जळगाव : प्रतिनिधी शहरातील मुख्य चौकातून एका वृद्ध व्यक्तीचा मोबाईल लांबवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शहर पोलीसात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील आनंदनगर मोहाडी रोड परिसरातील रहिवासी कन्हैयालाल मेघराज कृपलानी (वय ७३) हे दिनांक 31 डिसेंबरच्या दुपारच्या सुमारास शहरातील साने गुरुजी चौकातील प्रकाश मेडिकल जवळ या ठिकाणी काही कामानिमित्त आले असता अनोळखी इसमाने त्यांच्या पंधरा हजार रुपये किमतीचा मोबाईल लंपास केल्याचे घटना घडली आहे याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना. गजानन बडगुजर हे करीत आहे.
Author: editor desk
भुसावळ : प्रतिनिधी अल्पवयीन मुलीशी लग्न करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी साठ वर्षीय आरोपीविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मिळालेली माहिती अशी कि, फेब्रुवारी २०१२ रोजी एका अल्पवयीन मुलीशी लग्न केले होते. यानंतर ती गर्भवती राहिली होती. याबाबत जळगावच्या बालकल्याण समितीकडे तक्रार करण्यात आली होती. अमजद इब्राहिम कुरेशी (६०, रा. आगाखान वाडा) असे या आरोपीचे नाव आहे. या मुलीस बालकल्याण समितीने ताब्यात घेऊन जबाब घेतला. त्यानुसार बाजारपेठ पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यासाठी कागदपत्र वर्ग करण्यात आली होती. याप्रकरणी आरोपीविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास एपीआय हरीश भोये, योगेश महाजन हे करीत आहेत.
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंतचा शुक्रवारी कार अपघात तो जखमी झाला होता तर अपघात इतका भीषण होता कि चारचाकी जागेवर जळून खाक झाली आहे. तर त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्याच्या अपघाताचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. दरम्यान, त्याच्या अपघाताचा खरं कारण समोर आलं आहे. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनची एक टीमही पंतला भेटण्यासाठी पोहोचली आहे. दरम्यान, ऋषभ पंतने डीडीसीएचे संचालक श्याम शर्मा यांची भेट घेऊन नवा खुलासा केला आहे. श्याम शर्मा यांनी ही माहिती एजन्सीला दिली आहे. श्याम शर्मा यांनी ऋषभ पंतची भेट घेतली तेव्हा त्याची प्रकृती जाणून घेतली, अपघात कसा…
धरणगाव : प्रतिनिधी जगभर नव्या वर्षाच्या स्वागतासाठी जल्लोष केला जात आहे तर दुसरीकडे धरणगाव शहरात एका ३० वर्षीय तरुणाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका शुल्लक कारणाने हा खून झाल्याची चर्चा जरी असली तरी धरणगाव पोलिसांनी मध्यरात्रीच या प्रकरणी १७ संशयिताना ताब्यात घेतले आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील कृष्णा जिनिंगमध्ये ३१ डिसेंबर रोजी रात्री शुल्लक कारणावरून एका ३० वर्षीय तरुणाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. या वादात शिरपूर तालुक्यातील दहीवड तांडा येथील ३० वर्षीय तरूण कालू सोनवणे हा मयत झाला आहे. कृष्णा जिनिंगमध्ये जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून मजूर काम करण्यासाठी येत असतात.…
हळदीच्या दुधाचे फायदे तर आपल्या सर्वांनाच माहीत आहेत, पण तुम्ही कधी हळदीची कॉफी प्यायली आहे का ? काय, हे नाव वाचून आश्चर्य वाटलं ना ? आपल्यापैकी बहुतांश लोकांना कॉफी प्यायला आवडते. बरेच लोक दिवसाची सुरुवातच एक कप कॉफीने करतात. मात्र तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने किंवा कॉफीच्या अतिसेवनाने आरोग्याचे नुकसान होऊ शकते. त्यामधील कॅफेन हे शरीरासाठी फार फायदेशीर नसते. तुम्हीही कॉफीचे शौकीन असाल आणि तुम्हाला हेल्दी हेल्दी कॉफी प्यायची असेल तर तुम्ही त्यामध्ये हळद घालू शकता. रिपोर्ट्सनुसार हळदीच्या कॉफीचे काही दुष्परिणाम नसतात, उलट ती आरोग्यासाठी फायदेशीर असते. त्याचे काय फायदे आहेत व ती कशी तयार करतात हे जाणून घेऊया.…
बीड : वृत्तसंस्था उद्यापासून नवीन वर्षाला आपण सर्वच लोक काहीना काही संकल्प करीत असतो असेच संकल्प राजकीय जीवनात अनेक नेते मंडळी करीत असतात. यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस हि मागे नाहीत. बीड येथील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले, एका व्यक्तीनं व्यसनमुक्तीची मोठी रॅली नि मोठा कार्यक्रम करायचा आहे, असं मला सांगितलं.अलीकडच्या काळात नवीन वर्ष साजरं करण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात दारु आणि इतर व्यसनांची पार्टी केली जाते. युवा पिढीवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. दारु पिऊन लोकं भांडण करतात. अपघात होतात. चरस, गांजा ओढण्याचा प्रयत्न केला जातो. अशा सगळ्या लोकांना व्यसनापासून दूर करायचं आहे, असा त्या व्यक्तीचा संकल्प होता.…
मुंबई : वृतसंस्था भाजप व मनसेत गेल्या काही दिवसापासून चांगलीच जवळीक वाढलीचे चित्र नियमित दिसून येत आहे. काही नेत्यांनी राज ठाकरे यांच्या घरी जात भेट घेतली तर आज नुकतीच केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या दादरमधील शिवतीर्थ या निवासस्थानी ही भेट झाली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. मागच्या काही दिवसांपासून भाजप आणि मनसेच्या युतीची चर्चा होत आहे. या पार्श्वभूमीवर या राणे आणि ठाकरे भेटीला विशेष महत्व आहे. काहीवेळा आधी नारायण राणे ‘शिवतीर्थ’वर दाखल झाले. तिथे राज ठाकरे आणि त्यांच्यात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. या…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था मी आरएसएस व भाजपच्या लोकांचे आभार मानतो. ते माझ्यावर जेवढे हल्ले करतात, तेवढा मी उजळून निघतो. भाजप व संघाचे लोक माझे गुरू आहेत. पुन्हा एकदा केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार, भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत हल्ला केला. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा काही दिवस विश्रांतीसाठी थांबली आहे. ती 3 जानेवारीपासून पुन्हा सुरू होऊन उत्तर प्रदेश, पंजाब मार्गे जम्मू काश्मीरमध्ये प्रवेश करेल. भारत जोडो यात्रा आतापर्यंत यशस्वी ठरली आहे. आमचे अनेक मुद्दे आहेत. यात बेरोजगारी व महागाई महत्त्वपूर्ण आहे. भारतातील काहीजण अत्यंत कमी वेळात जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनलेत. पण देशातील बहुतांश जनता…
धरणगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील एका रस्त्यावर चक्क रस्त्याचे दोन भाग झाल्याचे असल्याने ‘धरणगाव तालुक्यात चक्क एका रस्त्याचे झाले दोन रस्ते ; ठेकेदाराचा हलगर्जी पणा ?’ या मथळ्या खाली लाईव्ह महाराष्ट्रने प्रसिद्ध केली होती याच बातमीची दाखल घेत आज मंत्री गुलाबराव पाटील यांनी थेट रस्त्यावर उतरत पाहणी करीत आदेश केले आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील चमगाव फाटा ते उखळवाडी शेत रस्त्याचे काम गेल्या चार ते पाच महिन्या आधी करण्यात आलेले आहे. या रस्त्याने जाणारे प्रत्येक नागरिक या रस्त्याचे आश्चर्य व्यक्त करीत आहेत. कारण या मुख्य रस्त्याच्या मधोमध एक मोठी भेग पडली आहे, त्यामुळे परिसरातील शेतकरी नेहमी बैलगाडी…
मुंबई : वृत्तसंस्था वर्षाचा शेवटचा दिवस येवून ठेपला असतांना राज्यातील भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी नवीन वर्षाचा संकल्प करीत नव्या वर्षात ठाकरे गटासाठी आपले प्लॅन्स जाहीर केले आहे. उद्यापासून सुरु होणाऱ्या नवीन वर्षाची सर्वत्र जोरदार तयारी सुरु आहे. अनेक जण विविध संकल्प करत आहेत. तर नव्या वर्षात काय नवनवीन गोष्टी करायच्या याबाबत प्लॅन्स ठरत आहे. मात्र भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एक ट्विट करत 2023 नव्या वर्षातले आपले प्लॅन्स जाहीर केले आहेत. 2023 मध्ये त्यांच्या निशाण्यावर कोण असणार आहे याची एक यादीच त्यांनी शेअर केलीय. किरीट सोमय्या यांनी ट्विट केलेल्या यादीत महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षातील…

