गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर एक विचित्र व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवणं कठीण जातं. आता असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये प्रेयसीच्या लग्नाला आलेल्या प्रियकराने असं काही केलं की तिथे बसलेला नवरदेवही स्तब्ध झाला. आपले काम करून प्रियकर तिथून चालत गेला. https://www.instagram.com/p/Cm5zXGzhzUT/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये वधू-वर स्टेजवर बसले आहेत. त्यांच्याकडे पाहून त्या दोघांचाही विधी पूर्ण झाला आहे, असे वाटते. लोक आळीपाळीने त्यांना आशीर्वाद देत आहेत. इतक्यात नववधूचा कथित प्रियकर मफलर बांधून स्टेजवर येतो. तो खिशातून सिंदूरने भरलेला डबा बाहेर काढतो आणि वधूला तो सिंदूर लावायला जातो. त्याला असे करताना पाहून नवरी सुरुवातीला…
Author: editor desk
अमळनेर : प्रतिनिधी येथील खा. शि.मंडळाच्या प्रताप महाविद्यालयातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना (ज्युक्टो) तर्फे प्रभारी प्राचार्य पदी प्रा.डाॅ. एम.एस.वाघ नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार समारंभाचा कार्यक्रम दि.२ जानेवारी रोजी सकाळी ११:०० वाजता स्टाफ कॉमन रूम मध्ये आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाच्यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य-प्रा.उल्हास मोरे, प्रा.आर.एम.पारधी, प्रा.ए.के.अग्रवाल, प्रा.डी.व्हि. भलकार प्रा. सी.बी. सूर्यवंशी, संघटनेचे जिल्हाकार्याध्यक्ष प्रा.सुनिल पाटील व संघटनेचे अध्यक्ष प्रा.दिनेश बोरसे, प्रा.किरण पाटील, प्रा.जी.एल. धनगर, प्रा.विलास पाटील, प्रा.सी.आर. पाटील, प्रा. आर.एस. महाजन, प्रा.पी.एम. तायडे, प्रा.एम.एन. भामरे, प्रा. लांडगे व सर्व कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक बंधु- भगिनी उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन प्रा.आर.एम. पारधी यांनी केले तसेच आभार प्रदर्शन प्रा. सी.बी. सुर्यवंशी यांनी केले.
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात दोन दिवसापासून भाजप नेत्या चित्रा वाघ व अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यामध्ये कपड्यांवरुन वाद सुरु आहे. यानंतर पुणे येथे एका पक्षाच्या नेत्याने उर्फीविरोधात तक्रार सुद्धा दिली आहे. आता या वादात आता शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी उडी घेतली आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांचा स्विमिंगपूलमधील फोटो शेअर केला आहे. आणि भली मोठी पोस्ट लिहिली आहे. https://www.facebook.com/andhare.sushama/posts/5929303393757081 नंगटपणा हा कपड्यांपेक्षा विचार आणि भाषेमध्ये जास्त असतो. प्रसिद्धझोतात, चर्चेत राहण्या साठी जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्न सोडून किती भरकट जाल. असा सवाल अंधारे यांनी उपस्थिती केला आहे.“अंग प्रदर्शन चूक की बरोबर या मुद्द्यावर नंतर…
मुक्ताईनगर : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे दिनांक एक जानेवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास देवीच्या मंदिरात जाऊन येते असे सांगून घरून गेल्यावर घरी परत न आल्याने अल्पवयीन मुलीच्या आईने पोलिसात धाव घेत कुणीतरी खुश लावून पळून नेला प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोहे का विनोद श्रीनाथ हे करीत आहे.
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करीत सोने-चांदीचे दागिने मागितल्या प्रकरणी एका विरोधात जामनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, तालुक्यातील एका गावातील सतरा वर्षीय अल्पवयीन अल्पवयीन मुलगी वास्तव्यास आहे. दिनांक 15 डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास अल्पवयीन मुलीला संशयित आरोपीने त्याच्या राहत्या घरी बोलवून एकांताचा फायदा घेत तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिच्या आईचे दागिने मला आणून दे अन्यथा तुझे फोटो व्हायरल करेल तसेच तुझ्या भावास जीवे मारून टाकेल अशी संशयित आरोपी नितेश शंकर राठोड याने धमकी दिली या प्रकरणी २ जानेवारी रोजी जामनेर पोलीस स्थानकात विनयभंगाचा गुन्हा दाखल…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरात राहणाऱ्या २२ वर्षे विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी की, शहरातील दूध फेडरेशन परिसरातील महावीर नगरातील २२ वर्षीय विवाहिता सुकेशनी रोहिणी मेंढे हिच्या माहेरच्यांनी आपल्या पतीला व सासूला हुंडा न दिल्याच्य कारणावरून तिला शिवीगाळ व मारहाण करीत मानसिक त्रास देऊन तिने घराच्या बाथरूम मधील लायझर नावाचे टॉयलेट क्लीनर पिल्याने ती गंभीर होवून विवाहिता उपचारार्थ शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. यावेळी विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार सासू आशाबाई मिलिंद मेंढे व पती रोहित मिलिंद मेंढे दोन्ही राहणार महावीर नगर जळगाव यांच्या विरोधात स्त्री अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला…
जळगाव : प्रतिनिधी बेकायदा गावठी पिस्टल बाळगणा-या तरुणास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोपडा येथून अटक केली आहे. अजित गुजर बारेला (रा. रंगराव आबा नगर मल्हारपुरा चोपडा) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून |तिस हजार रुपये किमतीचे एक गावठी पिस्टल, एक हजार रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील हे.कॉ. संदिप पाटील, गोरख बागुल, पो.ना. प्रविण मांडोळे, परेश महाजन आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना समजलेल्या माहितीच्या आधारे चोपडा शहरातील भाऊ हॉटेल परिसरातून अजित बारेला यास गावठी पिस्टल आणि जिवंत काडतुसासह…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात गेल्या काही दिवसाआधी ट्विटर काही काळ बंद पडलेले होते. त्यानंतर नेटकऱ्यानी सोशल मिडीयावर एलॉन मस्क यांना ट्रोल केले जात होते. तर नुकतेच मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने देशात 45 हजार 589 ट्विटर खात्यांवर बंदी घातली आहे. यामध्ये मुलांचे लैंगिक शोषण, नग्नता आणि संबंधित पोस्ट केल्या जात असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. तसेच ही खाती 26 ऑगस्ट ते 25 सप्टेंबर दरम्यान बंद करण्यात आली आहेत. ट्विटरने दहशतवादाचे समर्थन करणाऱ्या 3035 खात्यांवरही कारवाई केली आहे. ट्विटरने भारतात एकूण 48 हजार 624 खात्यांवर बंदी घातली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवणाऱ्या आणि भावना भडकवणाऱ्या पोस्टला आळा बसावा, या करता ट्विटरने हा…
पुणे : वृत्तसंस्था पुण्यातील पाषाण परिसरात १०० रूपयांसाठी चार जणांनी विद्यार्थ्याचा हात मनगटापासून कापला आहे. या घटनेप्रकरणी 2 जणांना अटक केली असून 2 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या हल्ल्यात पंकज तांबोळी जखमी असून आशुतोष माने (24) यांनी पोलिसांकडे याबाबत फिर्याद दिली आहे. प्रणव काशिनाथ वाघमारे (18) आणि गौरव गौतम मानवतकर (20) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आशुतोष माने हे त्यांचे मित्र अभिजित सानमुटे, साजिद शेख, स्वप्निल पाटील, मिहीर देशपांडे हे पाषाण परिसरात राहायला आहेत. 31 डिसेंबर रोजी मेस बंद असल्यामुळे माने, साजीद शेख, पंकज तांबोळी हे तिघेजण रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास साई चौकात आले.…
मुंबई : वृत्तसंस्था कुठलाही विषय नसताना अजितदादा छत्रपती संभाजी महाराजांवर का बोलले? याला मुद्दाम समाजातील वातावरण गढूळ करणे म्हणतात. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आहे. त्यांना मी मागणी करणार आहे की, औरंगाबादचे नाव आता धर्मवीर संभाजीनगर करा. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्यावर टीका करताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षक होते. ते धर्मवीर नव्हते, असं विधान राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं होत. त्यावरून त्यांच्यावर सर्वबाजूने टीका होत आहे. अजित पवार यांनी माफी मागावी अन्यथा आंदोलन करू असा इशारा भाजपच्या अध्यात्मिक आघाडीने दिला आहे. राष्ट्रवादीकडून अजित पवारांची पाठराखण केली जात आहे. भाजप…

