Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी  एका परिसरातील रहिवासी असलेल्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना शहरात घडले या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी की, जळगावातील  एका परिसरात आपल्या परिवारासह वास्तव्यास असलेल्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी दिनांक 25 नोव्हेंबर रोजी पासून ते आतापर्यंत नेहमी शाळेत जाताना संशयित आरोपी सादखान आयुब खान (वय १९) त्या मुलीचा पाठलाग करून अश्लील इशारे करून व तिच्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी संशयित आरोपी विरोधात जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या असून पुढील तपास एपीआय रविंद्र बागुल हे करीत आहे.

Read More

अमळनेर : प्रतिनिधी  शहरातील एका परिसरातून अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरवर अमळनेर पोलिसांनी कारवाई करीत मंगळवारी दुपारी तीन वाजता ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर वृत्त असे कि, राजाराम नगर परीसरातून विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरमधून वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने २७ डिसेंबर मंगळवार रोजी दुपारच्या सुमारास कारवाई करत वाळूचे ट्रॅक्टर पकडले. ट्रॅक्टर चालकाला वाळू वाहतुकीचा परवाना विचारला असता त्याने उडवा उडवीची उत्तर दिले. तसेच ट्रॅक्टरमधील वाळू खाली करून ट्रॅक्टर घेऊन पसार झाला. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात पोलीस नाईक योगेश पाटील यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक दीपक गणेश…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे यांनी आपल्या वेगळा गट स्थापन करून राज्यात सत्ता स्थापन केली त्यानंतर शिवसेना हि आमचीच म्हणत त्यांना बाळासाहेबांची शिवसेना असे नाव मिळाले व त्यानंतर त्यांनी आता राज्यभरात आपले जाळे तयार करीत असतांना जळगाव जिल्ह्यातील रखडलेली कार्यकारिणी जाहीर केली आहे. यामध्ये शहरातील विविध आंदोलनात आक्रमक चेहरा असलेले निलेश पाटील यांना जिल्हाध्यक्षपदी तर सरिता माळी-कोल्हे यांना महिला जिल्हाप्रमुखपदी नियुक्त केले आहे. सविस्तर वृत्त असे की, राज्यात शिंदे गटाने सत्तास्थापन झाल्यापासून जळगाव जिल्ह्यात शिंदे गटाच्या माध्यमातून राजकीय व सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. प्रतिक्षेत असलेली जळगाव जिल्ह्याची कार्यकारिणी आज दि.28 रोजी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिव…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी  रेशनकार्डावर धान्य मिळत नसल्याची तक्रार घेऊन कल्पना चंदू पारधी नामक महिला तहसीलदार धरणगाव नितीनकुमार देवरे यांच्या केबिन मध्ये आली असता रेशनकार्डावर दुकानदार धान्य देत नसल्याची बाब तहसीलदार यांच्या निदर्शनास आणून देताना सदर महिला अश्रू ढाळू लागली असता तहसीलदार यांनी तात्काळ पुरवठा निरीक्षक शेख यांना सूचना देत ऑनलाईन कार्ड झाले आहे का? अशी विचारणा केली.सदर कार्ड ऑनलाइन नसल्याने धान्य मिळत नसल्याची बाब श्री शेख यांनी सांगितली. सदर कार्ड तात्काळ ऑनलाइन करून यांचे दर महिन्याचे रेशन सुरू करा असा आदेशवजा सूचना तहसीलदार देवरे यांनी पुरवठा निरीक्षक यांना देऊ केल्या. तसेच तहसिल कार्यालयातर्फे गरजुना देण्यात येणारे एका महिन्याचा किराणा उदरनिर्वाह…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  सध्याच्या काळात सोशल मीडियावरील व्यक्त होण्याचा महत्त्वाचा सोर्स असलेलं ट्विटर ढेपाळलं आहे. आज सकाळीच ट्विटर डाऊन झालं. लॉग इनही करता येत नव्हतं आणि मेसेजही पोस्ट करता येत नव्हता. त्यामुळे जगभरातील ट्विटर यूजर्स त्रस्त झाले आहेत. शिवाय ट्विटरकडून कोणतंही कारण न देण्यात आल्याने यूजर्स अधिकच त्रस्त झाले आहेत. ट्विटर कधी सुरू होणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे. दोन महिन्यांपूर्वीच एलन मस्क यांनी ट्विटरची खरेदी केली होती. 44 बिलियन डॉलरला ही खरेदी करण्यात आली होती. तेव्हापासून एलन मस्क सातत्याने ट्विटर पॉलिसी बदलत आहेत. त्यामुळे ते अधिक चर्चेत आहेत. आज सकाळी 7 वाजून 13 मिनिटांपासून ट्विटर ढेपाळलं आहे. त्यामुळे…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  महाविकास आघाडी सरकाच्या काळात शंभर कोटींच्या खंडणीप्रकरणी मुंबईच्या मध्यवर्ती कारागृहात असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची अखेर आज जामिनावर सुटका झाली. सुमारे १४ महिन्यानंतर त्यांची सुटका झाली आहे. त्यामुळं त्यांच्या स्वागतासाठी तुरुंगाबाहेर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली असून त्यांचं जल्लोषात स्वागत केलं आहे. कोर्टाची ऑर्डर तुरुंगाधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर त्याची संपूर्ण पुर्तता पार पडल्यानंतर संध्याकाळी पाच वाजता अनिल देशमुख ऑर्थर रोड तुरुंगातून बाहेर आले. एक वर्ष १ महिना आणि २७ दिवस त्यांना तुरुंगात रहावं लागल. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामिनास आणखी स्थगिती देण्याची सीबीआयची विनंती मुंबई हायकोर्टाने मंगळवारी फेटाळली. त्यामुळे देशमुख…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  अभिनेत्री दीपाली सय्यद वारंवार त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात परंतु यावेळी त्यांच्यावर थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जीवे मारण्याचा कट रचल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अभिनेत्री दीपाली सय्यद यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी सय्यद यांच्यावर हे गंभीर आरोप केले आहेत. पत्रकार परिषद घेत त्यांनी हे आरोप केले आहेत. त्याचबरोबर दीपाली सय्यद ट्रस्टतर्फे होणारे व्यवहार चुकीचे आहेत असेही त्यांनी म्हटले आहे. शिंदे यांनी केलेल्या गंभीर आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र, दीपाली सय्यद यांनी त्यांच्यावर केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. तर भाऊसाहेब शिंदे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी ट्रस्टच्या माध्यमातून राज्यपालांच्या…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था  राज्यातील गुन्हेगारी दिवसेदिवस वाढत चालली असून नाशिक येथे छोट्या मोठ्या कारणावरून गुन्हे घडत आहे. नुकतीच एका धक्कादायक घटना घडली आहे. नर्स मैत्रिणीला महिला डॉक्टरने रागावल्याच्या कारणावरुन त्याच रुग्णालयातील वॉर्डबॉयने महिला डॉक्टरवर जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणाचा व्हिडिओ आज समोर आला आहे. याप्रकरणी वॉर्डबॉयवर गुन्हा दाखल करण्यात आली असून त्याला अटक करण्यात आली आहे. नाशिकच्या निम्स् हॉस्पिटल येथे काम करणाऱ्या संशयित अनिकेत डोंगरे नावाच्या वाॅर्ड बाॅयने कात्रीने वार केले. निमसे हॉस्पिटलमध्ये झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात धरून दवाखान्यातील कात्रीने डॉ. आव्हाड यांच्या मानेवर उजव्या बाजुस व पोटावर वार केले. यामुळे डॉ. आव्हाड जखमी झाल्या आहेत.त्यांची प्रकृती सध्या स्थिर…

Read More

अहमदाबाद : वृत्तसंस्था  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. हिराबेन यांना मंगळवारी रात्री अहमदाबादमधील यू. एन. मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले. हिराबेन यांना नियमित तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आल्याचे प्राथमिक वृत्त आहे. गुजरात निवडणुकीच्या मतदानादरम्यान ४ डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदींनी त्यांच्या मातोश्री हिराबेन यांची गांधीनगरमध्ये भेट घेतली. यावेळी त्यांनी आईच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतले आणि त्यांच्यासोबत बसून चहा प्यायला. गुजरात निवडणुकीपूर्वी १८ जून रोजी मोदींनी त्यांच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आईची भेट घेतली होती.

Read More

पुणे : वृत्तसंस्था  पुण्यातील एका परिसरात एका महिलेने व तरुणाने एकाच घरात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ३२ वर्षीय बरखा मंडल आणि 31 वर्षीय राजू फारुख शेख अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही. कात्रज परिसरात ही घडना घडली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बरखा मंडल आणि राजू फारुख शेख या दोघांनीही एकाच घरात आत्महत्या केली आहे. दोघांच्याही आत्महत्येचं कारण समजू शकलं नाही आहे. बरखा आणि राजू यांची बुधवार पेठेतील वेश्या वस्तीत ओळख झाली होती. दोघांनीही चार दिवसांपूर्वीच कात्रज परिसरात भाड्याने रुम घेतली होती. त्यामुळे घरासंदर्भात कोणतंही अग्रीमेंट करण्यात…

Read More