धरणगाव : प्रतिनिधी जिल्ह्यात बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गटाची) नवनियुक्त कार्यकारिणी जिल्ह्यात जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील पदाधिकारी आता चांगलेच कामाला लागले असून नेहमी शिंदे गटात पक्ष प्रवेश तर त्यानंतर धरणगाव तालुक्यातील जम्बो कार्यकारिणी जाहीर करून आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत असतांना दिसून येत आहे. जिल्ह्यात शिंदे गटाचे संघटन नव्या जोमाने व जोशात करीत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे. तर युवासेना धरणगाव तालुका युवासेना कार्यकारणी जाहीर कार्यकारणी पुढील प्रमाणे बाळासाहेबांची शिवसेना धरणगाव शहर प्रमुख विलास महाजन, युवासेना उपजिल्हा प्रमुख महेंद्र माळी ( भैय्या ) , युवासेना उपजिल्हा प्रमुख चेतन पाटील, युवासेना तालुका प्रमुख दीपक भदाणे, मागासवर्गीय तालुका युवासेना प्रमुख नवल पारधी, युवासेना…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय नेत्यांबाबत अपघाताचे सत्र सुरु आहे.हिवाळी अधिवेशन आटोपून सर्वच पक्षांतील आमदार आप आपल्या मतदार संघात पोहचले आहे. तर गेल्या काही दिवसापूर्वी भाजप आमदाराचा अपघात झाला होता. आता नुकतेच राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांच्या गाडीला परळीत येथे अपघात झाला आहे. https://www.facebook.com/DPMunde/posts/pfbid0kWvWVB5Vkbdg4w9QUV25keqF4UBheeu1rEwd8kg1axX9ui3tv4XWKgsSXhpzbqYhl या अपघातामध्ये मुंडे किरकोळ जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वाहनचालकाचा ताबा सुटल्याने मुंडे यांच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातामध्ये त्यांच्या छातीली किरकोळ मार लागला आहे. डॉक्टरांना त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
जळगाव : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित दादा पवार यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून भाजप तर्फे अजितदादांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले , पण जेव्हा भाजपच्या नेत्यांनी वेळोवेळी छत्रपती शिवाजी महाराज ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर , महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासह देशातील महापुरुष , राष्ट्रपुरुष यांच्याविषयी वेळोवेळी बेताल व आक्षेपार्ह वक्तव्य महापुरुषांचा अवमान केला त्यावेळेस भाजपचे नेते कोणत्या बिळात जाऊन लपलेले होते असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे करण्यात आला . भारतीय जनता पार्टीचे नेते सातत्याने महापुरुषांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करून गैरसमज पसरवत खोटा व चुकीचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न करून इतिहासाचे विकृतीकरण करीत आहेत . या सर्व बाबींच्या निषेधार्थ व अजित…
धरणगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरात घरासमोर लावलेली दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी की, शहरातील वाली गल्लीतील रहिवासी संजय विठ्ठल वाणी यांच्या घरासमोर लावलेली दुचाकी क्रमांक एम.एच.19.डी.डी ०४५४ सुमारे ४५ हजार रुपये किमतीची युनिकॉन ही दुचाकी दिनांक २७ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अनोळखी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संजय वाणी यांनी धरणगाव पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सफौ.रामदास पावरा हे करीत आहे.
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरात तब्बल चार लाखांची घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, शहरातील अयोध्या नगर परिसरातील अशोक नगर मधील उषा रेसीडन्सी मधील फ्लॅट क्रमांक ५ मधील रहिवासी सनी विकास सोनार यांच्या मालकीच्या फ्लॅटमधून दिनांक २ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अनोळखी चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश करून घरातील बेडरूम मधील कपाटातील ३ लाख ९७ हजार ९१५ रुपयाचे सोन्याचे दागिन्यांसह रोकड लंपास केली आहे याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात दिनांक ३ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी पुढील तपास करीत…
अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील निम येथील माहेर असलेल्या विवाहितेचा माहेरून पाच लाख रुपये आणले नाहीत म्हणून छळ केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींविरुद्ध मारवड पोलीसात फिर्याद देण्यात आली आहे. फिर्यादी तेजस्विनी धर्मराज बाविस्कर यांचे लग्न मनुदेवी आडगाव ता. यावल येथील धर्मराज रामदास बाविस्कर यांच्यासोबत झाले. लग्नानंतर सासरच्या मंडळींनी दागिने काढून घेत सोन्याची ब्रासलेट व पाच लाख रुपये हुंडा द्यायला हवा होता म्हणून छळ सुरु केला. एप्रिल महिन्यात मुलीसह विवाहितेला माहेरी हाकलून लावले. त्यानतंर 18 डिसेंबर रोजी विवाहितेने कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केल्याचे समजल्याने सासरची मंडळीनी निम येथे येवून तक्रार का केली अशी विचारणा करत विवाहितेच्या वडिलांना मारहाण व शिवीगाळ करून पाच लाख रुपये…
मुंबई : वृत्तसंस्था शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल मोठा गौप्यस्फोट केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारायण राणे यांना समज दिल्याचा दावा विनायक राऊत यांनी केलाय. नारायण राणे यांच्या पीएने अनेकांना गंडा घातलाय, असा दावा विनायक राऊतांनी केलाय. नारायण राणे लोकसभेची पायरी विसरले आहेत. पीएला काढा, नाहीतर मंत्रिपद घेणार, अशी समज मोदींनी राणेंना दिल्याचा गौप्यस्फोट विनायक राऊतांनी केलाय. “नारायण राणेंनी एक पीए ठेवला होता. पीएची कामं पटवापटवीची. अनेकांना पटवून गंडा घातला. मोदींच्या ते लक्षात आलं आणि वॉर्निंग दिली की, पहिले त्याला हाकलून दे, नाहीतर मंत्रीपद काढून घेणार”, असा दावा विनायक राऊतांनी केला.“नारायण राणे लोकसभेची…
जळगाव : प्रतिनिधी हिवाळी अधिवेशनानंतर सर्वच नेत्यासह आमदार आपापल्या मतदार संघात येवून पोहचले आहेत. तर राज्यात भाजपचे लोकसभा मिशन या माध्यमातून बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप युती असणार आहे. यामध्ये युतीचे नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील त्यात शून्य जागा जरी आम्हाला लढवावी लागल्या तरी तो मान्य राहील, असे मोठे विधान शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. काय म्हणाले गुलाबराव पाटील ? ‘भाजपाचे मिशन 145 आहे मात्र बाळासाहेबांची शिवसेना व भाजप आमची युती असणार आहे. तेव्हा या युतीमध्ये नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. यामध्ये शून्य जागा जरी लढवायला लागल्या तो आम्हाला मान्य राहील फक्त…
अमळनेर : प्रतिनिधी शहरातील एका परिसरातून तरुणाची दुचाकी लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर वृत्त असे की, शहरातील शहा आलम नगर परिसरात वास्तव्यास असलेल्या 30 वर्षीय इमरान खान हबीब खान पठाण या तरुणाची दुचाकी घराच्या बाहेर लावलेली असताना दिनांक १ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अनोळखी चोरट्यांनी दुचाकी एम.एच.१९.६१५८ ही ३० हजार रुपये किमतीची चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्थानकात दिनांक दोन रोजी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी पुढील तपास पोहेको प्रमोद पाटील हे करीत आहे.
जळगाव : प्रतिनिधी क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विनम्र अभिवादन केलं. क्रांतिज्योति सावित्रीबाई सत्यशोधक विचारांच्या क्रांतिकारी समाजसुधारक होत्या. स्त्री शिक्षणासाठीचं त्याचं योगदान चिरंतन आहे. प्रत्येकाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार आत्मसात केले पाहिजे असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते पाळधी बु. येथिल ग्रामपंचायत कार्यालयात कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. यावेळी माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, डॉ. कमलाकर पाटील, सचिन पाटील, सरपंच प्रकाशनाना पाटील , ग्रामविकास अधिकारी दिपक पाठक, उपसरपंच चंदन कळमकर, ग्रा. पं. सदस्य प्रकाश ठाकूर, तुषार मोरे, यशवंत पाटील, गोकुळनाना पाटील, बबलू पाटील महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोकुळ…

