-snk89 मीडिया रिपोर्ट्समधून समोर येत असलेल्या बातम्यांनुसार, टुनिशाने शोच्या सेटवरच हे पाऊल उचलले. तिने शोच्या मुख्य अभिनेत्याच्या मेकअप रूममध्ये गळफास घेऊन आपले जीवन संपवले. तिचा फासावर लटकलेला मृतदेह कोणीतरी पाहिल्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. जिथे तिला मृत घोषित करण्यात आले. टुनिशाने एवढं मोठं पाऊल उचलण्यामागचं कारण काय असेल, याबाबत सध्या कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र सेटवर असे पाऊल उचलल्याने सगळ्यांनाच धक्का बसला…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था  राज्यात प्रेम संबधी जे गुन्हे घडत आहे, त्यातून असे काही कारण समोर येत आहे कि खुद्द पोलीस सुद्धा थक्क होत आहे. अशी एक घटना नाशिक जिल्ह्यात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रेयसीच्या नवऱ्याला प्रियकर व प्रेयसीने संगनमत करून मानसिक त्रास दिल्याने नवऱ्याने टोकाचे पाऊल उचलले आहे. त्यानंतर प्रियकर व प्रेयसीवर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात मंगळवारी राकेश उर्फ राधेशाम टिकमदास वैष्णव-बैरागी यांची बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी केली होती. त्यामध्ये पोलीसांनी गुन्हा नोंद करून घेतला होता. मात्र दोन दिवस उलटल्यावर गंगापूर पोलीसांना बापू पुलाजवळ एक मृतदेह पाण्यात तरंगतांना आढळून आला होता,…

Read More