मुंबई : वृत्तसंस्था शिंदे गटाचे फायरब्रँड नेते शहाजीबापू पाटील यांची 24 डिसेंबरपासून विरोधकांच्या टीकेवर शहाजीबापूंची कुठलीही प्रतिक्रिया समोर आलेली नव्हती. यापाठीमागे काय होते कारण तर ते बंगळुरू येथील हॅपिनेस कार्यक्रमात पंचकर्म उपचार घेतल्यानंतर यांनी तब्बल ९ किलो वजन कमी केले आहे.ते पुन्हा एकदा नव्या जोमाने विरोधकांना उत्तर देण्यासाठी तयार आहेत. 24 डिसेंबरपासून शहाजीबापू त्यांचे मित्र महेश पाटील यांच्यासोबत बंगळुरू येथील श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात पंचकर्म आणि सुदर्शन क्रिया करण्यासाठी गेले होते. त्यामुळे गेले 8 दिवस विरोधकांवर धडाडणारी ही तोफ शांत होती. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनासाठी गेलेले बापू दोन दिवसानंतर गायब झाले होते. यावेळी सांगोल्यात आलेल्या शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी…
Author: editor desk
धरणगाव : प्रतिनिधी जळगाव ग्रामीण मतदार संघात शिंदे गटाचा नियमित बोलबाला सुरूच आहे, नियमित विविध पक्षाचे कार्यकर्ते पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिंदे गटात प्रवेश करीत आहेत. धरणगाव येथील रवींद्र कडरे व संजय पवार यांनी आज दि.२ रोजी बाळासाहेबांची शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश केला. या प्रसंगी त्यांच्या पाळधी येथे सत्कार केला. सत्कार प्रसंगी उपजिल्हा प्रमुख पी.एम.पाटील सर, गटनेते पप्पू भावे, नगरसेवक विलास महाजन ,मच्छिंद्र पाटील, वाल्मीक पाटील,प्रशांत देशमुख,बोरगावचे सरपंच दिनकर पाटील,चेतन पाटील,भैया पाटील, जि.प.सदस गोपाल चौधरी आदी उपस्थित होते. यांच्या निवडीबद्दल जिल्हा प्रमुख निलेश पाटील, मागासवर्गीय जिल्हा प्रमुख…
मुंबई : वृत्तसंस्था मोदी सरकारच्या या नव्या ‘अर्थशास्त्रा’मुळे 2022 हे पूर्ण वर्ष सामान्य माणूस महागाईच्या वरवंटय़ाखाली चिरडला गेला. आता 1 जानेवारी 2023 पासून व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत 25 रुपयांनी वाढ होणार असल्याने महागाईचा हा वरवंटा आणखी जोरात फिरणार आहे. महागाई हा जनतेचा सर्वाधिक जिव्हाळय़ाचा विषय, पण मोदी सरकारने 2022 मध्ये त्याकडे साफ दुर्लक्ष केले. महागाईवर आपल्या सरकारची ‘करडी नजर’ आहे, असे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी संसदेत सांगितले खरे, परंतु या करडय़ा नजरेला ‘महंगाई डायन’ गेल्या वर्षभरात अजिबात घाबरली नाही. नवीन वर्षातही त्यापेक्षा वेगळे घडेल असे दिसत नाही. नव्या वर्षात देखील सिलिंडर भाववाढीवरुन केंद्र सरकारवर शिवसेसेनेकडून जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. वर्ष बदलले मात्र…
मुंबई : वृत्तसंस्था सत्ताधारी पक्षाच्या ६० आमदारांचा दरमहा खर्च हा १२ कोटी असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार यांनी ट्विट करत याबाबत आपली भूमिका मांडली आहे. राज्यातील 60 आमदारांच्या सुरक्षेवर वर्षाला 144 कोटी रुपये खर्च केले जात असल्याचं रोहित पवार यांनी म्हंटलं आहे. https://twitter.com/RRPSpeaks/status/1609530010385387526?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1609530010385387526%7Ctwgr%5Eafce71704b1efd7d6d33abcab8b9547cfb577cc6%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.esakal.com%2Fmaharashtra%2Frohit-pawars-shocking-claim-that-144-crore-was-spent-on-the-security-of-60-mlas-in-maharashtra-ask97 अधिवेशनाच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर रोहित पवार यांनी सत्ताधारी आमदारांच्या खर्चाचा आढावा ट्वीटद्वारे मांडला आहे. याचा एक व्हिडिओ त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. आमदार रोहित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा विधानसभेतील भाषणाचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडीओत…
धरणगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात बाळासाहेबांची शिवसेनेचे (शिंदे गटाची) पक्षाचे संघटन करण्यासाठी आता जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पसंख्यांक कार्यकारणी हि जाहीर करण्यात आली. धरणगाव तालुक्यातील कल्याणे खुर्द येथे शिंदे गटाची अल्पसंख्यांक कार्यकारणी जाहीर करण्यात आली त्यामध्ये तालुकाप्रमुखपदी मो.सलीम मो. इसाक, उपतालुका प्रमुख एजाज भाई कुरेशी, शहरप्रमुख मुस्ताक बेलदार, उपशहरप्रमुख नसीर मोमीन, उपशहर प्रमुख फाकरुद्दिन कबिरुद्दिन मोमीन, उपशहर प्रमुख आसिफ बागवान यांची निवड करण्यात आली यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश देखील शिंदे गटात करण्यात आला. यावेळी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील उपस्थित होते. यावेळी मो. सलीम शेख इसाक, फखरुद्दीन कबीर मोमीन,…
औरंगाबाद : वृत्तसंस्था हिवाळी अधिवेशनात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिंदे व फडणवीस सरकार मधील मंत्र्यांवर आरोप – प्रत्यारोप केल्यानंतर आता शिंदे सरकार मधील मंत्री अब्दुल सत्तारांच्या अडचणीत वाढ होणार आहे. सत्तार सातत्याने वादग्रस्त विधान करत आहेत. त्यातच शिक्षकभरती घोटाळा आणि कृषीप्रदर्शनाचा वाद समोर आला आहे. आता सत्तार यांची थेट सीबीआयकडे तक्रार करण्यात आली आहे. औरंगाबादमधील सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्ली यांच्यासह पाच जणांनी सीबीआयकडे सत्तार यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी सीबीआयकडे केली आहे. तसेच सत्तार यांनी जमीन बळकावल्याचा आऱोपही करण्यात आला आहे. महेश शंकरपल्ली यांनी म्हटलं की, माझ्या तालुक्यातील ज्या लोकांच्या जमिनी सत्तार यांनी बळकावल्या, त्या लोकानी माझ्यासोबत येऊन सीबाआयकडे तक्रार केली…
जळगाव : प्रतिनिधी जय गजानन सत्संग जळगांव आयोजित जळगाव ते शेगांव पदयात्रा (पायी दिंडी) सोहळा पालखीसह दिनांक १ जानेवारी २०२३ ते ६ जानेवारी २०२३ पर्यंत सर्व गजानन भक्त व जळगावकराना कळवताना आनंद होतो की, पालखी सोहळ्याचे वर्ष १२ वे वर्षा नविन सामाजिक उपक्रम घेऊन पालखी निघते.. प्रत्येक वर्षाच्या पहिल्या रविवारी पालखी शेगांव प्रस्थान करते. जवळ-जवळ 200 भाविक पालखी सोहळ्यात सहभागी होतात ते समाजा प्रति काही देणे लगते फक्त पायी चालता प्रत्येक गांवात स्वच्छता अभियान, झाडे लावा झाडे जगवा मिशन, बेटी बचाव बेटी पढाव नारा दिला जातो तर आरोग्याविषयी माहीती चांगले सुविचार संदेश देत पुढे नशिराबाद, बोदवड, मलकापूर मार्ग नादुरा खामगांव…
मुंबई : वृत्तसंस्था महाविकास आघाडी सरकारमधील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. नुकतेच भाजप नेते किरीट सोमय्या रेवदंडा पोलीस ठाण्यात पोहोचले आहेत. १९ बंगल्यांच्या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या रश्मी ठाकरे यांच्या विरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. रश्मी उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यात जमिनीचे व्यवहार झाले आहेत. रश्मी ठाकरे यांच्या नावावर कोकणात 19 बंगले होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेचा गैरवापर करत रश्मी ठाकरे यांचे नाव त्या व्यवहारातून कमी केले. त्या विरोधात आज आम्ही रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार…
पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात शेतात कामासाठी गेलेल्या ३५ वर्षीय महिलेचा एकाने विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पाचोरा पोलीस स्थानकात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, पाचोरा तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेल्या ३५ वर्षीय महिला एका शेतात जात असताना संशयित आरोपी समाधान नाना चित्ते याने त्या महिलेचा वाईट उद्देशाने पाठलाग करून त्या महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न केल्याबद्द्ल महिलेने पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास सफौ ज्ञानेश्वर यशवंत पाटील हे करत आहे.
जळगाव : प्रतिनिधी शहरातील फुले मार्केट परिसरातून तरुणाची दुचाकी लंपास झाल्याची घटना घडली आहे या प्रकरणी जळगाव शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी की एरंडोल तालुक्यातील टाकरखेडा गावातील रहिवासी जितेंद्र सुरेश पाटील वय 22 हे दिनांक 30 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील फुले मार्केट परिसरात आपल्या कामानिमित्त आले असता त्यांनी एका ठिकाणी दुचाकी लावून तेथून ती अनोळखी चोरट्यांनी लंबास केल्याची घटना घडली आहे याप्रकरणी त्यांनी जळगाव शहर पोलीस स्थानकात अनोळखी चोरटे विरोधात गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोना. किशोर निकम हे करीत आहे

