Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शुल्लक कारणाने चौघांनी तरुणाचा हात कापला; दोन ताब्यात
    क्राईम

    शुल्लक कारणाने चौघांनी तरुणाचा हात कापला; दोन ताब्यात

    editor deskBy editor deskJanuary 2, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे : वृत्तसंस्था 

    पुण्यातील पाषाण परिसरात १०० रूपयांसाठी चार जणांनी विद्यार्थ्याचा हात मनगटापासून कापला आहे. या घटनेप्रकरणी 2 जणांना अटक केली असून 2 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या हल्ल्यात पंकज तांबोळी जखमी असून आशुतोष माने (24) यांनी पोलिसांकडे याबाबत फिर्याद दिली आहे. प्रणव काशिनाथ वाघमारे (18) आणि गौरव गौतम मानवतकर (20) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आशुतोष माने हे त्यांचे मित्र अभिजित सानमुटे, साजिद शेख, स्वप्निल पाटील, मिहीर देशपांडे हे पाषाण परिसरात राहायला आहेत. 31 डिसेंबर रोजी मेस बंद असल्यामुळे माने, साजीद शेख, पंकज तांबोळी हे तिघेजण रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास साई चौकात आले. तेथे पंकजचा मित्र मयुर फुंदे हा देखील जेवण करण्यासाठी आला होता. सर्वांनी हर्षदा या हॉटेलमध्ये जेवण केले. दरम्यान, त्या ठिकाणी मोटारसायकलवरून 2 मुले आली आणि त्यांनी मयुर व पंकज यांच्याकडे 100 रूपयांची मागणी केली

    मात्र, पंकजने पैसे नसल्याचे सांगितले. या मुलांनी आणखी दोन जणांना तिथे बोलवून पंकजला शिवीगाळ केली आणि त्याच्या डाव्या हातावर धारदार हत्याराने वार केले. काही क्षणातच पंकजचा डावा हात मनगटापासून निखळून पडला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंकजला रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली असून इतर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ज्याला लेकरासारखं प्रेम दिलं, त्याच भाच्याने मावशीचा जीव घेतला! ४० दिवसांनी समोर आलं काळीज पिळवटणारं सत्य”

    September 13, 2026

    कर्की फाट्यावर अपूर्ण पुलामुळे सर्व्हिस रोडवर खड्ड्यांचे साम्राज्य; गणेशमूर्ती नेताना भक्तांना तारेवरची कसरत !

    September 13, 2026

    रिचार्ज अपडेट करताना बँक खात्यावर डल्ला; वृद्धाचे तब्बल १० लाख लंपास

    September 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.